शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

भक्कम गाळणा

By admin | Published: January 08, 2017 1:29 AM

नाशिक जिल्ह्यात बऱ्याच डोंगररांगा आहेत. यात एकूण ५८ किल्ले आहेत. त्यात देवगिरी किल्ल्याची भव्यता दाखवणारा, खानदेशाचे नाक असा समुद्र सपाटीपासून ७१० मी. उंचीवर

- गौरव भांदिर्गेनाशिक जिल्ह्यात बऱ्याच डोंगररांगा आहेत. यात एकूण ५८ किल्ले आहेत. त्यात देवगिरी किल्ल्याची भव्यता दाखवणारा, खानदेशाचे नाक असा समुद्र सपाटीपासून ७१० मी. उंचीवर वसलेला असा गाळणा टेकड्यांचा म्होरक्या... किल्ले गाळणा.कसे जायचे ?१. मालेगाव बसस्थानकावरून बसने ३० कि.मी. अंतरावर गाळणे गावात पोहोचावे.२. धुळे येथून बसने डोंगराळे गावात उतरावे व ४ कि. मी.ची पायपीट करून गाळणा गाव गाठावे.गडदर्शन:-गाळणा गावात गोरक्षनाथांचा आश्रम आहे. त्याला वळसा मारून गेल्यावर आपण गडाच्या पायथ्याला पोहोचतो. पायवाटेने पुढे गेल्यावर, आपण पहिल्या म्हणजे परकोट दरवाजात येतो. या दरवाजाला भव्य कमानी असून, दगडात कोरलेली कमळे आहेत व दोन्ही बाजूस पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. पुढे पायऱ्यांच्या वाटेने दोन वळसे मारले की, आपण दुसऱ्या लोखंडी दरवाजात पोहोचतो. या दरवाजाच्या मधल्या चर्येत एक पर्शियन शिलालेख आहे. पुढे जाताना आपल्याला वाटेत एक भग्न शिलालेखाचा दगड दिसतो. यानंतर तिसरा म्हणजे, कोतवाल पिर दरवाजा व लांबच लांब पसरलेली ३५ ते ४० फूट उंचीची तटबंदी पाहायला मिळते. थोडे पुढे गेलं की, चौथा लाखा दरवाजा येतो. येथे दगडात कोरलेली कमळे व पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. उजव्या हाताला सुंदर महिरपी कमान आपल लक्ष वेधून घेते. दरवाजा ओलांडून पुढे गेलं की, आपल्याला तटबंदीमध्ये बांधलेले दोन नक्षीदार सज्जे व कोठी पाहायला मिळतात. सरळ चालत गेले की, डाव्या बाजूला ५ काताळकोरीव गुहा दिसतात. त्यातील चौथ्या गुहेत गणपती व मारुतीची मूर्ती असून, पुरातन शिवलिंग आहे. गुहेतून बाहेर येताच, समोरच तटबंदीवर डाव्या व उजव्या बाजूला शरभाची शिल्पे असून, मधोमध पर्शियन शिलालेख आहे, तसेच सरळ गेल्यास चोर दरवाजा लागतो.त्या दरवाजातून आपण थेट पहिल्या दरवाजात पोहोचतो. तिथून पुन्हा चौथ्या दरवाजात यावे. तिथून पायऱ्यांचा वाटेने सरळ वरती जाताना वाटेत सुंदर महिरपी कमान दिसते, तसेच डाव्या हाताने पुढे गेले की, दक्षिणाभिमुख मशिदीसमोर येतो. या मशिदीचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यातील प्रत्येक खांबावर कुराणातील आयते व सुंदर मीनार कोरलेली आहेत. मशिदीच्या बाजूलाच २० फूट खोलीचा एक बांधिव हौद आहे. इथून डाव्या हाताने सरळ गेले की, आपणास अंबरखाना आणि सदर व त्यातील देवड्या, शिलालेख पाहायला मिळतो. येथून डाव्या बाजूला गेले की, तिहेरी कोट व एकाखाली एक खोदलेल्या टाक्या पाहायला मिळतात. अंबरखान्याच्या मागच्या बाजूने वर जाताच आपल्याला ४ नक्षीदार थडगी पाहायला मिळतात. इथून पुन्हा मशिदीजवळ येऊन, तीन कमानींनी तोललेली दगडी वास्तू, बाराही महिने वाहणारा झरा, जलसंकुल, कुंड, दगडी जिने, भल्या मोठ्या चर्या पाहायला मिळतात.इतिहास१४ व्या शतकात हिंदुंचे राज्य होते. बहामनी शासनसुद्धा हा किल्ला जिंकू शकले नाही. बागलाणचा राजा बहिर्जी याने गाळणा जिंकल्यानंतर, इ. स. १५२६ मध्ये अहमदनगरचा बादशहा बुरहान निजामशाहने किल्यावर आक्रमण करून, गाळणेश्वर महादेवाचे मंदिर उद्ध्वस्त करत मशीद बांधली. याच गाळणेश्वराच्या मंदिरावरून किल्याचे नाव ‘गाळणा’ असे पडले. इ.स.१६३१ मध्ये निजामशाहाचा खून झाला. शहाजी राजांनी मोगलांशी बंड करून किल्ला ताब्यात घेण्यासाठी बरेच प्रयत्न केले, पण मोगल सुभेदार खानजमान, लळीगाचा मोगल किल्लेदार मीर कासिम, मुहुमद खान यांनी हा किल्ला ७ आॅक्टोबर १६३२ मध्ये ताब्यात घेतला. इ.स. १६७६ मध्ये जाफर लष्करी बेग हा किल्लेदार औरंगजेबाच्या परवानगीविना थालनेरच्या किल्लेदाराच्या भेटीस गेला. म्हणूनच औरंगजेबाने त्याची २० स्वरांची मनसब काढण्याची शिक्षा दिली. इ.स.१७५२ मध्ये निजामाशी झालेल्या भालकीच्या तहान्वये हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. त्या वेळी पेशव्यांनी हा परगणा मल्हारराव होळकरांच्या ताब्यात दिला. शेवटी इ.स.१८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.