शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
2
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
3
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान
4
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
5
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
6
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
7
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
8
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
9
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
10
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
11
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
12
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
13
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
14
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
15
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...
16
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...
17
आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 
18
'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी
19
भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी
20
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?

भारतीय भाषांतील डिजिटल माध्यमांची स्टार्ट अप दुनिया

By admin | Published: August 28, 2016 2:38 AM

भारतात आज इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या सुमारे ४६ कोटी इतकी आहे. म्हणजेच भारताच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात हे प्रमाण जवळपास ३५ टक्के इतकं आहे. अर्थात इतक्या मोठ्या प्रमाणात

- कुणाल गडहिरे भारतात आज इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या सुमारे ४६ कोटी इतकी आहे. म्हणजेच भारताच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात हे प्रमाण जवळपास ३५ टक्के इतकं आहे. अर्थात इतक्या मोठ्या प्रमाणात असणारी ही सगळी मंडळी फक्त औपचारिक कामांसाठीच इंटरनेटचा वापर करत नाही. तर त्यांचं आॅनलाइन जग हे चालू घडामोडींची माहिती मिळवणं, एखाद्या विषयाचा अभ्यास करणं, बिझनेस, सोशल नेटवर्किंगपासून मनोरंजन अशा विविध गोष्टींनी व्यापलेलं आहे. सध्या इंटरनेटवरील इंग्रजी भाषेचं अस्तित्व ५६ टक्के आहे. तर भारतातील प्रादेशिक भाषांचं इंटरनेटवरचं अस्तित्व हे अवघं ०.१ टक्के इतकं आहे. मात्र एकूणच इंग्रजीचं महत्त्व हे आता इंटरनेटवरील व्यावसायिक समीकरण जुळवण्यासाठी कमी होत असून त्याची जागा आता प्रादेशिक भाषा घेत आहेत. यामुळे आगामी काळात भारतात इंटरनेटचा प्रसार आणखी मोठ्या प्रमाणावर स्थानिक पातळीवर होतानाच, स्थानिक भाषांच्या माध्यमातूनच त्यांना इंटरनेटवर स्वत:कडे आकर्षित करण्याचे प्रयत्न व्यावसायिक स्तरांवर आणखी मोठ्या प्रमाणावर होतात दिसतील. गुगल एडसेन्स किंवा खासगी स्पॉन्सरच्या माध्यमातून हे उपक्रम सुरू करणाऱ्यांना उत्तम आर्थिक मोबदला मिळतो. म्हणूनच कोणतीही सेन्सॉरशिप नसल्याने आणि अतिशय कमी खर्चात स्वत:ची वेबसाइट किंवा युट्युब चॅनेल सुरू करता येत असल्याने विविध विषयांतील तज्ज्ञ या माध्यमांचा वापर करून लोकांना आपापल्या आॅनलाइन जगाकडे आकर्षित करत आहेत. या माध्यमातून जाहिरात करणाऱ्या कंपन्यांना आॅनलाइन शॉपिंगबद्दल अनुकूल असलेल्या नव्या पिढीच्या ग्राहकवर्गाकडे अतिशय कमी खर्चात पोहोचता येत आहे. स्वस्त दरातील स्मार्टफोनने या सगळ्या गोष्टी हाताच्या बोटांवर आणून ठेवल्या आहेत. आज करोडो वेबसाइट, ब्लॉग, अ‍ॅनिमेशन, व्हिडीओ यासारख्या अनेक गोष्टींतून लोकांची इंटरनेटची तहान भागवली जात आहे. पण ही तहान प्रामुख्याने इंग्रजी भाषेत भागवली जात असताना, सुमारे १५९९ विविध भाषा बोलणाऱ्या भारतातील लोकांची गरज मात्र वेगळी होती. त्यामुळे देशपातळीवर सर्वात जास्त वापर होत असलेल्या आणि सर्वांना सहज समजत असलेल्या हिंदी भाषेत अनेक वेबसाइट, कार्यक्रम सुरू झाले. निव्वळ टाइमपास, करमणूक करणाऱ्या गोष्टींपासून शैक्षणिक उपक्रम, माहितीपर, मनोरंजनात्मक कार्यक्रम अशा गोष्टी