शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

अवकाश तंत्रज्ञानातील ‘सुपर’ घडामोडी

By admin | Published: March 27, 2016 12:43 AM

विविध तंत्रज्ञान क्षेत्रात जग भरारी घेत असताना, अवकाश तंत्रज्ञान (Space Technology) तरी मागे कशी राहणार? अवकाश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातदेखील सध्या एकदम ‘सुपर’ घडामोडी घडत

(लोक'तंत्रा')
- प्रसाद ताम्हनकर
 
विविध तंत्रज्ञान क्षेत्रात जग भरारी घेत असताना, अवकाश तंत्रज्ञान (Space Technology)  तरी मागे कशी राहणार? अवकाश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातदेखील सध्या एकदम ‘सुपर’ घडामोडी घडत आहेत. सुपरसॉनिक विमानांपासून ते भारताच्या स्वत:च्या GPS प्रणालीपर्यंत अनेक नवनव्या कल्पना प्रत्यक्षात उतरत आहेत. सुपरसॉनिक प्रवासी विमानेअविश्वसनीय अशा वेगाने प्रवास करणाऱ्या आणि कमी आवाज निर्माण करणाऱ्या प्रवासी सुपरसॉनिक विमानांच्या बांधणीसाठी नासाने नुकतीच मंजुरी दिली. २०१७च्या वित्त वर्षापासून या ‘एक्स सिरीज’ विमानांच्या तयारीला सुरुवात होईल. सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य, पर्यावरणाची सुरक्षा आणि कमीतकमी आवाज निर्मितीच्या उद्दिष्टांसह या मोहिमेची सुरुवात होत आहे. लॉकहिड मार्टिन कंपनीला यासाठी २ कोटी डॉलर्सचे पहिले कंत्राट देण्यात आले आहे. ही कंपनी विमानांचे डिझाइन, बांधणी आणि इतर सर्व टेस्टसाठी नेमण्यात आलेली आहे.भारताची GPS प्रणालीनुकतेच भारताने आपल्या स्वत:च्या IRNSS-1E ह्या नेव्हीगेशन सॅटेलाईटचे श्रीहरीकोटा येथील अंतरीक्ष केंद्र्रावरून यशस्वी प्रक्षेपण केले. या यशस्वी प्रक्षेपणामुळे भारत आता स्वत:ची ‘satellite navigation systems’  असलेल्या देशांच्या यादीत जाऊन बसण्याच्या अगदी जवळ पोचला आहे. इस्रोच्या माहितीनुसार, लवकरच अजून एक ‘navigation satellite’ अवकाशात सोडून ह्या सिस्टिमच्या पूर्णत्वासाठी गरज असलेल्या एकूण सात navigation satelliteच्या अवकाश स्थापनेची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. ह्या जोडीलाच स्टॅण्ड बाय म्हणून अजून दोन navigation satellite हे जमिनीवरती कार्यरत असतीलच. पहिल्या पाच सॅटेलाईट्सकडून यशस्वी संदेशांचे प्रसारण होत असल्याची माहितीदेखील ह्या वेळी देण्यात आली.उपग्रह प्रक्षेपणासाठी भारताचे सहकार्यअमेरिकेतील एका आघाडीच्या अंतराळ कंपनीने नुकतेच त्यांच्या ‘Communication Satellite’चे प्रक्षेपण करण्यासाठी भारतीय कंपनी ‘Antrix Corporation’ बरोबर चर्चेस सुरुवात केली आहे. या उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी भारताच्या उपग्रहवाहक (heavy rocket Geosynchronous Satellite Launch Vehicle (GSLV) ची मदत घेण्यासंदर्भात ही चर्चा सुरू आहे. नुकतीच ह्यासंदर्भात लोकसभेत एका प्रश्नावर दिलेल्या उत्तरात ही माहिती देण्यात आली.  Antrix हा भारताच्याच अवकाश संशोधन संस्थेचा (Indian Space Research Organisation (Isro))  विभाग आहे. या उपग्रहवाहकाच्या मदतीसाठी अमेरिकेबरोबरच फ्रान्स, कॅनडा, कोरिया आणि टर्कीसारखे देशदेखील उत्सुक आहेत. भारताकडे उपग्रह प्रक्षेपणासाठी GSLV-Mark II आणि Polar Satellite Launch Vehicle (PSLV) असे दोन उपग्रहप्रक्षेपक उपलब्ध आहेत.