हवामान खात्याविषयी जेव्हा पीएमओ जागे होते..
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 08:08 AM2024-07-11T08:08:27+5:302024-07-11T08:08:35+5:30
दिल्ली व नागपूरच्या तापमानाबाबत नुकतेच चुकीचे आकडे जाहीर केले गेले होते. हवामान खात्याची ही चूक केंद्रीय मंत्र्यांनाच खोडून काढावी लागली होती.
हरीष गुप्ता
नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली
देशात भरपूर पाऊस होत असला, तरी हवामानाबाबत मोदी राजवटीत अगदी अलीकडे एक मोठा गोंधळ झाला होता. भारतीय हवामान खात्याने दिल्लीतील तापमान ५२.९ अंश सेल्सिअस आणि नागपूरच्या तापमानाची ५६ अंश नोंद झाल्याचे आकडे जाहीर करून घोडचूक केली होती. हे लक्षात आल्यावर केंद्रीय भू-विज्ञान आणि संसदीय व्यवहारमंत्री किरण रिजिजू यांनी त्याच रात्री 'एक्स'वर हे शक्य नसल्याचे सांगून टाकले. 'दिल्लीतील तापमान ५२.९ अंश होणे अशक्य आहे. हवामान खात्यातील आमचे वरिष्ठ अधिकारी बातमीची खातरजमा करीत आहेत' असे रिजिजू यांनी 'एक्स'वर जाहीर केले. आम्ही अधिकृत स्थिती लवकरच समोर आणू, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
हवामान खात्याने दिलेले आकडे केंद्रीय मंत्र्याने खोडून काढण्याची खात्याच्या इतिहासातली कदाचित ही पहिलीच वेळ होती. हवामान खात्याने हे आकडे जाहीर करून जगभर हाहाकार माजवला. एकप्रकारे खात्याने हाराकिरीच केली; कारण हवामानविषयक माहितीची गणना आणि विश्लेषणासाठी अमेरिकेने भारताला महासंगणक दिलेला आहे. चूक कशी झाली, याचा तपास करण्यासाठी आता एक उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे. दिल्लीच्या बाहेर मुंगेशपूर येथे उभारण्यात आलेल्या ऑटोमॅटिक वेदर स्टेशन्सवर या चुकीचे खापर फोडून हवामान खाते मोकळे झाले. हवामान खात्याचे महासंचालक एम. मोहपात्रा यांनी काही स्थानिक कारणांवरही बोट ठेवले; पण ती कारणे नेमकी कोणती, हे मात्र सांगितले नाही. या मोहपात्रांची निवड सरकारनेच केलेली आहे.
थोडा कानोसा घेता असे समजले की, मुंगेशपूर ऑटोमॅटिक वेदर स्टेशनवर प्रमाणित यंत्र विशिष्ट काळात दाखवते त्यापेक्षा तीन अंश सेल्सिअसने तापमान जास्त झाल्याचे नोंदविले गेले. शिवाय ३१ मे रोजी नागपूरमध्ये ५६ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदले गेले. तेही तापमान नोंदवणारी सेन्सर्स गडबडल्यामुळे. हे आकडे चुकीचे असून, इलेक्ट्रॉनिक्स सेन्सर बिघडल्याने तसे झाले असा खुलासा करण्यात आला. पुण्याच्या वेधशाळेनेही त्याला दुजोरा दिला. हवामान खात्याने हे सगळे द्विटरवर टाकले. थोडक्यात, ऑटोमॅटिक वेदर स्टेशन्सवर ठपका ठेवण्यात आला. यंत्र चुकले, माणसे नव्हेत, असा त्याचा आशय होता. हवामानाचे अंदाज वर्तविण्यात कुशल असलेल्या काही अधिकाऱ्यांची विचित्र कारणांसाठी बदली करण्यात आली असे बोलले जाते. लोकांमध्ये घबराट पसरू नये म्हणून ऑटोमेंटिक वेदर स्टेशनच्या माहितीचे जाहीर प्रसारण करण्यापूर्वी स्वयंचलित दर्जामापन उपाय योजावेत, अशी शिफारस मंत्रालयाने आता केली आहे.
