शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

सांगा... पैसा कुठं गुंतवावा ?

By सचिन जवळकोटे | Published: August 23, 2018 6:33 AM

अकबरानं विचारलेल्या एका किचकट प्रश्नाचं उत्तर शोधता-शोधता साऱ्यांच्याच नाकीनऊ आलेलं... कारण प्रश्न होताच तसा, ‘पैसा कसा कमवावा?’

शहेनशहा अकबराचा दरबार खचाखच भरलेला. प्रचंड गर्दी असूनही भलताच सन्नाटा पसरलेला. अकबरानं विचारलेल्या एका किचकट प्रश्नाचं उत्तर शोधता-शोधता साऱ्यांच्याच नाकीनऊ आलेलं... कारण प्रश्न होताच तसा, ‘पैसा कसा कमवावा?’ अनेकांनी वेगवेगळी उत्तरं दिली. मात्र, अकबराला एकही उत्तर पटलं नाही. शेवटी टाळी वाजवून त्यानं आपल्या सैनिकांना खुणावलं, ‘बिरबल को लेके आओऽऽ,’मग काय, सैनिकांच्या ताफ्यासोबत बिरबल दरबारात हजर. ‘काय हुकूम जी हुजूर ?’ कुर्निसात करत बिरबलानं विचारलं. त्याला तो प्रश्न सांगून अकबरानं नवी मोहीम सोपविली, ‘चारशे वर्षांनंतरच्या एकविसाव्या शतकात लोकं कसा पैसा कमवत असतील, याचा शोध घ्या.’बिचारा डोकं खाजवत बिरबल एकविसाव्या शतकातील आधुनिक पुण्यात आला. एका बिल्डरला गाठलं. त्याला तो प्रश्न विचारताच बिल्डर कपाळावर आठ्या घालत विचारू लागला, ‘पैसा कसा कमवावा, याचं मला टेन्शन नाही. अनेक वर्षे पडून राहिलेले प्लॅटस् कसे विकावेत, याचा मी विचार करतोय. जागेत अडकलेला पैसा परत कसा काढावा, याचेच आराखडे रोज आखतोय.’बिरबल चमकला. त्यानं तिथून थेट मुंबई गाठली. ‘शेअर मार्केट’मधल्या ‘बुल’ समोर एका दलालाला विचारलं, ‘तुम्ही पैसा कसा कमविता?’ आधीच चिंताग्रस्त असलेल्या दलालानं बिरबलाकडं खालूनवर बघत प्रत्युत्तर केलं, ‘देशातल्या अनेक कंपन्यांची वाट लागलीय. त्यामुळंत्यांच्या शेअर्समध्ये गुंतविलेला पैसा पुन्हा कसा वसूल करावा, याचीच मला चिंता लागून राहिलीय.’बिरबल पुन्हा गोंधळात. त्यानं थेट सराफ बाजारचा रस्ता धरला. तिथं सोने विकायला आलेल्या दामुअण्णाला विचारलं, ‘सोन्यातून म्हणे पैसा भरपूर कमविता येतो. खरंय का तेऽऽ’ तेव्हा कपाळावरचा घाम पुसत दामुअण्णा म्हणाले, ‘पैसा कमवायचं राहू द्या होऽऽ बाजूला. अगोदर पस्तीस हजारानं घेतलेलं सोनं तीस हजारांत जरी विकलं गेलं तरी नशीब म्हणायचं आमचं.’मान हलवत बिरबल तिथून सटकला.जागेत फायदा नाही. शेअर्समध्ये गॅरंटी नाही. सोन्यातही उत्पन्न नाही. आता राहिली हक्काची अन् विश्वासाची जागा म्हणजे बँक़ तेव्हा एखाद्या बँक ग्राहकालाच विचारू या, असा विचार करत त्यानं ‘एटीएम सेंटर’ गाठलं. मात्र तिथं प्रचंड गर्दी. हातात ‘एटीएम् कार्ड’ घेऊन प्रत्येकजण बँक अधिकाºयांशी भांडू लागलेला. बिरबलला वाटलं, वाढीव व्याजदरासाठी ही मंडळी वाद घालताहेत. त्यानं एकाला विचारलं, ‘का होऽऽ’ बँकेत पैसा ठेवून किती नफा कमविला?’बिरबलकडं रागानं बघत समोरचा जोरजोरात ओरडू लागला, ‘व्याज गेलं खड्ड्यात. आमच्या खात्यातले पैसे म्हणे परस्पर फॉरेनमधल्या खात्यात जमा झालेत. फ्रॉड मंडळी करणार बँक हॅक़.. पण पैसे गायब होणार आमच्या खात्यातले नां?’ आता मात्र बिरबरला पारऽऽ चक्कर आली. तातडीनं तो पुन्हा चारशे वर्षांपूर्वीच्या काळात शिरला. अकबराच्या दरबारात हजर झाला, ‘हुजूरऽऽ पैसा कसा कमवावा, हा प्रश्नच एकविसाच्या शतकात उरला नाही... फक्त पैसा कुठं सुरक्षितपणे साठवावा? या चिंतेनंच साºयांची वाट लागलीय..’ 

टॅग्स :MONEYपैसा