शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
2
मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा राहणार; सरकारचा मोठा निर्णय
3
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
4
MUDA जमीन घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांना मोठा धक्का, हायकोर्टाने दिले असे आदेश
5
रेशन कार्डावर किती दिवसांत नव्या सदस्याचं नाव अ‍ॅड होतं? वाचा तुमच्या कामाची संपूर्ण माहिती
6
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार; मदतीसाठी २३७ कोटी निधी वितरणाला मान्यता
7
मृत्यूच्या १० मिनिटे आधी अक्षय शिंदेसोबत काय घडलं?; पोलिसांनी जागीच केला एन्काउंटर
8
Navratri 2024: घरात सुख-समृद्धीसाठी घटस्थापनेआधी देव्हाऱ्यात करा 'हे' दहा मुख्य बदल!
9
संजय राऊतांनी शेअर केला अक्षय शिंदेचा व्हिडीओ; शिंदे-फडणवीसांना म्हणाले...
10
"रक्ताचे डाग होते, फ्रिज उघडताच..."; महालक्ष्मीच्या आईने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग
11
ना, सचिन, ना रोहित, ना विराट! अश्विन म्हणतो 'हा' खेळाडू भारतीय क्रिकेटचा कोहिनूर हिरा
12
अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
13
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले
14
मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी पुन्हा रहाणे; चॅम्पियन संघाचा कर्णधार, अय्यर-ठाकूरही मैदानात
15
अधिक व्याज देईल 'ही' स्कीम,  ₹१०,००,००० च्या गुंतवणूकीवर मिळतील ₹३०,००,०००; फक्त एक ट्रिक वापरा
16
अरबाजने सांगितलं छत्रपतींचा जयजयकार न करण्याचं कारण, म्हणाला "मी संभाजीनगरचा आणि..."
17
तुमच्या देवघरात ‘या’ देवता आहेत? ‘ही’ मूर्ती कधीही ठेवू नये! पण का? शास्त्र सांगते...
18
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
19
शरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत हे स्पष्ट झालं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
20
खळबळजनक! विहिरीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

देशभक्तीचे बाजारीकरण, उदात्तीकरण थांबवा

By admin | Published: August 28, 2016 2:55 AM

‘भारतमाता की जय’ सगळेच म्हणतात आणि ते म्हटलेच पाहिजे. ‘भारतमाता की जय’ म्हणणे आपले कर्तव्यच आहे. मात्र धर्मपरिवर्तनाची सक्ती होता कामा नये. धर्मनिरपेक्षता महत्त्वाची आहे.

