शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराला जाताना ठाकरे गटाच्या उमेदवाराला आला हार्ट अटॅक; तातडीनं रुग्णालयात दाखल
2
लोकसभेला शब्द देऊनही अजित पवारांनी पुरंदरमध्ये उमेदवार दिला; विजय शिवतारे संतापले...
3
“PM मोदींना महाराष्ट्रात ७-८ सभा घ्याव्या लागतात, स्वाभिमानी जनतेचा हा विजय”; सुप्रिया सुळेंचा टोला
4
"अजित पवार जे बोलले, याचं दुःख आयुष्यभर राहिल"; सुप्रिया सुळेंनी सुनावलं
5
शिंदेंचा कोल्हापुरात काँग्रेसला मोठा धक्का! विद्यमान आमदार जयश्री जाधव शिवसेनेत
6
Gold Price on Diwali: दिवाळीत वाढली सोन्या-चांदीची चमक; खरेदीपूर्वी पाहा खिशावर किती भार पडणार?
7
अंतरवाली सराटीत निर्णायक बैठक; समीकरण जुळले तर गोरगरीब सत्तेत बसेल, जरांगेंची भूमिका
8
ऐन दिवाळीत पाकिस्तानात 'ग्रीन लॉकडाऊन'!, याचा नेमका अर्थ काय? असा निर्णय का घेतला?
9
दिवाळीला शिंदे-ठाकरे गटाचे उमेदवार एकत्र, सोबत केली विठुरायाची आरती
10
लग्नानंतर पहिली दिवाळी एकत्र साजरी करण्यापूर्वीच कपलसोबत आक्रित घडलं अन् सारचं संपलं
11
“४४ वर्षे निष्ठेने काम केले, पण तिकीट नाकारले”; काँग्रेस नेते फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात
12
वळसे पाटलांच्या पराभवासाठी काय करायला हवं?; निकमांच्या कार्यकर्त्यांना शरद पवारांचा कानमंत्र
13
पुढील मुख्यमंत्री भाजपाचा, राज ठाकरेंच्या विधानावर CM एकनाथ शिंदे काय म्हणाले..?
14
प्रकाश आंबेडकर छातीत दुखू लागल्याने पहाटेच हॉस्पिटलमध्ये दाखल; अँजिओग्राफी होणार
15
कशी ठरते तुमची CTC; बेसिक सॅलरी, ग्रॉस सॅलरी आणि नेट सॅलरीत फरक काय? जाणून घ्या
16
“मनसे साथीने भाजपाचा CM होणार”; राज ठाकरेंच्या विधानावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
DC ला आली पहिल्या प्रेमाची आठवण? हेच असू शकतं पंतच्या 'ब्रेकअप' मागचं कारण 
18
'फॅन्ड्री'मधील जब्या आणि शालूने केलं लग्न ? मंडपातील फोटो व्हायरल
19
...म्हणून श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापलं, दीपक केसरकर यांनी नेमकं कारण सांगितलं
20
गुजरातमध्ये राष्ट्रीय एकता दिनी झळकला दुर्ग रायगड; पंतप्रधान मोदींनी मराठीतून दिली प्रतिक्रिया

राजकीय लेख - बारामतीच्या मैदानात नणंद-भावजयीचा सामना?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2024 6:35 AM

अजित पवार यांनी बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध आपल्या पत्नीला उभे करावे असे भाजपकडून त्यांना सुचविण्यात आल्याचे कळते!

हरिश गुप्ता

भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या जागा आणि मतांची संख्या वाढविण्याचा निर्धार केला असल्याने मित्र पक्षांनी आपापल्या राज्यात त्यासाठी जोर लावावा, असे हा पक्ष त्यांना सांगत आहे. महाराष्ट्रातील भाजपचा महत्त्वाचा मित्रपक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने बारामती, सातारा, शिरूर आणि रायगड या चारही जागा खेचून घ्याव्यात, असा मनसुबा रचण्यात आला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या जागा शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकलेल्या आहेत.

शरद पवार यांनी  पारंपरिक बारामती लोकसभा मतदारसंघात कन्या सुप्रियाच आपली वारसदार असेल हे स्पष्ट केले आहे. परंतु, अजित पवार यांनी अचानक बंड करून पक्षातील बहुसंख्य आमदार हाताशी धरले आणि भाजप-(शिंदे) सेनेच्या सरकारमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सगळे चित्र पालटले. ४० आमदार अजित पवार यांच्याबरोबर आहेत. भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध आपल्या पत्नीला उभे करावे, असे त्यांना सुचविण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्यामध्ये गेल्या कित्येक दशकांची मैत्री असूनही हे डावपेच आखण्यात येत आहेत, कारण बदललेला काळ ! 

