मिलिंद कुलकर्णी
काँग्रेस] जनता पक्ष या दोन राष्टÑीय पक्षांनी बंडखोरी] फूट] पक्षांतरे सर्वाधिक बघीतली- त्या तुलनेत पूर्वीचा जनसंघ आणि आताचा भाजप] कम्युनिस्ट पक्ष यांनी हा अनुभव कमी वेळा घेतला- महाराष्टÑ आणि खान्देशच्यादृष्टीने ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या संभाव्य पक्षांतरामुळे भाजपमध्ये मोठी बंडखोरी होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे- एकेकाळी आमदार] खासदार असलेल्या नेत्यांनी देखील बंड केल्याचे] पक्षांतर केल्याचे भाजपमध्ये घडलेले आहे- त्यात फार यश आले आहे] असाही इतिहास नाही- या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार राहिलेल्या खडसे यांच्या बंडाचे परिणाम भाजपवर दूरगामी होऊ शकतात- देशभक्ती] चारित्र्यनिर्माणाचे ध्येय बाळगून कार्य करणाºया राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून पूर्वीचा जनसंघ आणि आताचा भाजप राजकारणात सक्रीय झाला- खान्देशात राज्याच्या राजकारणात ठसा उमटविणाºया मोजक्या नेत्यांमध्ये उत्तमराव पाटील यांचे नाव ठळकपणे घेता येईल- १९५ॐ मध्ये ते पहिल्यांदा धुळे लोकसभा मतदारसंघातून जनसंघाचे खासदार म्हणून निवडून आले होते- त्यानंतर पारोळा विधानसभा मतदारसंघातून १९ॐ८ मध्ये जनसंघाचे विलीनीकरण झालेल्या जनता पक्षातर्फे उत्तमराव पाटील हे निवडून आले आणि राज्य मंत्रिमंडळात ज्येष्ठ मंत्रीपद भूषविले- १९८९ मध्ये एरंडोल लोकसभा मतदारसंघातून भाजपतर्फे ते खासदार म्हणून निवडून आले- खान्देशचे प्रभावी नेतृत्व म्हणून उत्तमरावांकडे बघीतले गेले- जनसंपर्क] नातेगोते] अभ्यासूपणा यामुळे उत्तमरावांचा ठसा उमटला- त्याकाळात उत्तमरावांसारख्या बहुजन नेत्याने प्रतिकूल परिस्थितीत जनसंघ] भाजपसारख्या पक्षात निष्ठेने कार्य केले- जय पराजय आले] पण ते डगमगले नाही- भाजप & शिवसेनेच्या युतीत १९९१ मध्ये एरंडोल मतदारसंघ सेनेकडे गेला असताना उत्तमरावांचे पूत्र प्रदीप यांनी सेनेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती- खान्देशातील भाजपचे पहिले आमदार म्हणून डॉ-गुणवंतराव सरोदे ळ्रावेरव्] गोविंदराव चौधरी ळ्साक्रीव् हे निवडून आले- गुणवंतराव पुढे १९९१ व १९९६ मध्ये त्यावेळेच्या जळगाव लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले- मधुकरराव चौधरी &जे-टी-महाजन या काँग्रेसजनांचे वर्चस्व असलेल्या मधुकर सहकारी साखर कारखान्यात अनेक वर्षे संचालक होते- वाय-जी-महाजन] हरिभाऊ जावळे यांनीही नंतर या मतदारसंघाचे नेतृत्व केले- दोघांवर आघात झाले] पण ते डगमगले नाही- पक्षांतराचा विचार केला नाही- गोविंदराव चौधरी हे पहिल्या युती सरकारच्या काळात मंत्री देखील होते- पण तीन वेळा आमदार आणि दोनदा धुळे लोकसभा मतदारसंघात उमेदवारी केल्यानंतरही चौधरी यांनी २००९ मध्ये साक्री मतदारसंघात बंडखोरी केली होती- भाजपमधील आमदारांची दुसरी फळी १९९० मध्ये तयार झाली- मुक्ताईनगरातून एकनाथराव खडसे तर चाळीसगावातून अॅड-ईश्वर जाधव आमदार म्हणून निवडून आले- खडसे २०१४ पर्यंत विजेते राहिले- एकदाही त्यांचा पराभव झाला नाही- मात्र त्यांचे सहकारी जाधव यांना भाजपने १९९५ मध्ये उमेदवारी दिली नाही- त्यांनी बंड करीत अपक्ष निवडणूक लढवली- अर्थात प्रा-साहेबराव घोडे यांच्यारुपाने भाजपने ती जागा राखली- याच चाळीसगावात २०१४ मध्ये माजी केद्रीय मंत्री एम-के-अण्णा पाटील यांच्या पुत्राने बंडखोरी करीत शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती- अर्थात उन्मेष पाटील यांच्यारुपाने तेव्हादेखील भाजपने जागा कायम राखली- रावेरचे अरुण पाटील व अमळनेरचे डॉ-बी-एस-पाटील या विद्यमान आमदारांना २००९ मध्ये भाजपने तिकीट नाकारले होते- अरुण पाटील हे १९९५ व २००४ मध्ये आमदार होते- त्यांच्याऐवजी शोभा विलास पाटील या सभापतींना भाजपने तिकीट दिले आणि ही जागा गमावली- पाटील राष्टÑवादी काँग्रेसमध्ये गेले आणि २०१४ मध्ये मुक्ताईनगरात त्यांनी खडसेविरुध्द राष्टÑवादीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती- अमळनेरमध्ये तीनवेळा आमदार राहिलेल्या आणि २००ॐ च्या पोटनिवडणुकीत एरंडोल लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविलेल्या डॉ-बी-एस-पाटील यांचे तिकीट कापण्यात आले- अनिल भाईदास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली- मात्र हा प्रयोग फसला- २०१४ मध्येही अनिल भाईदास पाटील पराभूत झाले- राष्टÑवादीत गेल्यानंतर २०१९ मध्ये ते आमदार म्हणून निवडून आले- इकडे डॉ-बी-एस-पाटील यांनी बंडखोरी करीत विधानसभा निवडणूक लढवली होती-त्यामुळे अशोक फडके] कानजी प्रेमजी जोशी] राजाभाऊ पवार] श्रीनिवास अग्रवाल यांच्यसारख्या जनसंघाच्या नेत्यांनी अनेकदा निवडणुका लढवल्या] पराभव झाला] पण पक्षाशी प्रतारणा केली नाही- पुढे पक्षश्रेष्ठी प्रतारणा करु लागल्याने बंडखोरीचे लोण भाजपमध्ये पसरले-