शहरं
Join us  
Trending Stories
1
आरोपीचा पक्ष कोणता हे पाहू नका, त्याला अटक करा; ठाणे प्रकरणावर राज ठाकरे संतापले
2
राज ठाकरेंचं पुत्र अमित ठाकरेंसाठी उद्धव ठाकरे गट माहिम मतदारसंघ सोडणार?
3
“४ नोव्हेंबरला मोठा स्फोट होणार, मविआ-महायुतीचे एन्काउंटर करणार”; परिवर्तन महाशक्तीचा दावा
4
विक्रोळीत भाजी विक्रेत्यांकडून माजी महापौरांना धक्काबुक्की; दत्ता दळवींचे वॉर्ड ऑफिसवर आरोप
5
“भाजपाची बिष्णोई गँग त्रास देते, कसे लढायचे आम्हाला चांगले माहिती आहे”; संजय राऊतांची टीका
6
Sharad Pawar News सिद्दिकींच्या हत्येनंतर केंद्रीय यंत्रणा सज्ज! शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा घेण्यासाठी केंद्राचा आग्रह
7
"विराट कोचला सांगू शकला असता, पण त्याने तसं केलं नाही"; ४६ All Out नंतर दिनेश कार्तिकचा दावा
8
Manappuram Finance shares: RBI च्या कारवाईनंतर 'या' शेअरमध्ये हाहाकार, गुंतवणूकदारांकडून विक्री; ₹१४७ वर आला भाव, एक्सपर्ट म्हणाले...
9
Baba Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येवेळी सिक्योरिटी गार्ड काहीच का करू शकले नाहीत?, चौकशीदरम्यान खुलासा
10
शोएब अख्तरचा अंदाज ठरला खोटा; इंग्लंड विरुद्ध पाक संघानं विजय मिळवला मोठा
11
Ratan Tata : रतन टाटांचे चार विश्वासू शिलेदार; त्यांच्याकडेच दिलेत संपत्तीच्या वाटणीचे अधिकार! जाणून घ्या कोण आहेत ते?
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : रोहित पाटील यांच्याविरोधात अजितदादांची खेळी? संजयकाकांनी घेतली अजित पवारांची भेट, चर्चांना उधाण
13
अंतरवाली सराटी बनलेय राजकीय आखाड्याचे केंद्रबिंदू; मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला मध्यरात्री येताहेत राजकीय नेते
14
“तिढा सोडवण्यास राज्यातील काँग्रेस नेते सक्षम नाहीत, राहुल गांधींशी चर्चा करणार”: संजय राऊत
15
Salman Khan : जेव्हा 'लॉरेन्स'ने सलमान खानला सांगितलेला त्याचा फेव्हरेट हिरो; भाईजानचा 'तो' Video व्हायरल
16
नरेंद्र भोंडेकर मुख्यमंत्र्यांची साथ सोडणार? अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम
17
११५ जणांच्या नावांची शिफारस, दिल्लीत बैठकांचे सत्र; आज किंवा उद्या भाजपाची पहिली यादी येणार?
18
"मी राजकारणात नक्कीच येणार, पण...", विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्राजक्ता माळीचं मोठं वक्तव्य
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "राणे कुटुंबीयांचा त्रास, लोकसभा, विधानसभा...";राजन तेलींनी आरोप करत घेतला मोठा निर्णय
20
खळबळजनक! पोस्ट ऑफिसमधील १५०० लोकांच्या खात्यातून अचानक लाखो रुपये झाले गायब अन्...

यूट्यूबर्स, इन्फ्लूएन्सर्सना ‘भरपूर’ पैसे मिळतात; पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 5:16 AM

यूट्यूबर, इन्फ्लूएन्सर म्हणून करिअर करावं असं अनेक तरुणांना वाटतं, त्यातून पैसे मिळतात; पण किती, केव्हा? कष्ट, मेहनतीला कुठेच पर्याय नाही..

मुक्ता चैतन्य, समाजमाध्यम अभ्यासक, संस्थापक - सायबर मैत्र

आजकाल अनेक तरुणांचं इन्फ्लूएन्सर्स बनण्याचं स्वप्न असतं. त्यातल्या काही तरुणांना यूट्यूबर्स व्हायचं असतं तर काही जणांना डिजिटल कंटेन्ट क्रिएटर्स बनून करिअर उभं करायचं असतं. या सगळ्या गोष्टी अशक्य आहेत का? - तर मुळीच नाही! पण, त्याचबरोबर उत्साहात सुरू केलेले यूट्यूब चॅनल्स आणि पॉडकास्ट बंद पडण्याचं प्रमाणही जगभर प्रचंड आहे. डिजिटल स्पेसमध्ये कंटेन्ट क्रिएट करणाऱ्या प्रत्येकाचं करिअर होऊ शकतं असा जर समज असेल तर चॅनल्स, पॉडकास्ट बंद का पडतात? किंवा सुरुवातीचा उत्साह टिकत का नाही?

