शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

टीमनं सेन्चुरी मारली.. पण, संजयभाऊंची विकेट पडली!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2021 5:44 AM

नारद मुनींनी एमपीएलचे सामने लावले. अर्थात महाराष्ट्र पॉलिटिकल लीग! पहिली मॅच झाली ‘मुंबईकर’ विरुद्ध ‘नागपूरकर’ यांच्यात. तिचा वृत्तान्त...

सचिन जवळकोटे, निवासी संपादक, लोकमत, सोलापूरइंद्र दरबारात अप्सरांच्या नृत्याविष्काराचा दिलखेचक नजराणा सादर केला जात होता. एवढ्यात बाहेरचा कलकलाट कानी पडू लागला. दरबार डिस्टर्ब झाला. इंद्र महाराजांनी नारदांना विचारलं, तेव्हा मुनी म्हणाले, ‘भूतलावर अधिवेशन सुरू झालंय. महाराज, त्याचाच हा गोंधळ आहे.. गेल्या दीड-दोन वर्षांपासून खदखदणाऱ्या द्वेष, मत्सर, असूया, कपट अन् सुडाग्नीचा उद्रेक झालाय आता.

 ‘कॉमन पब्लिक अगोदरच लॉकडाऊन अन‌् महागाईनं होरपळतंय. अशावेळी एकत्र येऊन जनतेला धीर देण्याऐवजी कसल्या घाणेरड्या राजकारणात गुंतलेत हे सारे नेते?’ - इंद्राचा संताप पाहून मुनींनी तत्काळ भूतलाकडे प्रस्थान केलं.सर्व नेत्यांमध्ये खेळकर वातावरण निर्माण व्हावं म्हणून मुनींनी लगोलग क्रिकेट मॅचचं आयोजन केलं. नाव ठेवलं एमपीएल. अर्थात ‘महाराष्ट्र पॉलिटिकल लीग’. पंच म्हणून वडीलधारे थोरले काका बारामतीकर यांच्याकडे जबाबदारी सोपविली. पहिली मॅच ‘मुंबईकर’ विरुद्ध ‘नागपूरकर’ यांच्यात ठरली.देवेंद्र पंतांनी टॉस जिंकला, मात्र उद्धो म्हणाले, ‘अगोदर आमची बॅटिंग.’ हे ऐकून चंदूदादा कोथरूडकर चरफडले, ‘हे तर शुद्ध चिटिंग.’ बॅट आपटत उद्धो पीचकडं निघाले. तेव्हा आदित्य हळूच पुटपुटले, ‘ज्याची बॅट, त्याचीच बॅटिंग. लहानपणी आम्ही दादरमध्ये असंच खेळायचो.’ ..विशेष म्हणजे थोरल्या काकांनीही बॅटिंगला मूकपणे सपोर्ट केला. पंतांची टीम हतबल झाली. मात्र, काकांसमोर आदळआपट करण्याची हिंमत नव्हती. कारण, काका भरपावसातही तुफान बॅटिंग करण्यात माहीर! 

मॅच सुरू झाली. उद्धो अन् अजित दादा ओपनिंगला गेले. रनर म्हणून न बोलविताही संजयराव तयार होतेच. ‘मुंबई बँके’च्या लॉकरमध्ये जपून ठेवलेला बॉल फिरवत दरेकर बॉलिंग करू लागले. मात्र, गठ्ठ्यांचा ओलावा लागल्यानं बॉल भलतीकडेच वळत होता. उद्धो टुकूटुकू खेळण्यावर अधिक भर देत होते. धावा काढण्यापेक्षा पीचवर शेवटपर्यंत टिकून राहणं, त्यांच्यासाठी म्हणे महत्त्वाचं होतं. तेव्हा अस्वस्थ झालेल्या दादांनी संधी मिळेल तसे चौकार-षटकार लगावले. हे पाहून उद्धोना वाटू लागलं की बहुतेक दादाच मॅच मारून जाणार.दोघांनी धावसंख्या चांगली केली. दादा सेन्चुरी करणार, एवढ्यात थोरल्या काकांनी हळूच जयंतराव-छगनराव यांना खुणावलं. सेकंड फळी मैदानावर बोलावली. आतल्या आत धुमसत दादा परतले. ‘सीएम’ खुर्चीच्या वेळीही म्हणे असंच घडलेलं. 

 तिकडं बॉलिंग करून ‘मुनगंटीवार-सोमय्या’ जोडीही थकली होती. नारायण कोकणकर फिरकी चांगली टाकायचे; मात्र नेहमीप्रमाणे सिंधुदुर्गातून विमान न उडाल्यानं ते कणकवलीतच अडकून पडले होते. अखेर देवेंद्र पंतांनी बॉल स्वतःकडे घेतला. धनुभाऊ परळीकर अन‌् संजयभाऊ यवतमाळकर बॅटिंगला होते. दोघेही धडाडीचे फलंदाज, मात्र दोघांचेही वीकपॉइंट समोरच्या टीमनं अचूक ओळखलेले. एका चेंडूवर धनुभाऊंनी बॅट फिरविताच चंदूदादांनी जमिनीवर झेपावत कॅच घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, काकांनी नॉट-आउट दिलं आता बॅटिंग संजयभाऊंकडे येताच त्यांनीही चेंडू जोरात खेचून रन काढण्यासाठी धाव घेतली. मात्र, काकांनी खुणावल्यामुळे धनुभाऊ जागचे हललेच नाहीत. संजयभाऊ मध्यापर्यंत येऊन परत फिरले. मात्र, पंतांनी त्यांना अलगद रन आउट केलं. तिकडं स्टेडियममध्ये बसलेल्या पंकजाताई मनातल्या मनात हळहळल्या. धनुभाऊ आउट झाले असते तर बरं झालं असतं, असं त्यांना वाटून गेलं. संजयभाऊंची विकेट गेल्यानंतर पंतांची टीम मैदानात आनंदानं नाचू लागली. थोरले काका मात्र गालातल्या गालात मिस्कील हसले. कारण, संजयभाऊंना आउट करण्याच्या नादात साऱ्यांचंच धनुभाऊंकडे दुर्लक्ष झालेलं ना!... नारायणऽऽ नारायणऽऽ        

                                     sachin.javalkote@lokmat.com

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोडUddhav Thackerayउद्धव ठाकरेPooja Chavanपूजा चव्हाण