- महेश चेमटेभारतीय वाहतूक व्यवस्थेतील जनसुसह्य वाहतूक व्यवस्था म्हणून रेल्वेकडे पाहिले जाते. देशातील सर्व रेल्वे सेवांचे पालकत्व रेल्वेमंत्र्यांकडे असते. यामुळेच केंद्रीय मंत्रीमंडळात रेल्वेमंत्री हे प्रमुख जबाबदारीचे पद आहे. हे पद जबाबदारीसह जोखीमेचेही असल्याचे रेल्वे अपघातांवरुन दिसून येते. रेल्वे अपघातामुळे राजीमाना देणारे सुरेश प्रभू हे पहिलेच रेल्वे मंत्री नाही. या आधी देखील रेल्वेमंत्र्यांचा ‘अपघाता’ ने घात केला आहे. रेल्वेतील अपघातामुळे रेल्वेमंत्र्यांचे राजीनामा, अपघाताची कारणे आणि रेल्वेला पर्याय विमान प्रवास या बाबींवरील शब्द-प्रवास ‘अपघात’ काले ‘राजीनामाय’ बुद्धी यात मांडण्यात आला आहे.यंदा (२०१६-१७) रेल्वे अपघातात २३८ नागरीकांचा मृत्यू झाला आहे. रेल्वे बोगी रुळावरुन घसरल्यामुळे सर्वाधिक १९३ जण मरणमार्गावर स्वार झाले. उपलब्ध आकडेवारीनूसार गत १७ वर्षातील आकडेवारीच्या तुलनेत हा आकडा सर्वाधिक आहे. २०१५-१६ साली १२२ जणांचा मृत्यू झाला.यात बोगी घसरल्यामुळे ३६ जणांचा समावेश आहे. देशातील रेल्वे प्रवाशांना सुरक्षित प्रवास देण्यास सक्षम नाही. हे या आकडेवारीवरुन हे सत्य पुन्हा एकदा ठळक होत आहे.१ एप्रिल ते १५ आॅगस्ट २०१७ या कालावधीत रेल्वे मार्गावर एकणू २२ अपघात झाले आहेत. यात रेल्वे बोगी घसरल्याची १८ प्रकरणे आणि लेव्हल क्रॉसिंग अपघाताची ४ प्रकरणे यांचा समावेश आहे.रेल्वे अपघात आणि रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षितेबाबत रेल्वे मंत्रालय गंभीर नसल्याचे आकडे बोलत आहे. राज्यसभेत सादर केलेल्या आकड्यांवरुन दिसून येतो. ११ आॅगस्टरोजी राज्यसभेत प्रश्न क्रमांक ३००७ याला उत्तर देताना २०१५-१६ मध्ये १०७ अपघातात १२२ जणांचा मृत्यू झाला. २०१६-१७ मध्ये १०४ रेल्वे अपघातात २३८ जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी मांडण्यात आली. मात्र प्रश्न क्रमांक ३०२३ मध्ये २०१५-१६ या कालावधीत १०७ रेल्वे अपघातात ९७ आणि २०१६-१७ या कालावधीत १०४ रेल्वे अपघातात १८१ जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी सादर करण्यात आली.अपघाताची कारणेअनेक दशके सेवा देणाºया रेल्वे रुळांच्या क्षमतेची झीज होत आहे. त्याचप्रमाणे रुळावर नियंत्रण करणारी सिग्नल यंत्रणादेखील दोषरहीत असल्याचे दिसून आले आहे. मानव रहीत रेल्वे क्रासिंग ही रेल्वे अपघाताची प्रमुख कारणे असल्याचे दिसून येते. प्रत्यके अपघातानंतर कनिष्ठ ते वरिष्ठ सर्व अधिकाºयांचे ‘स्टेस्टमेंट’ नोंदवले जाते. कारवाईचे संकेत देण्यात येतात. मात्र अपघाताचा दाह मिटण्याआधी संपूर्ण रेल्वे व्यवस्था पुन्हा कामावर रुजू होते.अपघातानंतर ठरलेल्या कारणांचा अहवाल पुढे सरकवण्यात येतो. यात सुरक्षा निधीची कमतरता, विशिष्ठ थांबा घेण्यासाठी यंत्रणेवर असलेला दबाव, देखरेखीचे काम करण्यासाठी अपुरे मनुष्यबळ आणि मावनी चुकां या कारणांचा यात समावेश होतो. एक्सप्रेसमधील लोको पायलट यांनी केलेल्या तक्रारींदेखील विचारात घेणे आवश्यक आहे.विश्रांती घेण्यासाठी पुरेसे आसन नसणे, योग्य वेळी लंच ब्रेक नसणे, ड्यूटी वेळात शौचालयाची सोय नसणे अशा लोको पायलटच्या प्रमुख तक्रारी आहे. नादुरुस्त सिग्नल यंत्रणा आणि हवामानाच्या परिस्थितीमुळे देखील चुकीच्या पद्धतीने रुळ बदलला गेल्यास बोगी रुळावरुन घसल्याचे दिसून येते.प्रभू राजीनाम्याचे तत्कालीन कारण-१० दिवसांत ३ अपघातआॅगस्ट महिना रेल्वेसाठी अपघाती महिना ठरला. २९ आॅगस्टला राज्यात आसनगाव येथे नागपुर-मुंबई दुरांतो एक्सप्रेसचे डब्बे घसरले. तत्पुर्वी २३ आॅगस्टला उत्तर प्रदेश येथे कैफियत एक्सप्रेस घसरल्यामुळे ८१ प्रवासी जखमी झाले. १९ आॅगस्टला उत्तरप्रदेश मध्येच कालिंगा उत्कल एक्सप्रेस घसरल्याने २२ प्रवाशांचा मृत्यू होऊन २०० पेक्षा जास्त जखमी झाले. रेल्वेचे पालकत्व असलेल्या प्रभूंनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला.
सुरेश प्रभूंची ‘अपघात’काले ‘राजीनामा’य बुद्धी !!!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 2:26 AM