शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

पंचाहत्तरीतला तरुण ज.वि.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 4:59 AM

आंबेडकरी चळवळीचे खंदे कार्यकर्ते ज. वि. पवार हे १५ जुलै रोजी ७५ वा वाढदिवस साजरा करीत आहेत.

- रतन बनसोडेआंबेडकरी चळवळीचे खंदे कार्यकर्ते ज. वि. पवार हे १५ जुलै रोजी ७५ वा वाढदिवस साजरा करीत आहेत. त्यानिमित्त त्यांच्या कारकिर्दीचा आढावा... हा बहुआयामी कार्यतत्पर कार्यकर्ता आणि कोणताही शासकीय पुरस्कार तसेच १० टक्क्यांचे घरसुद्धा नाकारणारा हा नेता कायमच दुर्लक्षित राहिला, त्यांच्या कार्याचे चीज झाले नाही. म्हणून मा. भीमराव आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या ‘ज. वि. पवार अमृतमहोत्सवी गौरव समिती’तर्फे मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात गौरव ग्रंथाचेही प्रकाशन करण्यात येणार आहे.एखाद्या राजकीय नेत्याच्या वारसदारांच्या दोन - तीन पिढ्यांबरोबर कार्यरत असणारे कार्यकर्ते, अनेक नेते इतिहासाच्या पानापानांवर दिसतात. याचे कारण त्यात राजकीय स्वार्थ असतो. परंतु कोणत्याही प्रकारची राजसत्ता नसलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या महापुरुषाच्या एक दोन नव्हे, तर चार पिढ्यांबरोबर सतत कार्यरत राहण्याचा जागतिक विक्रम करणारे आंबेडकरी चळवळीचे कर्ते व्यक्तिमत्त्व म्हणजे ज. वि. पवार. डॉ. बाबासाहेबांबरोबर कार्य करण्याची संधी मिळाली नसली तरी बाबासाहेबांच्या द्वितीय पत्नी डॉ. माईसाहेब आंबेडकर, बाबासाहेबांचे एकमेव सुपुत्र भय्यासाहेब व स्नुषा मीराताई, बाबासाहेबांचे नातू प्रकाशजी तथा बाळासाहेब, भीमराव, आनंदराज, अंजलीताई आंबेडकर, जावई आनंदराव तेलतुंबडे व पणतू सुजात या चार पिढ्यांबरोबर नि:स्वार्थपणे चळवळ करणारे ज.वि. आता पंचाहत्तरीत प्रवेश करते झाले आहेत.ज. वि. पवार हे नुसते कार्यकर्ते - नेते नाहीत तर ते आहेत चळवळीचे कर्ते विश्लेषक. कणाहीन माणसाला ताठर कणा देणारे बाबासाहेब हे एकमेव समाजशास्त्रज्ञ ठरले आहेत. ‘मूकनायक’ ते ‘प्रबुद्ध भारत’ या वाटचालीत आंबेडकरी चळवळीवर लिहिणारे खूप आहेत, परंतु अभ्यासकांना व चळवळ्यांना उपयुक्त ठरेल असे ‘आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ’ खंड रूपाने लिहिणारे ज.वि. आज दुसरे चा. भ. खैरमोडे ठरले आहेत. आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या पाच खंडांमुळे जो चळवळ जाणतो तोच चळवळ करू शकतो या बाबासाहेबांच्या चळवळीत बी. सी. कांबळे, शंकरराव खरात, दा. ता. रूपवते, घनश्याम तळवटकर यांसारखे लेखक होते. त्यांनी आंबेडकरी चळवळीचा साद्यंत इतिहास लिहायला पाहिजे होता. या सगळ्यांशी ज.विं.ची घनिष्ट ओळख होती. ज.वि. यांनी मात्र नवी वाट चोखाळली, त्यामुळेच ते आज आंबेडकरी चळवळीचे इतिहासकार ठरले आहेत.ज.