शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

एका वादळाला घर हवं होतं..!

By admin | Published: December 10, 2014 11:32 PM

शब्दांचा वापर इतक्या झंझावती पद्धतीने करता येतो आणि एक तथाकथित, सुसंस्कारित आयुष्यापलीकडे एक धगधगतं जीवन असतं, याचं महाकाय दर्शन खोतांच्या लेखणीने घडविलं.

तरुण पिढीतील माङयासारख्या लेखकांना एक दिशा देण्याचे काम आणि स्वप्नांच्या पलीकडे वास्तवात नेण्याचे काम खोतांसारखे साहित्यिक आणि त्यांची योग्य ती पाठराखण करणा:या दुर्गा भागवत करीत होत्या, हे आज सांगावसं वाटतं.
साधारण 1972-73 साली महाविद्यालयीन वर्ष वा्मयीन उत्साहात आम्ही जगत होतो. एकीकडे ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, पु. भा. भावे, अरविंद गोखले यांची त्या मानाने ‘रोमँटिक’ पुस्तके वाचताना आमचे मध्यमवर्गीय मन सुखावत होते आणि शब्दांच्या -सौंदर्याच्या गुळगुळीत कल्पना मनात रुजत पडल्या होत्या. अशाच वेळी चेंडूने लगोरीच्या फरशा उद्ध्वस्त व्हाव्यात असं भन्नाट नाव वाचनात आलं ते म्हणजे चंद्रकांत खोत..! माङया मध्यमवर्गीय सुखवस्तू विश्वाला हे सगळंच चकित करणारं होतं. शब्दांचा वापर इतक्या झंझावती पद्धतीने करता येतो आणि एक तथाकथित, सुसंस्कारित आयुष्यापलीकडे एक धगधगतं जीवन असतं, याचं महाकाय दर्शन खोतांच्या लेखणीने घडविलं.
एकाच वेळी किरण नगरकर, भाऊ पाध्ये अशी तेवढय़ाच ताकदीने लिहिणारी नावंही ‘त्या’ लेखणीच्या कुटुंबातली होती. ‘उभयान्वयी अव्यय’ असो वा ‘बिनधास्त’ यांच्यातल्या अश्लीलतेबद्दल जे मनात असते, पण शब्दांत लिहिण्याचीही गरज असते, असे कातडीखालच्या वासनांचे जग याचे वस्तुनिष्ठ दर्शन सर्वप्रथम माङया पिढीला कळले ते चंद्रकांत खोत, भाऊ पाध्ये यांच्यामुळेच. मनात गोंधळ उडायचा, कारण आम्ही तेव्हा 17 ते 18 वर्षाचे डोक्यात स्वप्न आणि मनात मोरपिस घेणारे. परंतु त्या स्वप्नांचा फिजूलपणा दाखविणारे रेडलाइट एरिया, स्त्री-पुरुष नात्यांमधील अलिखित ‘अधोरेखिते’ मांडण्याचे धाडस खोतांचे लेखन करीत होते.
एकीकडे या साहित्यातील वा्मयीन विश्वावर प्रश्नचिन्ह करणारे लेखक आणि दुसरीकडे विशेष आश्चर्याची गोष्ट अशी दुर्गाबाई भागवत यांच्यासारख्या ज्येष्ठ विचारवंत, लेखिका खोतांच्या लेखणीची पाठराखण करताना दिसत होत्या. चंद्रकांत खोत हे अनेक कारणांनी ‘वादळी’ होत गेले, हे मला जाणवून गेलं. कारण ते जीवनच भन्नाट जगत होते, याचा अनुभव मी घेतला. ‘बिनधास्त’, ‘विषयांतर’ इ. पुस्तकांमुळे त्यांच्याबद्दल निर्माण झालेले वा्मयीन आकर्षण त्यांच्या भेटीत रूपांतरित झाले. जेव्हा मी लालबाग-परळमधील त्यांच्या घरी गेलो, तेव्हा लेखक असा जगू शकतो, राहू शकतो हे पाहूनच मी आश्चर्यात बुडालो. कारण जेमतेम अर्धी खोली, हात लागेल तिथे पुस्तक, झोपण्यापुरतीही जागा नाही आणि हिमालयात एखाद्या भटकणा:या अवलियाप्रमाणो अत्यंत उन्मुक्त प्रवाही व्यक्तिमत्त्व, दिसायला अत्यंत आकर्षक, रंग गौर आणि वर्षानुवर्षे मैत्री असावी असा मोकळेपणा. त्यांच्या आसपास आणखी एक वादळ घोंगावत होतं. एका प्रसिद्ध सिनेनाटय़-अभिनेत्रीची त्यांच्याशी असलेल्या नात्याची चर्चा हे एक गूढ आकर्षण होतं. नखशिखान्त प्रेम केलेला आणि प्रेमासाठी सर्वस्व उधळून देऊन अक्षरश: ‘कफल्लक’ झालेला एक लोकविलक्षण एकाकी प्रियकर मला त्यांच्यात दिसला. म्हणजे खोतांचे चाळ, झोपडपट्टी, दारिद्रय़, स्त्री-पुरुष संबंध, पुरुषी नजरांचे आक्रमक आडाखे टिपणारं धगधगते लेखन हे त्यांचे वा्मयीन जग एकीकडे, तर नंतर बदलत गेलेले जगण्याचे उन्हाळे-पावसाळे सोसून हलकेच सखोल विरक्त झालेले खोत मी पाहिले.