- मणिंदरजीत सिंग बिट्टा

(अखिल भारतीय दहशतवादविरोधी संघटनेचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय युथ काँग्रेसचे माजी अध्यक्ष)‘भारतमाता की जय’ सगळेच म्हणतात आणि ते म्हटलेच पाहिजे. ‘भारतमाता की जय’ म्हणणे आपले कर्तव्यच आहे. मात्र धर्मपरिवर्तनाची सक्ती होता कामा नये. धर्मनिरपेक्षता महत्त्वाची आहे. तुमचा, आमचा आणि आपला धर्म हा भारत देश आहे. जे चूक आहे ते चुकीचे आहे. ‘वंदे मातरम’ म्हणणे चुकीचे नाही. पंजाबप्रमाणेच देशातही कटकारस्थान करण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत आहे. पाकिस्तानचे हे कटकारस्थान सफल होऊ नये, म्हणून आपण सर्वांनीच खबरदारी घेतली पाहिजे. देशात इसिसचे नारे लागतात आणि आपण हाताची घडी घालून गप्प बसतो. हे शोभा देणारे नाही. काश्मीर प्रश्नावर यापूर्वीचे कोणतेही सरकार स्पष्टपणे बोलले नाही. सध्याच्या सरकारने म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीर प्रश्नावर सडेतोडपणे भाष्य करत लोकांची मने जिंकली आहेत. बलुचिस्तान प्रकरणी केलेले भाष्यही योग्यच आहे. मात्र काश्मीर प्रश्नावर बोलले म्हणजे हा प्रश्न सुटला असे होत नाही. देशभक्तीवर देश उभा आहे. आपण देशभक्तीचे बाजारीकरण आणि उदात्तीकरण करता कामा नये, अशा विविध मुद्द्यांना अखिल भारतीय दहशतवादविरोधी संघटनेचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय युथ काँग्रेसचे माजी अध्यक्ष मणिंदरजीत सिंग बिट्टा यांनी ‘लोकमत’च्या कॉफीटेबलमध्ये देशातील विदारक परिस्थितीवर भाष्य केले.देशभक्तीचे बाजारीकरण आणि उदात्तीकरण होते आहे?देशभक्तीवर राज्य उभे आहे. आपण देशभक्तीचे बाजारीकरण आणि उदात्तीकरण करता कामा नये. ज्या लोकांनी यापूर्वी समाजकारणात काम केले आहे; ते लोक आता राजकारणात येऊ लागले आहेत. मात्र त्यांच्या राजकीय प्रवेशाने देशाचे नुकसान झाले आहे. उदाहरणच घ्यायचे झाले तर सामाजिक क्षेत्राशी निगडित असलेल्या किरण बेदी यांनी राजकारणात प्रवेश केला. दुसरे असे की, तुम्ही मला आमंत्रण दिले, याचे कारण मी काँग्रेसशी निगडित आहे म्हणून नाही तर मी देशप्रेमी आहे म्हणून. त्यामुळे देशभक्ती ही वादातीत असायला हवी. सध्या आंदोलने दिशाहीन होत आहेत?कोण देशभक्त आहे, हे कळायला मार्ग नाही. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलन सुरू केले. मात्र आता त्यांचे नाव कुठेच नाही. याचा अर्थ त्यांच्या आंदोलनाची धार बोथट झाली आहे, असे नाही. मात्र त्यांचे आंदोलन दिशाहीन झाले आहे. प्रत्येक आंदोलनाची एक दिशा असते. आंदोलन अथवा त्या आंदोलनात सहभागी झालेले लोक दिशाहीन होता कामा नयेत. असे होते तेव्हा देशाचे नुकसान होत असते. काश्मीर प्रश्नावर यापूर्वीचे कोणतेच सरकार स्पष्टपणे बोलले नाही. सध्याच्या सरकारने म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीर प्रश्नावर सडेतोडपणे भाष्य करत लोकांची मने जिंकली आहेत. मात्र काश्मीर प्रश्नावर बोलले म्हणजे हा प्रश्न सुटला असे होत नाही. प्रत्यक्षात कार्यवाही काहीच होत नाही ही खंत आहे. दुसरी गोष्ट अशी की, आपण नरेंद्र मोदी यांच्याकडे भाजपाचा चेहरा किंवा भाजपाचे नेते म्हणून पाहता कामा नये. आपण त्यांच्याकडे पंतप्रधान म्हणून पाहिले पाहिजे.काश्मीरमधील परिस्थितीबाबत काय सांगाल?आपण जेव्हा देशाचा विचार करतो तेव्हा संपूर्ण अंगाने विचार होणे गरजेचे आहे. मागील ४५ दिवसांपासून काश्मीरमध्ये गोळीबार सुरू होता. दहशतवाद्यांकडून हल्ले होत होते. या हल्ल्यात ज्यांचा काही एक दोष नाही; अशा लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. याला जबाबदार कोण? याचे उत्तर कोणाकडेच नाही. काश्मीरमध्ये बंद का पाळला जातो, पाकिस्तानचा ध्वज का फडकावला जातो? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे कोणीच शोधत नाही. जवानांनावर गोळीबार होतो, पण राजकीय पक्ष त्याकडे लक्ष देत नाहीत. इसिसचे नारे लागतात आणि आपण हाताची घडी घालून गप्प बसतो. हे शोभा देणारे नाही. