शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका"; अजित पवार ग्रामस्थांशी काय बोलले?
2
Maharashtra Election 2024: गुलाबराव विरुद्ध गुलाबराव; मंत्री बनवणाऱ्या 'या' मतदारसंघात चुरशीची लढत
3
“बंडखोरी केलेले लोक आमचेच, समजूत काढण्यात यश येईल”; देवेंद्र फडणवीसांना विश्वास
4
चेन्नईनं १८ कोटी का मोजले? Ravindra Jadeja नं मुंबईच्या मैदानात दिलं उत्तर
5
अबू आझमींच्या अडचणी वाढणार?; सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार; प्रकरण काय?
6
"इंपोर्टेड माल", अरविंद सावंत यांनी आक्षेपार्ह शब्द वापल्याचा शायना एनसींचा आरोप, सावंत म्हणाले...
7
अग्निकल्लोळ! देवघरातील दिव्यामुळे लागली भीषण आग; दिवाळीच्या दिवशी ३ जणांचा मृत्यू
8
५०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत BSNL चा प्लॅन; दीर्घ वैधतेसह मिळणार एक्स्ट्रा डेटा
9
शरद पवार गटाचे उमेदवार समजीत घाटगे अंतरवालीत; मनोज जरांगेंची घेतली भेट, २ तास चर्चा
10
IPL 2025 : स्टार्क, KL राहुल ते मॅक्सवेल! टॉप-१० खेळाडू ज्यांना संघांनी दाखवला बाहेरचा रस्ता
11
"हिरवे कंदिल लावले असते, तर..."; मनसेचा शिवसेना ठाकरे गटाला थेट सवाल
12
शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या प्रचारात; भाजपच्या बंडखोर महिला नेत्याचा मोठा दावा
13
दररोज 6 कोटी रुपयांची फसवणूक, 'डिजिटल अरेस्ट' घोटाळ्यात हराजो लोकांचे नुकसान
14
महायुतीत बंडखोरांचा ३६ चा आकडा, त्यापैकी १९ भाजपाचे; बंड शमले नाहीतर युती-आघाडीला ५० जागांवर फटका
15
Aishwarya Rai Birthday: इन्स्टावर १४.४ मिलियन फॉलोवर्स, पण 'त्या' एका व्यक्तीलाच फॉलो करते मिस वर्ल्ड, कोण आहे ती?
16
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
17
'इमर्जन्सी' ही प्रोपोगंडा फिल्म आहे का? श्रेयसने विचारलेला कंगनाला प्रश्न! अभिनेत्री म्हणाली-
18
"तू तो गया"! सिली पॉइंटवर Sarfaraz Khan चं रचिन विरुद्ध 'स्लेजिंग'; व्हिडिओ व्हायरल
19
८ नोव्हेंबरपासून 'या' कंपनीचा IPO खुला होणार; प्राईज बँड ₹२४, परदेशात आहेत कंपनीचे ग्राहक
20
“मनोज जरांगेंच्या रुपात देशाला आधुनिक गांधी, आंबेडकर, मौलाना आझाद मिळाले”; कुणी केले कौतुक?

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि आपली जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2022 8:01 AM

प्रत्येकाच्या आयुष्यात शाळकरी दिवसांविषयी एक हळवा कोपरा असतो. पण याच मुलांच्या आत्महत्यांचे वाढते प्रमाण समाजाची चिंता वाढवणारे आहे.

- डॉ. हमीद दाभोलकर, मनोविकारतज्ज्ञ आणि अंनिस कार्यकर्ते

शाळेच्या दिवसांविषयी बहुतांश जणांच्या मनात एक हळवा कोपरा असतो. आपल्या आयुष्यातील ते सगळ्यात छान दिवस होते असे अनेक जणांना वाटत असते. या पार्श्वभूमीवर जेव्हा आपल्या देशात दहा हजारांपेक्षा जास्त शाळकरी मुलांनी आत्महत्या केल्याची बातमी आपल्याला कळते,  तेव्हा एकदम धक्का बसू शकतो. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय क्राइम रेकोर्ड ब्युरोच्या रिपोर्टमधील ही अस्वस्थ करणारी आकडेवारी आहे. वृत्तपत्रात  शाळकरी मुलांच्या आत्महत्येची बातमी आपण कधी ना कधी वाचलेली असते. काही वेळापुरते त्याविषयी आपल्याला हळहळ वाटते आणि आपण ही गोष्ट विसरून जातो. ज्या वयात अजून मुलांना जीवनाचे पुरेसे आकलनदेखील झालेले नाही त्या वयातील मुले जर आत्महत्या करत असतील तर समाज म्हणून आपल्या सगळ्यांना गंभीर विचार करणे आवश्यक आहे. 

