शिवाजीराव गायकवाड हे मराठी नाव टाकून कर्नाटकातून तामिळनाडूत गेलेल्या एका विलक्षण माणसाची ‘हिट’ आणि ‘फ्लॉप’च्या पलीकडे पोहचलेली अफलातून कहाणीवय झालं, टक्कल पडलं, तरी थोडं म्हणून न उणावलेलं ‘रजनीकांत’ हे रहस्य नेमकं काय आहे? या माणसामागे लोक एवढे वेडे का होतात? - याचा एक तेवढाच वेडा शोध..आज जो दिसतो, त्या रजनीकांतमध्ये एक अजब विरक्ती आहे...ती आशकमस्त टाईप बोलघेवडी फकिरी नाही. ऐन तारुण्यात त्याने अफाट यश उपभोगलं आहे. यशाबरोबर आलेली सगळी सुखंही मन:पूत भोगून झाली आहेत. या सुखांच्या पलीकडे काहीतरी शाश्वत आहे, असलं पाहिजे, अशी आंतरिक जाणीव असलेल्या माणसाचा हा तृप्त, निर्लेप संन्यास आहे. तोही राजस! इतकी अफाट लोकप्रियता मिळाल्यानंतरही तो कमालीचा साधा आहे. पडद्यापलीकडे तो जसा असतो तसा दिसतो. टक्कल झाकत नाही आणि पांढरे केसही लपवत नाही. सुपरस्टारपदाचे तामझाम मिरवत नाही, दक्षिणेचा हा महानायक उत्तरेत अगदी फाटक्या माणसासारखा हिमालयात तीर्थाटन करून येतो, तेव्हा तिथे त्याला कुणीही ओळखत नाही.- असा माणूस राजकारणात, खासकरून आजच्या डिझायनर राजकारणात उतरेल का?उतरला तर चालेल, टिकेल का?तामीळ जनता गेली २२ वर्षं त्याच्या आगमनाच्या करेक्ट वेळेकडे डोळे लावून बसली आहे...भारतातल्या घातक अस्मितावादी राजकारणात करेक्ट वेळ यायची वाट पाहायची नसते;आपण जी वेळ साधू ती करेक्ट बनवून दाखवायची असते,हे रजनीकांतला तेव्हाही कळलं नसावं, अजूनही कळलेलं दिसत नाही!- नाहीतर लोखंड तापलेलं असताना हातोडा मारायला तो चुकला असता का?२,१२,५२१ प्रतींचा खप ओलांडणारं मराठी प्रकाशन विश्वातलं सन्मानाचं,देखणं आणि समृद्ध पान. पाने २५६ : मूल्य २०० रुपयेसर्वत्र उपलब्धतुमची प्रत राखून ठेवण्यासाठी ई-मेल करा : २ं’ी२.ीिीस्रङ्म३२ं५@’ङ्म‘ें३.ूङ्मेआॅनलाईन बुकिंग करा : ६६६.ीिीस्रङ्म३२ं५.’ङ्म‘ें३.ूङ्मेनाव-पत्ता आणि फोन नंबर लिहून व्हॉट्सअॅप मेसेज पाठवा : 8425814112
थलैवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 1:57 AM