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकार ‘हमदर्दी’चे काम करते. जखमेवर मलम लावून काही होणार नाही. गोळीचे उत्तर गोळीने दिले तर सगळे प्रश्न सुटतील. वृत्तवाहिन्यांवर एखाद्या विषयाची समीक्षा होते. राजकीय पक्षांवर टीका केली जाते. पण कार्यवाही काहीच होत नाही ही खंत आहे. बलुचिस्तान प्रकरणी पंतप्रधानांनी घेतलेली भूमिका अतिशय योग्य आहे. व्होट बँकेचे राजकारण सुरू आहे का?देशातील समस्यांवर फार कमी राजकीय पक्ष बोलतात. म्हणजे आपली मते मांडतात. देशावर जेव्हा हल्ला होतो; तेव्हा बुद्धिजीवी लोक हल्ल्याला प्रत्युत्तर कसे द्यायचे? यावर काहीच बोलत नाहीत. पंजाबमध्ये दहशतवाद फोफावला तेव्हा आम्ही त्याच्यावर उत्तर शोधले. गोळीचे उत्तर गोळीने दिले. तेव्हा कुठे पंजाबमध्ये शांती नांदू लागली. आजही जशास तसे उत्तर देण्याची गरज आहे आणि असे केले तरच कुठे सर्व प्रश्न सुटतील. देशभरात आजघडीला असंख्य सामाजिक सेवाभावी संस्था (एनजीओ) आहेत. मात्र त्यांच्यापैकी कोणीच देशाच्या सुरक्षेच्या प्रश्नावर बोलत नाही. देशासाठी कोणतीच एनजीओ पुढे येत नाही. माझे सर्वांना विशेषत: राजकीय पक्षांना आवाहन आहे की, आता तरी व्होट बँकेसाठीचे राजकारण सोडा. असे केले तर नक्कीच प्रश्नांना उत्तरे मिळू लागतील. पंजाबमधील परिस्थितीबाबत काय सांगाल?पाकिस्तानने पंजाबचा काश्मीर करण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्ही आमच्या पद्धतीने लढा उभारला आणि पाकिस्तानचा उद्देश सफल होऊ दिला नाही. आता पाकिस्तान पंजाबप्रमाणेच देशातही कटकारस्थान करण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानचे हे कटकारस्थान सफल होऊ नये म्हणून आपण सर्वांनीच खबरदारी घेतली पाहिजे. दुसरे असे की, सोशल मीडियाचा गैरवापर होत आहे. फोटो एडिट करून व्हायरल केले जात आहेत. हे कुठे तरी थांबले पाहिजे. यासाठी समाजमनासह सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे.‘भारत माँ के टुकडे टुकडे करेंगे...’ हे विधान कितपत योग्य होते?कन्हैयाकुमार हा कोणी मोठा माणूस नाही. तो एक विद्यार्थी आहे. विद्यार्थ्याकडे विद्यार्थी म्हणूनच पाहिले पाहिजे. मला एक समजत नाही की, तुम्ही विद्यापीठात अभ्यास करण्यासाठी येता की राजकारण करण्यासाठी. जर अभ्यास करण्यासाठी येत असाल तर राजकारणात कशासाठी उतरता? हे न उलगडणारे कोडे आहे. कन्हैयाकुमारला तुम्ही महाराष्ट्रात बोलावले. त्याच्या डोक्यावर ‘पुणेरी पगडी’ घातली? याचे कारण काय? जो माणूस तुमच्यासमोर ‘भारत माँ के टुकडे टुकडे करेंगे...’ असे म्हणतो; त्याला तुम्ही सहन करताच कसे? एवढे सगळे होऊनही तुम्ही गप्प बसता. कन्हैयाकुमार देश तोडण्याचा, कायदा मोडण्याची भाषा करतो आणि तुम्ही गप्प बसता. कायदा नक्की कोणासाठी आहे? तुम्ही देश तोडण्याचा विचार करू नका. मी काँग्रेसचा शिपाई आहे आणि कन्हैयाकुमारसारखे लोक देशाचे नुकसान करतात.‘वंदे मातरम’ म्हणावेच लागेल?तुमचा, आमचा आणि आपला धर्म हा भारत देश आहे. जे चूक आहे ते चूकच आहे. मात्र ‘वंदे मातरम’ म्हणणे हे चुकीचे नाही. देशाला चांगल्या नेत्यांची गरज आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्यासारख्या नेत्यांची देशाला गरज आहे. त्यांच्यासारखे नेते देशाला मिळत नाहीत; ही खंत आहे. दुसरे असे की, मी भाजपाचे समर्थन करत नाही किंवा मी भाजपाच्या बाजूनेही बोलत नाही. मात्र जे लोक चांगले काम करतात त्यांचा गौरव करणे किंवा त्यांचे कौतुक करणे हे कर्तव्य आहे आणि ते केले पाहिजे.आंबेडकर भवन पाडले; याबाबत काय सांगाल?राजकीय मुद्दा बाजूला ठेवा. दलितांना दलित म्हणून वागणूक देऊ नका. दलितांना दलित म्हणणे हेच चुकीचे आहे. कायदा असला म्हणजे दलितांना न्याय मिळेल असे होत नाही. आपल्या देशात दलितांचा अपमान होतो, यासारखे दुसरे दुर्दैव नाही. सरकार त्यांच्या परीने काम करते आहे. मात्र आपण प्रत्येकाला माणूस म्हणून वागणूक दिली पाहिजे. दुसरे असे की ज्यांनी आंबेडकर भवन पाडले त्यांच्यावर कारवाई का झाली नाही. सरकार नेमके काय करते आहे, याचाही विचार झाला पाहिजे.

मुलाखत : सचिन लुंगसे