रुसलेले दादा जिंकले, त्यागामुळे भाजपवाले त्रासले !

By यदू जोशी | Published: October 6, 2023 09:26 AM2023-10-06T09:26:25+5:302023-10-06T09:26:52+5:30

महाराष्ट्रात सरकारच्या तीन चाकांच्या गाडीचे ड्रायव्हर आहेत देवेंद्र फडणवीस; शिंदे-पवार यांनी घंटी वाजवली की गाडी सुरू होते आणि थांबते.

The angry Dada won, because of the sacrifice, because of the sacrifice, the BJP suffered! | रुसलेले दादा जिंकले, त्यागामुळे भाजपवाले त्रासले !

रुसलेले दादा जिंकले, त्यागामुळे भाजपवाले त्रासले !

googlenewsNext

यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत

राष्ट्रवादीला तीन महिन्यांनंतर पालकमंत्रिपदे मिळाली. अजितदादा रुसून बसले अन् मग शिंदे-फडणवीसांनी दिल्ली गाठून पालकमंत्रिपदांची मंजुरी आणली. रुसलेल्या दादांना खुदकन हसू आले असेल. कधीकधी शत्रूपेक्षा मित्रावर दबाव आणून मनासारखे करवून घेणे कठीण असते; दादांनी ते केले.

असा आजाराचा प्रयोग एखादवेळी कामाला येतो; पुढच्या वेळी वेगळा बहाणा करावा लागेल. अजित पवार भाजप- शिवसेनेला वेठीस धरू शकतात, हे या निमित्ताने दिसले. म्हणाल तर अजितदादा जिंकले, कारण त्यांनी पालकमंत्री पदे मिळवून घेतली; पण ते यापुढेही आपल्याला असेच वेठीस धरू शकतात, याची झलक दिसल्याने भाजपचे दिल्ली, मुंबईतील नेते सावधही झाले असतील. शिंदे त्रासदायक आहेत की अजित पवार याची तुलनाही दिल्लीत होईल. शेवटी शिंदे हे भाजपचे नैसर्गिक मित्र आहेत; आणि अजित पवारांशी मैत्री ही राजकीय सोय आहे.

जुन्या हिंदी सिनेमात सतत त्याग करणारा एक मोठा भाऊ (बलराज साहनी, ओमप्रकाश वगैरे दाखवायचे; आपल्याजवळचे सगळे काही भावा-बहिणींना देऊन तो मोकळा व्हायचा. भाजपचे तसेच झाले आहे. मित्रपक्षांना देत राहण्याची भूमिका घेताना भाजप आपला संकोच करून घेत आहे. स्वत: नुकसान सोसून मित्रपक्षांना बळ देण्याची भाजपची रणनीती लोकसभा निवडणुकीतील महाविजयासाठी आहे. महायुतीची गाडी भाजपच्या त्यागावर चालली आहे. आधी मुख्यमंत्रिपद सोडणारे आणि नंतर उपमुख्यमंत्रिपदात वाटेकरी तयार करणारे देवेंद्र फडणवीस या गाडीचे ड्रायव्हर आहेत तर शिंदे-पवार हे दोन कंडक्टर त्यांनी डबल घंटी वाजवली की गाडी सुरू होते; सिंगल घंटी मारली की थांबते.

ड्रायव्हरने या दोघांचेही अजिबात न ऐकता गाडी सुसाट चालवावी, असे गाडीत बसलेल्या भाजपच्या प्रवाशांना वाटते, पण त्यांच्या वाटण्याला फारसा अर्थ नाही. लोकसभा निवडणुकीपर्यंत असेच राहील. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है.... भाजपसाठी सध्या राज्यात तसा काळ आहे. सत्तेत लहान भाऊ होते तेव्हाही त्याग, आता मोठा भाऊ आहे तेव्हाही त्याग. विरोधी पक्षात होते तेव्हाही त्याग अन् सत्तेत आहेत तरीही त्यागच... राज्यातील भाजपची कुंडलीच वेगळी दिसते. त्याग ही भाजपची अपरिहार्यता आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचे तसे नाही. त्यांनी नाशिक, रायगड अन् साताराचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीकडे जाऊ दिले नाही.