राज्यसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व सहा जागा जिंकायचे, असे भाजपने ठरविल्याचे कळते. राष्ट्रीय लोकशाही आघाडी पाच जागा जिंकू शकते. परंतु, विरोधकांच्या छावणीत असलेले काही आमदार भाजपकडे वळवता आले तर सहावी जागाही जिंकता येईल, असे राजकीय पंडितांचे म्हणणे आहे. २८८ सदस्यांच्या सभागृहात काँग्रेसचे ४१ आमदार आहेत. आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा गट किंवा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा गट स्वबळावर एकही जागा जिंकू शकत नाही. थोरले पवार बारामतीत सहानुभूतीचा आधार घेऊ शकतात, अशी बातमी आहे. ‘माझ्या आयुष्यातली ही शेवटची निवडणूक’ असे ते सांगतील. अर्थात, त्याचा किती उपयोग होईल, हे येत्या मे महिन्यात कळेलच!

विश्वासाआधीचा अविश्वासहरयाणात साधारणतः ४५ वर्षांपूर्वी आयाराम-गयाराम यांनी धुमाकूळ घातला होता. त्यांचे सर्व विक्रम थोर ‘पलटूराम’ यांनी मोडून काढले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये समझोत्याचे प्रयत्न चालले असताना मध्यस्थांना एक अडचण दिसली. आपला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा लगेच स्वीकारला जावा, भाजपने त्याच वेळी पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना द्यावे आणि लगेचच राज्यपालांनी आपल्याला नेमणुकीचे पत्र द्यावे, अशी त्यांची मागणी होती. दिवस मावळायच्या आत शपथविधी समारंभ व्हावा, असा आग्रह देखील त्यांनी धरला होता. इकडे भाजपची वेगळीच अडचण होती. नितीश कुमार यांना पाठिंबा देण्यासाठी विधिमंडळ पक्ष आमदारांची बैठक झालेली नव्हती. अशा स्थितीत राज्यपालांना पाठिंब्याचे पत्र कसे देणार, असा प्रश्न होता. पण, संशयाने घेरलेले नितीश कुमार अट मान्य झाल्याशिवाय समझोता मान्य करायला  तयार नव्हते. शेवटी भाजपने त्यांच्या अटी मान्य करून टाकल्या आणि एक प्रस्ताव मांडला; तो म्हणजे लोकसभा निवडणुकीचे जागावाटप गुणवत्तेवर होईल;

२०१९ च्या निकालाच्या आधारे होणार नाही.पडद्यामागे ही अशी खेळी खेळली गेल्यानंतर शेवटी एकदाचे नितीश कुमार तयार झाले आणि भाजप सत्तेवर आला. गमतीची गोष्ट म्हणजे नितीश कुमारांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे बिहारमधील प्रमुख म्हणूनही नेमण्यात आले आहे.

अडवाणींना भारतरत्न का? मोदी सरकारने समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांना २०२३ मध्ये पद्मविभूषण दिल्यापासून भाजपचे कट्टर कार्यकर्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाराज होता. मुलायम यांच्याच सरकारने अयोध्येत रामभक्तांवर गोळीबार केला होता, कारसेवक आणि पोलिसात त्यावेळी चकमक उडाली होती हे ते कसे विसरतील?  या पार्श्वभूमीवर मुलायम यांना पद्मविभूषण दिल्यावर संघ परिवारात नाराजी होतीच. २००३ साली दत्तोपंत ठेंगडी यांनी पद्मभूषण नाकारले होते. संघाचे संस्थापक  हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांना भारतरत्न दिले जात नाही तोवर आपण हा पुरस्कार स्वीकारणार नाही, अशी त्यांची भूमिका होती. पद्म पुरस्कारांविषयी संघ गेल्या कित्येक दशकांपासून मौन बाळगून आहे. म्हणूनच मोदी सरकारने अडवाणी यांना भारतरत्न जाहीर केल्यावर संघाच्या वर्तुळातून कोणतीही प्रतिक्रिया उमटली नाही. मात्र, सामान्य भाजप कार्यकर्ता बेहद खुश झाला. कारण फक्त दोन खासदारांपासून लोकसभेत पक्षाची ताकद  १८२ पर्यंत नेण्याचे काम अडवाणींनी केलेले आहे, असे तो मानतो. 

मोदींना हव्यात ३७० जागा भाजप आगामी लोकसभा निवडणुकीत ३७० जागा जिंकेल आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी ४०० जागांचा टप्पा पार करील, असे मोदींनी लोकसभेत जाहीर केले. आता हे उद्दिष्ट गाठण्यासाठी भाजप महाराष्ट्र, बिहार आणि इतरत्र असलेल्या  मित्रपक्षांच्या शेपट्या पिरगाळत आहे. नितीश कुमार यांनी १७ ऐवजी १० ते १२ जागा लढवाव्यात, अशी पक्षाची अपेक्षा आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नितीशकुमार यांना दिलेल्या पाच जागा भाजप परत मागतो आहे. २०१९ साली भाजपने महाराष्ट्रात शिवसेनेबरोबरच्या युतीत २५ जागा लढवल्या; आता अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेचा शिंदे गट यांनी ज्या जागा ते जिंकू शकतील तेवढ्याच लढवाव्यात, असे भाजप त्यांना सुचवित आहे. या नाजूक मुद्द्यावर अजून अंतिम निर्णय झालेला नाही.

(लेखक लोकमतचे नॅशनल एटिडर आहेत)

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळेBaramatiबारामतीlok sabhaलोकसभा