राहुल गांधी यांनी कुर्ता-पायजमा वापरणे का बंद केले?
विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर १८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राहुल गांधी पारंपरिक शुभ्र कुर्ता-पायजमा परिधान करून सभागृहात आले तेव्हा ते एक सुखद आश्चर्य होते. नव्या भूमिकेत स्थिरस्थावर होत असताना राहुल यांच्या भगव्या छावणीतही काही तरंग उमटले. काँग्रेस खासदारांनी 'राहुल. राहुल' असा धोशा होता. आतापर्यंत सभागृहाला भाजपचे खासदार मोदी' असा पुकारा करीत आहेत याचीच सवय पंतप्रधान जेव्हा जेव्हा सभागृहात येत तेव्हा असा व्हायचा. आता सभागृहात त्यांचे ज्या प्रकारे झाले ते भाजपला काहीसे अनपेक्षित होते. नवी अंगवळणी पडावी, यासाठी भाजप नेते प्रयत्न आहेत. इंडिया आघाडीकडे एनडीएशी सामना खासदारही आहेत. राहुल यांनी त्यांची नवी पार पाडण्याची सुरुवात तर चांगली केली आहे, भाजप खासदारांनीच मान्य केले. आणि दिवशी राहुल गांधी टी-शर्ट आणि जीन्स परिधान सभागृहात आले. इन्स्टाग्रामसह विविध माध्यमे १५ ते ४५ या वयोगटातील लक्षावधी अनुयायांना समोर ठेवून हा बदल करण्यात आला, असा खुलासाही राहुल यांच्या समर्थकांनी केला. अँग्री यंग मॅन या त्यांच्या नव्या प्रतिमेवर ते खूश आहेत. पुढाऱ्यांकडे आपल्या चष्म्यातून पाहणाऱ्या मंडळींच्या शेरेबाजीने राहुल मुळीच अस्वस्थ झाले नाहीत. लाभदायक ठरत असल्याने आता आपण आपला 'मतदारसंघ' सांभाळायचा असे त्यांनी ठरवलेले दिसते. वायनाडमधून निवडून आल्यावर प्रियांका गांधी वाड्रा आपल्या भावाबरोबर येतील तेव्हा सभागृहात काय दृश्य असेल, अशी कल्पना काही भाजपचे खासदार करीत आहेत. एकाच वेळी ३-३ गांधींना सामोरे जाणे भाजपला थोडे कठीण जाईल.
अतिमागासांच्या मतांसाठी लढाई
इतर मागासवर्गीय आणि अतिमागास मतदारांना कसे आपलेसे करून घ्यायचे ही कला आता भाजपने अवगत केली असून, बिहारमधील कुशवाह यांची मते ओढण्यासाठी संघर्ष सुरू आहे. पाटण्याहून येणाऱ्या बातम्या हेच सांगत आहेत की, भाजपने आरएलपी नेते उपेंद्र कुशवाह यांना राज्यसभेवर पाठवू, असे आश्वासन देणे सुरू केले आहे. राजदच्या मिसा भारती आणि भाजपचे विवेक ठाकूर लोकसभेवर निवडून गेल्याने रिकाम्या झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार असून भाजपचा या दोन्ही जागांवर डोळा आहे. भाजपला फक्त एक जागा मिळू शकते; परंतु बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी सौदा करून संयुक्त जनता दलाला विधानपरिषदेच्या दोन जागा देण्याचे भाजपने मान्य केले, त्याच्या मोबदल्यात राज्यसभेची ही आणखी एक जागा त्यांना मिळवायची आहे.
जाता-जाता : 'एक व्यक्ती, एक पद' असे भाजपचे धोरण आहे; पण वेळप्रसंगी नाइलाजामुळे क्वचित एखाद्या व्यक्तीने दोन पदे घेतली असतील; मात्र भाजपच्या ४४ वर्षांच्या इतिहासात जयप्रकाश नड्डा हे कदाचित पहिलेच नेते असतील ज्यांच्याकडे तीन पदे आली. ते भाजपचे अध्यक्ष आहेत. राज्यसभेतील पक्षाचे नेते; तसेच आरोग्य, रसायने आणि खते या खात्याचे मंत्रीही तेच आहेत.