शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

आध्यात्म - दीपावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 12:16 AM

दीपावली हा खरा शब्द. आवली म्हणजे रांग, ओळ दिव्यांची आवली, रांग म्हणजे दीपावली म्हणून घरभर दिवे लावायचे. दिव्यांनी घर सजवून टाकायचे. म्हणजेच घर उजळायचे, उजळून टाकायचे.

- किशोर पाठकदीपावली हा खरा शब्द. आवली म्हणजे रांग, ओळ दिव्यांची आवली, रांग म्हणजे दीपावली म्हणून घरभर दिवे लावायचे. दिव्यांनी घर सजवून टाकायचे. म्हणजेच घर उजळायचे, उजळून टाकायचे. सूर्ये अधिष्ठिली प्राची क जगा राणीव दे प्रकाशाची कक ही ज्ञानदेवांची दिवाळी. त्यांचे सूर्याचे नातेबंध फार तीव्र होते. म्हणून प्रत्येक दिव्यात त्यांना सूर्य दिसतो. तिमिरातून तेजाकडे जाण्याचा प्रवास म्हणजे दीपावली. बघा गोरगरीब, श्रीमंत कुणीही दिवा लावतो, फटाके फोडतो. आता बरेच जण फटाक्यांचे आवाज कमी व्हावेत हे म्हणतात. खरोखर आसपासच्या आवाजांना घाबरणारी मुलं आणि म्हातारे यांना सांभाळा. एखाद्या वृद्धाला चकली कुटून द्या. तुम्ही म्हणाल काय हा खाण्याचा सोस, पण तोही हवा. जगण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत उत्फुल्लं जगायला हवे. दिव्यांच्या तेजावर कविता लिहायला हवी. तूच तुझा दिवा हो. ‘अत्त दीप भव’चा अर्थ हाच म्हणजे संत आपल्याला बाहेरून आत डोकावयाला लावतात. आत म्हणजे हृदयात आत खूप काही घडते आहे. प्रकाशाची रांगोळी आपण बघू शकतो. एरवी कळकट चेहरे प्रकाशमान होतात. या दिवाळीत आपण काही नियम करायला हवा. अगदी वसुबारसपासून धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज असा पाचच दिवसांचा खेळ, पण तो सर्वांना हवा हवा वाटतो. फराळाचे वेगवेगळे पदार्थ बनविणे आणि खाऊ घालण्यात मोठ्ठा आनंद आहे. हा आनंद प्रत्येकाला मिळायला हवा. प्रत्येक माणूस या आनंदात सहभागी व्हायला हवा. मग पाड्यावर जा आपली एक करंजी तिथे द्या, वेगळ्या वस्तीवस्तीत पदार्थांच्या रूपाने आनंद वाटा. काही नाही तर आपुलकीने त्याच्या खांद्यावर हात ठेवा आणि म्हणा हे नूतन वर्ष तुला भरपूर आनंदाचे जावो हा निसर्ग तुला कायम ताजातवाना ठेवो तू स्वत: तर आनंदी राहाच पण इतरांना आनंदी कर हे कौतुक प्रत्येक डोळ्यात दिसायला हवं. आपण माणसाला माणूस म्हणून घडवू या समाजातले भेद, कलह, तंटे कमी व्हायला हवेत. ते पूर्ण बंद होणार नाहीत. कारण कायम छिद्रे पाहणारी माणसे समाजात असतातच. त्यांची ती वृत्ती कमी होवो. पणतीचा मंद प्रकाश त्यांच्या अंतरात उजळो. पणतीला माहीत कधीतरी तेल संपणार, पण तरीही ती शेवटच्या थेंबापर्यंत प्रकाश देते. तसे आपण शेवटच्या श्वासापर्यंत आनंद वाटू या, प्रकाश वाटू या, शुभ दीपावली !

टॅग्स :Spiritualityआध्यात्मDeepotsav 2017दीपोत्सव 2017