वि. नुसते लिहीतच राहिले नाहीत तर त्यांनी आंबेडकरी चळवळीला उभारी आणण्यासाठी कष्ट घेतले. १९६५ - १९७० या काळात दलितांवरील वाढलेले अन्याय, अत्याचाराविरुद्ध त्यांनी ‘दलित पँथर’ नावाचे लढाऊ आंदोलन छेडले; समस्त दलितांना अभय दिले आणि शासनावर वचक बसविला. शासनाने आणि शासकीय पुंडानी अनेक वेळा बाबासाहेबांचा अवमान केला, तेव्हा त्याविरुद्ध ज.वि. यांनी लढा उभारला. कधी रस्त्यावर तर कधी कोर्ट कचेऱ्यांच्या माध्यमाने. दाक्षिणात्य नायर नावाच्या प्रायोजकाने एका सिरीयलद्वारे गांधीजींचा बहुमान आणि बाबासाहेबांचा अवमान केला होता. तेव्हा उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावून बाबासाहेबांचा अवमान रोखण्यासाठी चित्रीकरण रोखले ते ज.वि. यांनीच. मुलायम सिंग आणि अनुपम खेरसारख्या नेत्या आणि अभिनेत्यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकारकत्व नाकारले तेव्हा ज.वि. यांची लेखणी, लेखणी न राहता तलवार ठरली होती.जागतिक वाचकांनी ज.विं.च्या ऋणात राहावे असे एक अत्यंत महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचे अप्रकाशित साहित्य महाराष्ट्र सरकारला प्रकाशित करण्यास भाग पडले. हे अप्रकाशित साहित्य डॉ. माईसाहेब आंबेडकर व भय्यासाहेब आंबेडकर यांच्या सहमतीने मुक्त केल्यामुळे बाबासाहेबांचे इंग्रजी साहित्य प्रकाशित होऊ शकले. ज.विं.नी याचे श्रेय कधीही घेतले नाही. एका जाहीर सभेत भीमराव आंबेडकरांनी हे स्पष्ट केल्यामुळे आमच्यासारख्यांना ज.विं.चे कर्तृत्व कळले.‘मी भारत बौद्धमय करेन’ असे म्हणणाºया बाबासाहेबांचे पुत्र भय्यासाहेब प्रत्यक्ष कार्याला लागले तेव्हा ‘बौद्धांच्या सवलती’ हा एकमेव अडसर होता. या एकमेव मागणीसाठी झुंजणाºया भय्यासाहेबांना ज.विं.नी साथ दिली. अगदी पंतप्रधानांच्या भेटीपर्यंत. या प्रश्नासाठी भय्यासाहेबांनी लोकसभेची एक निवडणूकही लढवली आणि तीही जनता पार्टीचा झंझावात असताना. मोठ्या भावाप्रमाणे ज्यांना भय्यासाहेबांनी कुरवाळले, ते सगळे या प्रश्नावर भय्यासाहेबांना सोडून गेले, तेव्हा राजा ढाले व ज.वि. पवार या दोघांनीच भय्यासाहेबांना साथ दिली. या मंडळीनी बौद्ध महासभा मोडीत काढली तेव्हा या मातृसंघटनेला उभारी देण्याचे काम सरचिटणीस म्हणून ज.विं.ने केले. १९७७ साली नाममात्र करण्यात आलेली ही संस्था देशभर कार्यरत झालेली पाहून ज.वि. कृतकृत्य होतात.एका आठवड्यात पाच-सहा स्तंभ लिहिणारे ज. वि. लिहितात तरी कधी, हा आमच्या पुढे प्रश्नच आहे. त्यांची प्रस्तावना मिळावी म्हणून अनेक लेखक प्रतीक्षा करतात. अनेक ग्रंथकार आपल्या संपादनाखालील ग्रंथात ज.विं.चा लेख पाहिजे म्हणून मागे लागतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासाठी त्यांनी साकारलेले स्मारक शिल्प ज.विं.बद्दल असलेल्या आदराची पावती ठरली आहे. विद्यालयीन आणि विश्वविद्यालयीन अभ्यासक्रम व ज.विं.च्या साहित्याच्या आणि तोही बाबासाहेबांसदर्भातीलच अंतर्भाव असतो.