त्यानंतर खोतांचे जीवन आणि साहित्य फार बदलून गेले आणि हे बदल त्यांच्या पूर्ण कलाकृतीत दिसून आले. समाजाशी नाळ जोडलेला एक लेखक, दरिद्री, उपेक्षित समाजाशी रक्ताचे नाते जोडलेला लेखक, हातात एकही पैसा नसताना एकीकडे लघू अनियतकालिकांची चळवळ चालवत होता. ‘अबकडई’सारखा दिवाळी अंक जो वा्मयीन विश्वाला दिशा देणारा अंक हा लेखक संपादित करीत राहिला. त्याचवेळी ‘घर देता का घऱ़़’ असे म्हणत शासनदरबारी उंबरठे ङिाजवत राहिला. सगळ्य़ात असूनही कुणातही नसलेला हा लेखक, माणूस खरंतर आरती प्रभू यांच्या कवितेसारखा ‘कधी कुणाला कळलाच नाही..’
सनातन दु:खाशी असलेले त्यांचे नाते आपल्या रक्तामांसात तो पचवत राहिला. उपेक्षेचा लाव्हा सोसत हा एक भन्नाट अवलिया चक्क ‘रामकृष्ण परमहंस’ आणि ‘स्वामी विवेकानंद’  यांच्यासारख्या विरक्त ज्वालांचा शोध घेत राहिला. ‘बिंब-प्रतिबिंब’, ‘दोन डोळे शेजारी’ या शोधयात्रेचा महोत्सव आहे. या कलाकृतींवर आधारित चित्रपट मालिकेच्या स्वरूपात लेखन करावे, म्हणून मी व दिग्दर्शक राजदत्त यांच्यासह त्या काळात अनेक प्रकारचे परिश्रम केले. त्यानिमित्ताने भगिनी निवेदिता आणि स्वामी विवेकानंद यांच्यातील एक आध्यात्मिक मैत्र कसे शब्दांपलीकडे जाऊ शकते, याचे जे अनोखे दर्शन खोत यांनी घडवले, त्याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. खरोखर ‘बिनधास्त’ लिहिणारे खोत कुठे आणि अनुभूतीचा लंबक आसक्तीच्या पलीकडे नेऊन ठेवणारे खोत कुठे? एका माणसामधील लेखकाचा प्रवास आधुनिक मराठी साहित्यात असा दुर्मीळ आहे.
खोतांनी वादळाप्रमाणो जीवन अंगावर ङोलले. सर्व जगाशी नाते जोडले, पण तरीही खोलवर ते एकाकीच राहिले. अगदी महिना-दीड महिन्यापूर्वी त्यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवशी त्यांची ‘ग्रंथतुला’ होताना ग्रंथांच्या पलीकडे, स्वत: वजन म्हणून बसलेले खोत पाहिले तेव्हा ‘साहित्याचे वजन मोठेच, पण शरीराचे वजनही मोठे झालेले’ दिसले. पांढरी शुभ्र दाढी, गो:या गालाचा लाल रंग आणि व्यासपीठावर ताजेतवाने, टिप्पणी करणारे चंद्रकांत खोत आम्ही अनुभवले. दु:ख याचे वाटते, आयुष्याच्या उत्तरार्धात इतक्या महान साहित्यिकाला ज्या महाराष्ट्रात मराठीचा आणि साहित्याचा सन्मान होतो, त्यात एक भिंतीचे घर मिळावे म्हणून प्रयत्न यशस्वी होत असतानाच या वादळाने डोळे मिटले आणि वेगळ्य़ा अर्थाने हे वादळ विश्वाच्या घरात विलीन झाले. 
आज हुरहुर वाटते, जे वादळ मराठी साहित्याच्या भिंती हादरून टाकणारे ठरले, ते वादळ असं चुपचाप का बरं निघून गेलं? जणू चंद्रकांत खोत नावाच्या झंझावाताला कुशीत घेणो घरालाच परवडणारे नव्हते का? हा प्रश्न  धुमसतच राहील आणि विचारत राहील ‘एका वादळाला घर हवं होतं, पण त्या घराचंच आता वादळ झालं..’
 
प्रवीण दवणो
ज्येष्ठ साहित्यिक