शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
4
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
5
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
6
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
7
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
8
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
9
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
10
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
11
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
12
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
13
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
14
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
15
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट
16
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
17
करिअर, कुटुंब आणि आर्थिक व्यवस्थापन कसे करावे? सोप्या ६ टीप्स वापरा आणि टेन्शन फ्री व्हा
18
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका
19
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
20
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न

स्थलांतरित नागरिकांचे 'मत' वाया जाऊ नये, म्हणून... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 08:11 IST

लोकसंख्येतील फार मोठा घटक 'स्थलांतर' या एकाच कारणास्तव मतदान करण्यापासून वंचित राहतो आहे. त्यावर उपाय काढणे आवश्यक आहे !

डॉ. अंजली मुळके, माजी वैद्यकीय अधिकारीयंदाचे अर्धेअधिक वर्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत गेले. या निवडणुकांचा केंद्रबिंदू म्हणजे मतदार राजा..! निवडणूक सरेपर्यंत या मतदार राजाचे औटघटकेचे लाड हरेक पक्ष पुरवताना दिसतात. सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते १०० टक्के मतदान करण्याबद्दल अत्यंत पोटतिडकीने आग्रही होतात. तरीही मतदान जेमतेम सरासरी ६० टक्केची पातळी ओलांडताना दिसते. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतही मतांची सरासरी टक्केवारी ६६.०५ टक्के होती. मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे या देशाच्या आर्थिक उलाढालीच्या शहरांनी तर अगदी सरासरी ५५ टक्क्यांचा आकडा देखील पार केला नाही..! कुठे दडून बसलेले असतात उर्वरित मतदार..? तर, या उर्वरित मतदारांत जास्तीत जास्त लोक हे स्थलांतरित असतात..! देशाची जडणघडण आणि सामाजिक विकासात स्थलांतरित लोक फार मोठे भागीदार आहेत. परंतु, स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनीदेखील या स्थलांतरित जनतेला लोकप्रतिनिधी निवडून देण्याचा अधिकार संपूर्ण प्रमाणात मिळालेला नाही.

शिक्षण, नोकरी, व्यवसाय, मजुरी, विवाह किंवा नैसर्गिक /आर्थिक संकटं आदी कारणांमुळे लोक स्थलांतर करतात. देशांतर्गत स्थलांतरित लोकांपैकी, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणारे असे आंतरराज्यीय आणि एकाच राज्यातल्या ग्रामीण ते जिल्हा अंतर्गत आणि ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर करणारे, असे अनेक लोक आहेत. यामध्ये कायमस्वरूपी स्थलांतरित, तर काही जण काही दिवस स्थलांतरित ठिकाणी राहून, पैसा कमवून परत मूळ गावी येतात. हे वर्तुळाकार स्थलांतर! सर्वात जास्त स्थलांतर झालेली संख्या ही रोजगार, नोकरीपेक्षाही विवाहामुळे झालेल्या स्त्रियांची असते. या स्त्रियांचे नाव नव्या ठिकाणच्या मतदार यादीत नोंदवून घेण्यासाठीचा खटाटोप करण्याची मानसिकता किती लोकांमध्ये असेल, हा संशोधनाचाच विषय आहे..! स्थलांतरितांमध्ये जास्त संख्या मजूर आणि विद्यार्थी यांची असते, ज्यांना आपल्या मूळ गावी मतदानासाठी एक-दोन दिवसांसाठी जाऊन येणे अजिबात परवडत नाही.  आणखी एक प्रकार म्हणजे बुद्धिवंतांचे स्थलांतर.. ग्रामीण ते शहर आणि शहर ते परदेश असे बुद्धिवंत लोकांचे स्थलांतर होते. ही आकडेवारी तुलनेत कमी असली तरी हा वर्ग निवडणुकांमध्ये वैचारिक आणि निर्णायक परिणाम देणारा असतो, जो मतदानापासून स्थलांतरामुळेच वंचित राहतो. एकूणातच, लोकसंख्येतील फार मोठा घटक मतदान करण्यापासून 'स्थलांतर' या एकाच कारणास्तव वंचित राहतो आहे.

कायमस्वरूपी स्थलांतरित लोकांना नवीन ठिकाणी मतदार यादीत नाव कसे नोंदवायचे, याची माहिती अनेकदा नसते. वर्तुळाकार व तात्पुरते स्थलांतर करणाऱ्यांना हा पर्यायदेखील उपयोगी ठरत नाही. १९७९ साली आंतरराज्यीय स्थलांतरित जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी एक कायदा, 'इन्स्टंट मायग्रंट वर्कमन अॅक्ट' केला गेला, त्यात या अधिकारांचा विचार होऊ शकला असता; परंतु तो आजपावेतो कागदावरच आहे. भारतीय संविधानानुसार, मतदान हा घटनात्मक अधिकार, तसेच मौलिक कर्तव्य मानले जाते. सर्वोच्च न्यायालयानेही, मतदानाचा अधिकार हा 'आविष्कार (अभिव्यक्ती) स्वातंत्र्य' या मूलभूत अधिकाराचाच भाग असल्याचे कैकदा नमूद केले आहे. परंतु, राजकीय पक्ष आणि निवडणूक आयोग यांच्या उदासीनतेचा परिपाक म्हणजे मतदानाची टक्केवारी अर्ध्यावरच राहते.

पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाची सुविधा देण्याचे अधिकार निवडणूक आयोगास आहेत. २०१९च्या निवडणुकीत, तशी काहीअंशी यशस्वी उपलब्धता करून दिली गेली होती. याची व्याप्ती वाढवली पाहिजे. आजच्या ऑनलाइन युगात, 'स्थलांतरितांचे मतदान' साध्य करणे फार काही अवघड नाही. सध्या निवडणूक आयोगाकडून 'दूरस्थ इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्र' (आरव्हीएम) सारख्या यंत्रांवर प्रयोग करणे सुरू आहे, ही थोडी सकारात्मक गोष्ट म्हणावी लागेल. नवीन ठिकाणी मतदार यादीत नाव नोंदवून घेण्यासंदर्भात अधिकाधिक जनजागृती देखील महत्त्वाची ठरू शकते, याचादेखील विचार व्हायला हवा.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग