शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

तनी अवतरम...

By admin | Published: October 13, 2016 3:58 PM

माझ्या उघड्याबंब पोटावर रेललेला तो घट आणि त्यातून तालाचे अचूक बोल काढणारी माझी छोटी, कोवळी बोटे. उघड्या पोटावर ठेवलेल्या घटमला पोटाच्या स्नायूंकडून मिळणारा

- जगप्रसिद्ध घटम वादक विक्कू विनायकराम- यांच्याबरोबर भन्नाट गप्पांचा एक कलंदर दिवसमाझ्या उघड्याबंब पोटावर रेललेला तो घट आणि त्यातून तालाचे अचूक बोल काढणारी माझी छोटी, कोवळी बोटे. उघड्या पोटावर ठेवलेल्या घटमला पोटाच्या स्नायूंकडून मिळणारा आधार आणि रेटा यांमुळे मंद्र सप्तकात वाजणारे बोल अधिक वजनदार वाजतात हे मी वाजवता-वाजवता शिकत होतो आणि उघड्या अंगाने रंगमंचावर, न बिचकता जाणेही..! पण तेवढ्यात आयुष्यात एम.एस. सुब्बलक्ष्मी नावाचे एक सात्त्विक पर्व आले. माझ्या घटमला स्वतंत्र ओळख देऊन थेट संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक व्यासपीठावर नेणारे...! जेमतेम २३-२४ वर्षांचा होतो तेव्हा! आजवर कधी मुंडू सोडून दुसरे वस्त्र अंगावर चढवले नव्हते. आता अमेरिकेला जायचे म्हणजे विमान प्रवास आला, सूटा-बुटाची साहेबी कडक इस्त्री आली. चुडीदार, झब्बा त्यावर वेस्टकोट असे सुब्बलक्ष्मीनी शिवून घेतलेले कपडे घालून आरशासमोर उभा राहिलो आणि.... आणि स्वत:वरच जाम खूश झालो. भस्म लावलेल्या आणि उघड्याबंब अंगाने पोटावर घटम घेऊन बसणाऱ्या विनायकपेक्षा तरतरीत दिसणाऱ्या या माणसाला राधाने, सुब्बलक्ष्मीच्या मुलीने स्मार्ट नाव दिले, विक्कू...! ... पुढे या घटमने मला जगभरात नेले. मग पुन्हा अंगावर मुंडू आणि कपाळावर भस्माचे पट्टे आले. फरक एवढाच होता की मद्रासमध्ये उघड्या अंगाने बसताना तपमान ३० डिग्री असायचे आणि इथे अनेकदा सामना करावा लागायचा तो पाच किंवा सहा डिग्री तपमानाशी...! स्टेजवर उघड्या अंगाने बसलेल्या मला बघून श्रोते गारठून जायचे पण माझी घटमवरची बोटे कधीच गारठली नाहीत... कशामुळे झाले असावे हे?