- योगेंद्र यादव, अध्यक्ष स्वराज इंडिया
या देशाच्या विद्यमान परिस्थितीला स्वधर्माच्या प्रकाशात पारखून पाहिले पाहिजे, असे या लेखाच्या पूर्वार्धात मी म्हटले होते. आज जे होते आहे, ते बरोबर आहे की चूक, अभिमानाचा विषय आहे की शरमेचा, याचा निर्या आपण आपल्या आग्रह दुराग्रहाच्या आधारे करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला केवळ कोणीतरी मारून मुटकून तयार केलेली किंवा उधार घेतलेली विचारधारा उपयोगी पडणार नाही. एखाद्या देशाच्या प्रवासाचे मूल्यमापन स्वधर्माच्या आधारे होऊ शकते.
राष्ट्रीय आंदोलनाच्या काळात आपण आपल्या संस्कृतीचा वारसा आणि पश्चिमी विचारांमध्ये झालेला संवाद आणि संघर्षाच्या ऐतिहासिक प्रक्रियेतून जन्माला आलेला भारतीय स्वधर्म शेवटी आहे तरी काय?
- भारतीय संस्कृतीच्या शील, करुणा आणि मैत्री या तीन शाश्वत मूल्यांचा संगम भारताच्या स्वधर्मामध्ये आपल्याला शोधता येतो; परंतु हे तिन्ही आदर्श प्राचीन स्वरुपात आपल्या राज्यघटनेमध्ये आणले गेलेले नाहीत. स्वातंत्र्य आंदोलनाच्या वेळी या आदर्शांची साफसफाई झाली आणि आधुनिक युरोपच्या तीन आदर्शांशी त्याचा अत्यंत सखोल संवाद झाला. फ्रेंच राज्यक्रांतीतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या उद्घोषाला भारतीय मनाने आपल्या पद्धतीने ऐकले.
विसाव्या शतकातील उदारवाद, समाजवाद आणि सेक्युलरवादाच्या विचार प्रवाहांना आपल्या वैचारिक चाळणीने चाळून घेतले. या मंथनातून लोकशाही कल्याणकारी राज्य आमि सर्वधर्मसमभावाची देशी, परंतु आधुनिक अशी समज तयार झाली. या खास हिंदुस्तानी आधुनिकतेत भारतीय गणतंत्राच्या सर्वधर्माची तीन पायाभूत सूत्रे विसलेली आहेत. अलग अलग धर्मीयांच्यामध्ये सौहार्द सांभाळणे ही आधुनिक भारताची समस्या आहेत. आपल्या देशात वेगवेगळ्या प्रकारची धार्मिक विविधता आहे. सर्व धार्मिक समुदाय सार्वजनिकरित्या आपापल्या धार्मिक आस्था दाखवत असतात. त्यातल्या अनेक समुदायांचे एकमेकांशी सौहार्द दिसते. तसेच त्यांच्यात संघर्ष झाल्याचेही इतिहास सांगतो. म्हणून भिन्नभिन्न मते आणि भिन्न भिन्न धर्मीयांमध्ये समभाव प्रस्थापित करणे घृणा आणि हिंसा रोखणे, धार्मिक संस्थांचे नियमन करणे आणि आंतरिक कुप्रथा सुधारणे हे आपल्यापुढील आव्हान आहे.
म्हणून आस्थाहीन किंवा अनिश्वरवादी सेक्युलरवाद आपल्या समस्येचे उत्तर नाही. भारताच्या स्वधर्मात स्वधर्मीयांची एक अशी दृष्टी आहे, जी धार्मिकतेचा आदर करते. सर्व पंथांबद्दल समभाव राखते. जी मैत्रीच्या भावनेतून उत्पन्न झालेली असते आणि देशधर्मी असते. आपल्या राज्यघटनेत वर्णन केलेल्या सामाजिक आर्थिक आणि समतेच्या मुळाशी करुणेचा विचार आहे. तो आपल्या परंपरेमध्ये होता. करुणेची प्रवृत्ती जीवाचे दुःख हलके करण्यासाठी असते. आधुनिक काळात करुणाची प्रवृत्ती सामूहिक आदर्शांचे रुप घेते. उर्वरित जगाप्रमाणे आपल्या देशातही आधुनिक समाजवादाचे विचार आणि रशियन क्रांतीच्या प्रभावाखाली करुणेची व्याख्या केली गेली. समतेचा विचार आदर्श समाजाच्या निर्मितीच्या केंद्रस्थानी आला. समतेची जबाबदारी कोण्या एका व्यक्तीची नाही तर ती राज्यव्यवस्थेची जबाबदारी मानली गेली आहे.
लोकशाहीचा विचार आधुनिक आहे आणि त्यातील संस्था पश्चिमी व्यवस्थेतून उसन्य घेतलेल्या आहेत; भारतीय लोकशाहीने पश्चिमी लोकशाहीचे शरीर तर घेतले; परंतु त्यात आपले प्राण फुंकले. भारतीय लोकशाही संस्था किंवा प्रक्रियेपेक्षाही लोकांचे कल्याण, लोकमत याला अधिक महत्त्व देते. अहंकार आणि मतभिन्नतेचे दमन भारतीय लोकशाही संस्काराच्या विरुद्ध आहे.
आता शेवटचा प्रश्न: गेल्या काही वर्षांत भारताचे बदलते स्वरुप आपल्या या स्वधर्माच्यानुसार आहे काय?
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"