हिंदी भाषेच्या व्यतिरिक्त इतर प्रादेशिक भाषांमध्येसुद्धा इंटरनेटवर प्रसिद्ध होऊ लागल्या आहेत. यातले अनेक उपक्रम व्यावसायिक संरचनेत बांधले जाऊन ते स्टार्ट अप्सच्या लाटेवर स्वार झाले. या स्टार्ट अप्सचं काम म्हणजे लोकांना आपल्या वेबसाइटवर, कार्यक्रमांमध्ये, युट्युब चॅनेलवर किंवा ब्लॉगकडे आकर्षित करायचं आणि जाहिराती अथवा स्पॉन्सरच्या माध्यमातून मोठी आर्थिक कमाई करायची. गेल्या काही वर्षांत खासकरून सुरू झालेल्या अनेक वेबसाइट आणि युट्युब चॅनेल्सनी पारंपरिक माध्यमांपेक्षा जास्त वेळ लोकांना आपल्याकडे खिळवून ठेवले आणि नवे माध्यमसमूह म्हणून त्यांनी अल्पावधीत प्रचंड व्यापक प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवली. युअर स्टोरी डॉट कॉम हे त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण. सुरुवातीला इंग्रजी भाषेतून भारतातील स्टार्ट अप विश्वाच्या बातम्या देणारं हे स्टार्ट अप इंग्रजीसोबत हिंदी, बंगाली, तेलुगू, तामिळ, कन्नड, मल्याळी, ओडिसी, गुजराती, पंजाबी, असामी, उर्दू आणि मराठी अशा बारा भाषांमध्ये उपलब्ध आहे. यूट्युबच्या माध्यमातून विविध स्थानिक भाषांमध्ये मनोरंजनात्मक कार्यक्रम आज लोकांना उपलब्ध आहेत. गेल्या वर्षी वादात सापडलेला एआयबी कार्यक्रम हे याचं आणखी एक ठळक उदाहरणं. टेलिव्हिजनवरच्या सेन्सॉरशिपला बगल देत स्वतंत्रपणे लोकांचं मनोरंजन करण्यासाठी तन्मय भट आणि त्याच्या मित्रांनी युट्यूबच्या माध्यमातून कार्यक्रम प्रसारित करायला सुरुवात केली. २०१२ साली सुरू झालेल्या या युट्यूब चॅनेलला सोळा लाखांहून जास्त सबस्क्रायबर आहेत. फोर्ब्स इंडियाने तन्मय आणि त्याच्या मित्रांसहित एआयबीचा सर्वात जास्त पैसे कमावणाऱ्या सेलीब्रिटींच्या यादीत समावेश केला आहे. एका अंदाजानुसार एका व्हिडीओच्या मागे आज एआयबी सुमारे दहा ते पंधरा लाख रुपये कमावते. एआयबीप्रमाणेच द व्हायरल फिवर हेदेखील आणखी एक लोकप्रिय युट्युब चॅनेल. मनोरंजनात्मक आणि वेगळ्या विषयांवरील हटके वेब सीरियल्स बनवणाऱ्या या चॅनेलमध्ये टायगर ग्लोबल या गुंतवणूकदार संस्थेने या वर्षी फेब्रुवारी महिन्यात तब्बल दहा मिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. त्यासोबतच त्यांचं एकूण मूल्यांकन हे २७० कोटी इतकं झालं आहे. युट्यूबवर सुरू झालेल्या, टीव्हीएफ फिचर्स, पर्मनंट रूममेट्स, टॅनलाइन, बेक्ड, गर्ल इन द सिटी, बँड बाजा बारात या वेब सीरियल तरुण पिढीला मोठ्या प्रमाणात आकर्षित करत आहेत. एकीकडे हिंदीमध्ये अशा प्रकारे लोकांचं मनोरंजन करणारे किंवा त्यांना मदत करणारे स्टार्ट अप्स भरपूर पैसे कमवत असल्याचे पाहून इतर स्थानिक भाषांमध्येसुद्धा यांची सुरुवात झाली आहे. मराठीमध्ये आता असे अनेक उपक्रम सुरू झाले आहेत. शेखर पाटील यांनी सुरू केलेली टेकवार्ता डॉट कॉम ही वेबसाइट टेक्नॉलॉजी, सोशल नेटवर्किंग, गॅजेट्स आणि तंत्रज्ञान या विषयांतील माहिती लोकांपर्यंत मराठी भाषेतून पोचवत आहे. तुषार भांबरे याने सुरू केलेली मिशन एमपीएससी डॉट कॉम मराठी भाषेतून स्पर्धा परीक्षांच्या मदतीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे. फेसबुकवर डिस्कव्हरी ताई या नावाने प्रसिद्ध असलेल्या रूपाली पारखे-देशिंगकर यांनी सुरू केलेल्या थेट निसर्गातून या फेसबुक पेजला आज लाखो वाचक मिळाले आहेत. डोंबिवलीतल्या ओमकार दाभाडकर या तरुणाने सुरू केलेल्या मराठीपिझ्झा डॉट कॉम हे वेब पोर्टल आज अल्पावधीत लोकप्रिय होत असून त्यांना सध्या दर दिवशी हजारो वाचक प्रतिसाद देत आहेत. मराठीतील पहिली वेब सीरियल सुरू करण्याचा मान अमेय वाघ आणि निपुण धर्माधिकारी यांना जातो. कास्टिंग काऊच ही त्यांनी सुरू केलेली युट्युबवरची वेब सीरिज मराठी सेलीब्रिटींच्या धम्माल रंगतदार मुलाखतीमुळे प्रचंड लोकप्रिय होत आहे. मराठीतील नावाजलेले चित्रपट दिग्दर्शक विजू माने यांनीसुद्धा नुकतीच संतोष जुवेकर, कुशल बद्रिके या कलाकारांसोबत सुरू केलेली स्ट्रगलर साला ही वेब सीरिज लोकांना आवडत आहे. मागच्या बाकावरून शाळा दाखवत असलेली बॅक बेंचर्स ही तिसरी वेब सीरियल दोन महिन्यांपूर्वी सुरू झाली आहे. हे सर्वच आजच्या तरुणाईला आवडते आहे.