शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

एवढेच सांगायचे...मोहनजी, आता क्षिप्र चल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 3:54 AM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ज्याला आपले बायबल, गीता व कुराण मानले ते गोळवलकर गुरुजींचे ‘बंच आॅफ थॉट्स’ हे पुस्तक कालबाह्य झाले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ज्याला आपले बायबल, गीता व कुराण मानले ते गोळवलकर गुरुजींचे ‘बंच आॅफ थॉट्स’ हे पुस्तक कालबाह्य झाले आहे. काळ बदलतो तसा समाज बदलतो. मात्र पुस्तके आणि त्यांनी निर्माण केलेल्या समजुती तशाच राहतात. संघानेही कालानुरूप बदलले पाहिजे व तो बदलत आहे ही सरसंघचालक मोहन भागवत यांची कोलांटउडी नाही. काळाने त्यांच्या व संघातील नव्या विचारांच्या लोकांच्या मनात घडवून आणलेली ही एक चांगल्या व स्वागतार्ह बदलाची चिन्हे आहेत. सारे बदलले तरी आम्ही तसेच आहोत ही कर्मठ भूमिका फार लवकर कालबाह्य होते. १९२५ मध्ये स्थापन झालेला व गेली १२० वर्षे तसाच, गणवेशापासून विचारांपर्यंत राहिलेला संघ हा त्यातल्याच नव्यांना कालविसंगत वाटू लागला होता. त्यातून सावरकरांच्या इच्छेविरुद्ध जाऊन संघाने जनसंघाची स्थापना केली. त्याला लोकशाहीच्या गरजेनुसार समाजाभिमुख होणे भाग पडले. परिणामी संघाच्या तुलनेत त्याला मिळणारा लोकमताचा पाठिंबा मोठा होता व तो क्रमाने वाढत गेला. हा पाठिंबाच संघाच्या बंद विचारांसमोरचे आव्हान ठरला. जनसंघात वा भाजपात संघाबाहेरून आलेली माणसे संघविचार वा संघगुरूंना कशी मानतील? किंवा त्यांना आपले परात्पर गुरू तरी कसे समजतील? मग त्यांना सांभाळायला (कारण खरी सांभाळायची असते ती सत्ता, संघटना नव्हे) आपली कुंपणे जरा किलकिली करणे गरजेचे होते. इतर संघटनांना ही गरज भासली नाही. गांधीजी कालानुरूप बदलत राहिले. १९२० पूर्वी चातुर्वर्ण्य म्हणणारे गांधी नंतरच्या काळात फक्त आंतरजातीय लग्नांनाच परवानगी देणारे व त्याला हजर राहणारे बनले. ईश्वर आणि अल्ला यांचा एकत्र उच्चार करू लागले. ज्या संघटना त्यांच्या पोथ्यांना घट्ट धरून राहिल्या त्या साऱ्यांच्याच समोर काळाचे संकट उभे राहिले. ते मार्क्सच्या पोथीवाद्यांना जरा उशिरा समजले. समाजवाद्यांना ते समजले तेव्हा ते जवळपास संपलेही होते. आपले राजकीय आद्यग्रंथच नव्हे तर आपल्या धार्मिक पोथ्याही दिवसेंदिवस कालविसंगत होत असतात. त्या स्वत:वर लादून ठेवण्याचे वर्तमानाचे काम नव्हे. अखेर माणूस हाच तेवढा खरा व तोच तेवढा सनातन असतो. तो काळानुरूप बदलतो. मार्क्सचे कॅपिटल मात्र बदलत नाही. हिटलरचे ‘माइन काम्फ’ किंवा माओचे ‘रेड बुक’ही तसेच राहते. आपल्याकडे यात फार वेगाने बदल झाले आहेत. शंकराचार्यांना ज्ञानेश्वरांनी खोडून काढले आणि ज्ञानेश्वरांचा अर्थ टिळकांनी चुकीचा ठरवला. या स्थितीत ‘बंच आॅफ थॉट्स’ हे गोळवलकरांचे सांगणे असले तरी आणि ते मूळ स्वरूपात उपलब्ध असले तरी त्याचे आजवर अनुयायी राहिलेले लोक अर्ध्या चड्ड्यांवर समाधान कसे मानतील? त्यांना फूलपँटच केवळ नाही तर मोबाइल लागेल, संगणक लागेल, प्रचारासाठी ट्रोल्ससारखी अविश्वसनीय साधने लागतील आणि हो, संघही केवळ गुरुदक्षिणेवर चालणार नाही. गोमांसाच्या भक्षणावर नागपुरात किंवा महाराष्ट्र व राजस्थानात बंदी घालता येते, पण ती बंगाल, केरळ, मणिपूर, नागालँड आणि काश्मिरात कशी घालणार? अशा वेळी पुस्तक बदलायचे की माणसांना पुस्तकांनी तयार केलेल्या चौकटीत कोंबायचे? पण काही का असेना भागवतांनी ही कोंडी फोडली त्यासाठी त्यांचे अभिनंदन. आता त्यांच्यापुढचा नवा प्रश्न मात्र मोठा आहे. प्रत्येक संघटनेत काही नाफेरवादी कर्मठ असतात. अशांची संख्या संघात फार मोठी आहे. भागवतांची आताची ‘फेरवादी’ भूमिका ते या कर्मठांच्या मनात कशी रुजवतील? त्यांच्यासाठी ‘बंच आॅफ थॉट्स’ हा वेदग्रंथ आहे. त्यांची वेदनिष्ठा भागवतांना सांभाळायची आणि बदलायचीही आहे. आव्हाने पुढेही आहेत. देशातील सर्वधर्मसमभाव आत्मसात करायचा आहे. हिंदू-मुसलमानांची एकात्मता साधायची आहे. बाबरीवाल्यांना जोडायचे आहे. त्यासाठी हिंदुत्वातील कडव्यांना आवरायचेही आहे. काही का असेना भागवतांनी सुरुवात केली आहे. त्यांना या क्षेत्रात यश लाभावे यासाठी एवढेच सांगायचे, ‘मोहनजी, आता क्षिप्र चल’.>भागवतांची आताची ‘फेरवादी’ भूमिका ते या कर्मठांच्या मनात कशी रुजवतील? त्यांच्यासाठी ‘बंच आॅफ थॉट्स’ हा वेदग्रंथ आहे. त्यांची वेदनिष्ठा भागवतांना सांभाळायची आणि बदलायचीही आहे. देशातील सर्वधर्मसमभाव आत्मसात करायचा आहे.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत