शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
2
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
3
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
4
'जानी दुश्मन'चा खेळ खल्लास! बुमराह-विराट यांच्यात दिसला 'मिले सुर मेरा तुम्हारा सीन' (VIDEO)
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
6
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
7
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
8
बँक खातेदारांना आता ४ नॉमिनी व्यक्तींची नावं द्यावी लागणार, सरकार लवकरच कायदा आणणार!
9
NTPC चा शेअर तुम्हाला अलॉट झालाय का? कसं चेक कराल, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर
10
'कांतारा'च्या कलाकारांसोबत मोठी दुर्घटना! शूटिंगवरुन परतताना बस पलटी, अनेक जण जखमी
11
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
12
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
13
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
14
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
15
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
16
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
17
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
18
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
19
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
20
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला

अक्कडबाज मिशा आणि पीळदार देहयष्टी; स्टाईलबाजीत दडलेय बिश्नोईच्या दहशतीचे राज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 11:17 AM

तब्बल दोन डझन खतरनाक गुन्ह्यांची नोंद असलेला लॉरेन्स हा पोलिस कॉन्स्टेबलचा मुलगा. २०१० साली त्याच्या गुन्हेगारी कारकिर्दीची सुरूवातच झाली ती हत्येचा प्रयत्न

रवींद्र राऊळ, मुक्त पत्रकार

मुंबईपासून दीड हजार किमी दूर तिहार तुरुंगातील कोठडीत भरपूर व्यायाम करत दररोज सात लिटर दूध रिचवणारा बंदिस्त गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई मुंबईतल्या अभिनेता सलमान खानला धमकावण्याचे एक - दोन नव्हे तर पाच प्रयत्न कसे करतो, हे प्रत्येकाला पडलेले कोडे. सोशल मीडियाचा वापर करत सातशेहून अधिक गुंडांची फौज गोळा करणारा स्टायलिस्ट लॉरेन्स तुरुंगात राहूनही भारतातच नव्हे तर कॅनडा, इटली, थायलंड, मेक्सिकोमध्येही उच्छाद मांडू शकतो, हे त्याला ओळखणाऱ्यांना चांगलेच ठाऊक आहे.

तब्बल दोन डझन खतरनाक गुन्ह्यांची नोंद असलेला लॉरेन्स हा पोलिस कॉन्स्टेबलचा मुलगा. २०१० साली त्याच्या गुन्हेगारी कारकिर्दीची सुरूवातच झाली ती हत्येचा प्रयत्न, घुसखोरी आणि लुटमारीचे गुन्हे दाखल होत. विद्यार्थी चळवळीत असल्यापासूनच राडेबाजी करणाऱ्या लॉरेन्सच्या नेटवर्कबाबत जाणून घेण्याची देशभरातील पोलिसांना उत्सुकता आहे तर गुंडांना कमालीचे अप्रूप. इतक्या अल्पावधीत जगाच्या नकाशावरील अनेक देशांत तो आपले नेटवर्क कसे पसरवू शकला, याचे उत्तर त्याच्या स्टाईलबाजीत आहे. तुरुंगात लॉरेन्सशी ओळख झालेला प्रत्येक गँगस्टर त्याच्या प्रभावामुळे बाहेर पडल्यावर त्याच्याच गँगमध्ये दाखल होतो. 

अक्कडबाज मिशा आणि पीळदार देहयष्टी सोशल मीडियाचा पुरेपूर गैरफायदा घेत अंडरवर्ल्डमध्ये त्याने आपल्या नावाचा दबदबा तयार केला आहे. आठ वर्षांपूर्वी एका काँग्रेस नेत्याची हत्या करून लॉरेन्सने थेट फेसबुकवर त्याची जबाबदारी स्वीकारली तेव्हा हलकल्लोळच माजला. अक्कडबाज मिशा आणि पिळदार देहयष्टीच्या लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने असलेल्या सर्व सोशल अकाऊंटवर दिसतो तो दहशत माजेल असाच मजकूर. 

स्टेटस... ‘नेक्स्ट टार्गेट सल्लू’ ‘नेक्स्ट टार्गेट सल्लू’ हे स्टेटस त्याच्या नावाच्या इस्टाग्रामवर आजही कायम आहे. सलमान खानला जोधपूरमध्येच मारण्याची धमकी, पोलिसांच्या वेढ्यात ये - जा करताना चेहऱ्यावर दिसणारी बेफिकिरी त्याच्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते. जे करायचे ते वाजतगाजत, हा त्याचा खाक्या. तो इतका निर्ढावलेला की, जे करतो किंवा करायचे आहे ते बिनधास्त सोशल मीडियावर टाकून मोकळा होतो. ना कायद्याची भीती, ना कारवाई होण्याची तमा. त्याच्या या बेदरकारपणामुळेच त्याचा गोतावळा हा हा म्हणता वाढत गेला.

मी तर तुरुंगात, माझा काय संबंध?तिहार तुरुंगात सुरक्षित राहून पंजाब, हरयाणा, राजस्थानसह अनेक राज्यांत तो गुन्हेगारी कारवाया बिनदिक्कतपणे पार पडतो. तुरुंग आपल्यासाठी अधिक सुरक्षित असल्याचे जाणून तो कुठल्याही प्रकरणात जामिनावर बाहेर पडण्याचा प्रयत्नच करत नाही. तुरुंगात मोबाइल मिळवून तो वापरणे कैद्यांसाठी कठीण नाही. 

तुरुंगात जॅमर लावल्याचा दावा तुरुंग प्रशासन कितीही करत असले तरी तो व्हॉट्सॲपवरून बाहेरील त्याच्या साथीदारांच्या संपर्कात असतो आणि त्यावरूनच तो निरोप, सुपाऱ्या आणि खतरनाक गुन्ह्यांचे प्लॅनही देतो, असे एनआयएला चौकशीत आढळले.  त्याच्या नावाने धमक्या देणारे मेसेज चक्क ई-मेलद्वारे पाठवून त्याचे साथीदार धनाढ्य लोकांकडून खंडणी आणि तीही बिटकॉनमध्ये मागतात. ते पकडले गेले की बिश्नोई म्हणतो, ‘माझा काय संबंध? ते माझ्या नावाचा वापर करतात.          

शत्रूचा शत्रू... आपला दोस्तशत्रूचा शत्रू हा आपला दोस्त, हे त्याचे आवडते सूत्र. म्हणूनच प्रतिस्पर्धी टोळ्यांच्या विरोधकांशी हातमिळवणी करतो. त्याच्या टोळीचे जाळे वेगाने पसरण्याचे हेही एक कारण समजले जाते.  राजस्थानातील काला जठेडी असो आणि लेडी डॉन अनुराधा. त्यांच्यासोबत मिळून तो काम करतो. वेगवेगळ्या राज्यांतील गँगलीडरशी संबंध जोडत असल्याने त्याला त्या गँगचे नेटवर्क आयतेच वापरता येते. आंतरराष्ट्रीय सिंडीकेटशी त्याचे थेट संबंध. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या करून कॅनडात दडलेल्या गोल्डी ब्रारशी त्याचा दोस्ताना. मेक्सिकन ड्रग कार्टेल्सशी संबंधित आंतरराष्ट्रीय ड्रग ट्रॅफिकर अमनदीप त्याच्या थेट संपर्कात. ब्रिटनमधील मॉन्टीशी त्याची पक्की दोस्ती. शिवाय इटली, थायलंड, कॅनडा, मेक्सिको येथे त्याचे अनेक हितचिंतक गँगस्टर. त्यांच्यासोबत मिळून तो ड्रग तस्करी, जमीन कब्जा, खंडणी उकळणे, अपहरण, हत्येचे गुन्हे करतो.    

कित्येक सीएंची नेमणूकभारतात उकळलेल्या खंडणीच्या रकमा तो हवालामार्फत कॅनडा, अमेरिका, दुबई, थायलंड आणि ऑस्ट्रेलियात तळ ठोकून असलेल्या साथीदारांकडे पाठवतो.  आर्थिक व्यवहार पाहण्यासाठी कित्येक सीएंची नेमणूक केलेली. पैशांची ददात नसल्याने यंत्रणा त्याच्या पायांवर लोळण घेते. त्यामुळे त्याचा कारभार दिवसागणिक वाढतच आहे. एनआयए गेली दोन वर्षे लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या साथीदारांचे नेटवर्क धुंडाळून काढण्यासाठी खोदकाम करतेय. पण चार - पाच मालमत्ता जप्त करण्यापलीकडे त्यांच्या हाती अद्याप फारसे काही लागलेले नाही. लॉरेन्स बिश्नोई टोळी नजीकच्या काळात तपास यंत्रणांसाठी मोठीच डोकेदुखी ठरणार, हे मात्र नक्की.  

टॅग्स :Salman Khanसलमान खान