डिजिटल २०२४ ग्लोबल ओव्हरव्यू रिपोर्टनुसार जगभर ५.०४ अब्ज लोक यूट्यूब बघतात. जगात यूट्यूब बघणारे सर्वाधिक प्रेक्षक भारतात आहेत. सगळ्यात मोठा प्रेक्षक वर्ग २५ ते ३४ वयोगटातला आहे. डिजिटल माध्यमांत कंटेन्ट क्रिएटर बनून प्रसिद्धी आणि विनाकष्ट सहज पैसा कमावणं अगदी सोपं आहे असा अनेकांचा समज आहे; पण, इथेही विनाकष्ट पैसा मिळत नाही हे या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्येक १००० व्ह्यूजला यूट्यूब अंदाजे ५३.४६ रुपये देतं. म्हणजे प्रत्येकालाच ५३ रुपये मिळतील असं नाही. आपलं चॅनल किती लोक बघताहेत, त्यावर जाहिराती कुठल्या ब्रँड्सच्या येतात, प्रेक्षकवर्ग कोण आहे.. या सगळ्यावर १००० व्ह्यूजमागे किती रुपये मिळतील हे ठरतं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा.. पैसे मिळविण्यासाठी म्हणजे यूट्यूब पार्टनरशिप प्रोग्रॅममध्ये मान्यता मिळण्यासाठी १००० सबस्क्राइबर्सचा टप्पा पार व्हावा लागतो, ४००० पब्लिक व्ह्यूज मिळवावे लागतात. त्यानंतर यूट्यूबवरून पैसे मिळायला सुरुवात होते. चॅनल काढला आहे, एखाद-दोन शॉट्स टाकले आहेत, त्यांना भरपूर व्ह्यूज मिळाले म्हणजे लगेच पैसे मिळतील असे नसते. ही सगळी गणितं यूट्यूबर म्हणून करिअर सुरू करण्याआधी माहीत असली पाहिजेत. एक आकडेवारी असं सांगते की, फक्त १० टक्के यूट्यूब चॅनल्स यशस्वी होतात. म्हणजे त्यातून क्रिएटरना पैसे मिळतात. बाकीचे चॅनल्स यशस्वी होत नाहीत; कारण यूट्यूबकडे किंवा डिजिटल कंटेन्ट क्रिएशनकडे झटपट पैसे कमावण्याचं आणि प्रसिद्ध होण्याचं माध्यम म्हणून बघितलं जातं. त्याचं व्यावसायिक गणित आणि माध्यम समजून घेऊन डिजिटल कंटेन्ट क्रिएटर म्हणून प्रयत्न करणं हे अनेकांच्या बाबतीत होताना दिसत नाही.

हातात मोबाइल आहे, त्यात इंटरनेट आहे, अनेक फिल्टर्स आणि एडिटिंग टूल्स सहज उपलब्ध आहेत म्हणून आपणही कंटेन्ट क्रिएटर व्हावं, यूट्यूबर व्हावं असं वाटूच शकतं. डिजिटल कंटेन्ट क्रिएटर म्हणून करिअर करायचं असेल तर मग त्यात यूट्यूब चॅनल्स आले, पॉडकास्ट आले, सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्स आले.. या सगळ्यासाठी काही गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे.

हा बिनभांडवली धंदा नाही. इथेही पैशांची गुंतवणूक करावी लागते. मग ती शूटिंग, एडिटिंगसाठी असेल नाहीतर, आपल्या चॅनलची जाहिरात करण्यासाठी असेल किंवा चॅनलच्या निमित्ताने प्रवास असेल. पैसे लागतात हे लक्षात घेतलं पाहिजे. सातत्य हा डिजिटल स्पेसमधला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. सातत्याने कंटेन्ट तयार झाला पाहिजे. अपलोड झाला पाहिजे. कंटेन्ट रंजक, वेगळा असेल, मांडणी अनोखी असेल तर चॅनल बघितला जातो.

यूट्यूब हा महासागर आहे, इथे प्रत्येक विषयावर हजारो चॅनल्स निरनिराळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहेत. अशावेळी आपला चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणं हे मोठं चॅलेंज आहे. आज चॅनल चालू केला आणि उद्या पैसे मिळाले असं होत नाही. पेशन्स ठेवून सतत उत्तम काम करीत राहावं लागतं. तरच पैसे मिळतात, नाही तर नाही.

गृहपाठ न करता, प्री-प्रॉडक्शनवर लक्ष न देता काम करणाऱ्यांचे चॅनल्स टिकत नाहीत. त्यामुळे कष्टाला, अभ्यासाला, गृहपाठाला इथेही पर्याय नाही. 

टॅग्स :YouTubeयु ट्यूब