राष्ट्रवादीला पालकमंत्रिपदे दिल्या दिल्या भाजपमध्ये अस्वस्थतेचे काही टापू तयार होतील. त्यात पुणे, नंदुरबार, कोल्हापूर आदी असतील.पुण्यात अजित पवारांची 'दादागिरी' विरुद्ध भाजप असा सुप्त संघर्ष सुरू राहील. नंदुरबारमध्ये डॉ. विजयकुमार गावित यांचा गेम कोणी केला? स्वतःबरोबरच मुलीलाही खासदार म्हणून निवडून आणण्याची जबाबदारी तोंडावर असताना त्यांचे नंदुरबारचे पालकमंत्रिपद काढून घेत थेट भंडाऱ्याला पाठवले. भाजपचे एक विद्यमान मंत्री आणि धुळे जिल्ह्यातील एका माजी मंत्र्यांच्या मैत्रीतून राष्ट्रवादीचे अनिल पाटील यांना नंदुरबारचे पालकमंत्री केले गेले, अशी चर्चा आहे .

शिवसेनेच्या मंत्र्यांना कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्री सौनिक मॅडमची काळजी केले तरी भाजपमध्ये धास्ती, चिंता नसते; पण राष्ट्रवादी आपल्याला दाबून टाकेल, असे त्यांना वाटत राहते. शिवसेना अन् राष्ट्रवादीचा स्वभाव आणि वागणुकीतील हा फरक आहे. १५ वर्षे काँग्रेसला दाबले तितके भाजपला दाबणे सोपे जाईल, असं मात्र वाटत नाही. 

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदार संख्येत फारसा फरक नव्हता. आता राष्ट्रवादी-भाजपमध्ये तिरटीचा फरक आहे आणि शिवाय मोदी-शहा-फडणवीस आहेत. तरीही अजित पवार हे पालकमंत्रिपदांसारखे सगळेच काही त्यांच्या मनासारखे करु शकले तर त्यांचा दबदबा वाढेल.

मंत्र्यांची मंत्रालयाकडे पाठ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बरेच मंत्री मंत्रालयात फार कमी येतात. असे का? अजित पवार मात्र नियमित येतात. बराच वेळ बसतात; बैठका घेतात. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या अनुपस्थितीत अजितदादाच मंत्रालयात यायचे; त्यामुळे अधिकाऱ्यांवर त्यांचा वचक होता. आताही तसेच तर नाही ना होणार?

विस्तार होईल का भाऊ?

मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले बरेच जण फोन करतात. भाऊ, विस्तार होईल का, म्हणून विचारतात. त्यात भाजपचे आमदार जास्त आहेत. ११५ आमदारांच्या पक्षालाही दहा मंत्रिपदे अन् ५० आमदार असलेल्या पक्षालाही (शिवसेना) दहा मंत्रिपदे, नेमके किती आमदार सोबत आहेत याचा आकडा नक्की नसलेल्या राष्ट्रवादीला नऊ मंत्रिपदे इथेही त्यागच! त्यामुळेही भाजपमध्ये अस्वस्थता दिसते. विस्ताराची खरी गरज भाजपलाच आहे.

सौनिक मॅडमची काळजी

सुजाता सौनिक या गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आहेत. मंत्रालयातील त्यांच्या दालनात बैठकीसाठी, भेटण्यासाठी अनेक आयपीएस अधिकारी येत असतात. आत जाताना ते कॅप आणि स्टिक बाहेर ठेवतात; पण त्यासाठी विशिष्ट जागा आजवर नव्हती. त्यामुळे बाहेरच्या एखाद्या खुर्चीत, टेबलवर ठेवून ते आत जायचे. आता सौनिक यांनी कॅप, स्टिक नीट ठेवता यावेत, म्हणून एक स्टैंड बसविला आहे. गोष्ट छोटी आहे; पण कौतुक तो बनता है.

Web Title: The angry Dada won, because of the sacrifice, because of the sacrifice, the BJP suffered!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.