शाळकरी मुले आत्महत्या का करतात याच्या कारणाचा विचार केला तर त्यामध्ये अभ्यासाचा वाढता ताण हे एक महत्त्वाचे कारण दिसून येते. समाजातील वाढती स्पर्धात्मकता ही शाळकरी मुलांसाठी शब्दश: जीवघेणी ठरते आहे. ‘एखाद्या परीक्षेत अपयश येणे म्हणजे संपूर्ण आयुष्यात अपयशी ठरणे’ अशी जी समाजधारणा आपण तयार केली आहे, त्याचा खूप मोठा नकारात्मक प्रभाव या मुलांच्या मानसिकतेवर पडत आहे. कोविडच्या कालखंडात शालेय शिक्षणात ज्या अडचणी निर्माण झाल्या त्यामधूनदेखील अनेक मुले अजून पूर्ण सावरू शकलेली नाहीत.  

पालकांबरोबरच्या नात्यामधील ताण हेदेखील एक महत्त्वाचे कारण आहे. अनेकवेळा नकार पचवता आला नाही म्हणूनदेखील शाळकरी मुलांच्या आत्महत्या होताना दिसतात. ‘पालकांनी मोबाइल देण्यास नकार दिला किंवा मित्र, मैत्रिणींनी प्रेमाच्या भावनेला हवा तसा प्रतिसाद दिला नाही’, अशा कारणांमुळेही शाळकरी मुलांच्या आत्महत्या झालेल्या दिसतात. मैत्री-प्रेम-आकर्षण यामधील फरक लक्षात न येणारे हे वय आहे. सिनेमा आणि सोशल मीडिया यांच्या प्रभावातून याविषयी खूप सारी चुकीची माहिती मुलांपर्यंत पोचते. त्यामुळेदेखील मनात गोंधळ होऊन टोकाचे निर्णय घेतले जातात. 

शाळकरी मुलांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर पालक, शाळा आणि शिक्षण संस्था या सगळ्यांनी एकत्र प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपल्या शालेय अभ्यासक्रमात मानवी शरीराविषयी माहिती असते त्याप्रमाणे मानवी मन, ताणतणाव आणि ते हाताळण्याचे सोपे मार्ग याविषयी धडे समाविष्ट करणे काळाची गरज आहे. मुलांना येणारे ताण-तणाव कसे ओळखायचे आणि ते कशाप्रकारे हाताळता येऊ शकतात, याविषयी सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण होणे आवश्यक आहे. पालकसंघांनीदेखील या कामी पुढाकार घ्यायला पाहिजे. 

शाळेमध्ये समुपदेशक असणे ही गोष्ट आपल्याकडे फार कमी शाळांमध्ये दिसून येते. शाळकरी मुलांना त्यांच्या वयात पडणारे प्रश्न, त्याची उत्तरे त्यांना योग्य वेळी मिळावीत यासाठी शाळेत समुपदेशक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 

शाळकरी मुलांमध्येदेखील अनेक वेळा मानसिक आजारांची सुरुवातीची लक्षणे दिसून येतात. अशा वेळी ‘समाज काय म्हणेल?’, असा विचार न करता मोकळेपणाने मनोविकार तज्ज्ञांची मदत घ्यायला हवी. देशाचे भविष्य शाळांच्या खोल्यांमध्ये घडत असते असे म्हटले जाते. मानसिकदृष्ट्या आनंदी आणि ताणतणावांना सामोरे जाऊ शकणारी पिढी घडविण्यासाठी आपण सर्वांनी मुलांच्या भविष्य आणि भवितव्यासाठी सजग असायलाच हवे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Studentविद्यार्थी