शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
2
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
3
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
4
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
5
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
6
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
7
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
8
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
9
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
10
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
11
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
12
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
13
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
14
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
15
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
16
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
17
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
18
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
19
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
20
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात

सण-उत्सवांची अशी पर्वणी जगात कुठेही नाही; जीवनाचा उत्सव करून त्यांचा आनंद घ्या

By विजय दर्डा | Published: September 09, 2024 7:24 AM

आपल्या प्रत्येक सणाच्या मागे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि एक विचार असतोच. या सणांमध्ये लोकांना एकत्र आणण्याची जबरदस्त क्षमताही असते !

नुकतेच मी पर्युषण पर्व साजरे केले आणि आता गणेशोत्सवाचा आनंद घेत आहे. दुसऱ्या एखाद्या देशात जन्माला आलो असतो तर हे सुख मला मिळाले असते काय? अंतर्मनात उमटलेल्या या प्रश्नाचे उत्तर माझे ऊर अभिमानाने भरून टाकते. परमेश्वराने मला भारतीय नागरिक म्हणून जन्माला घातले. माझ्या संस्कृतीमुळे मला गौरवान्वित झाल्यासारखे वाटते. जगातल्या अनेक देशांत जाण्याची संधी मला मिळाली. वेगवेगळ्या देशात वेगळी संस्कृती, धर्म, वेगवेगळ्या धारणा असलेले माझे मित्रही आहेत. ते मला नेहमी विचारतात, भारतात नक्की सण असतात तरी किती? इतके सगळे उत्सव तुम्ही भारतीय लोक का साजरे करता? आणि तेही इतक्या प्रेमाने....! मी त्यांना म्हणतो, असा हिशेब करणे अशक्य आहे. आम्ही काही उत्सव राष्ट्रीय पातळीवर साजरे करतो आणि काही पूर्णपणे स्थानिक स्वरूपाचे असतात; परंतु आमचे सगळे उत्सव हे निसर्गाशी जोडलेले असतात, हे मात्र निश्चित! शिवाय आमचे सगळे उत्सव विज्ञानाच्या निकषांवर उतरतात. 

पर्युषण पर्वाच्या शेवटच्या दिवशी संवत्सरी पर्वात मी प्रतिक्रमण, पूजा करून ८४ लाख योनीतून फिरताना जाणता अजाणता झाल्या असतील तर त्या चुकांबद्दल क्षमा मागितली. माझ्या मनात कटू शब्द उच्चारणाची नुसती इच्छा जरी उत्पन्न झाली असेल तर त्यासाठी मी वाकून, हात जोडून केवळ मोठ्यांचीच नव्हे तर माझ्या सहकाऱ्यांची, अगदी घरात साफसफाई करणाऱ्या लोकांचीही क्षमा मागितली. क्षमा मागू शकणे आणि क्षमा करू शकणे यापेक्षा दुसरी कोणतीही चांगली गोष्ट नाही. भगवान महावीरांनी तर क्षमेवरोवर अहिंसा, अपरिग्रह आणि चोरी न करण्याचा मंत्र दिला. हा मंत्र जगाने अमलात आणला तर प्रत्येक माणूस माणुसकीचे प्रतीक होऊन जाईल. एका गोष्टीचे अनेक पैलू असतात 'अनेकांत सूत्र' भगवान महावीरांनी सांगितले. आपण ज्या दृष्टिकोनातून पाहत आहात तो बरोबरच आहे आणि मी ज्या दृष्टिकोनातून पाहतो, तोही बरोबर आहे. आपण याला त्रिमिती म्हणू शकता. असे झाले तर सगळे वाद‌विवाद संपून जातील. चेतना जागृत करण्याविषयीही बुद्धांनी सांगितले आहे. आपली सगळ्यांची चेतना जागृत झाली तर आपला समाज किती विवेकशील होईल?

गणेशोत्सवाचा आनंद शिगेला पोहोचलेला असताना एका नेमक्या संदेशाने माझे लक्ष वेधले हे रिद्धी सिद्धीच्या दात्या, प्रेमाने भरलेले डोळे, श्रद्धेने झुकलेले मस्तक मला दे... सहकार्य करणारे हात, सन्मार्गावर चालणारे पाय, सुमंगल इच्छिणारे मन आणि सत्य बोलणारी जीभ मला दे. हे ईश्वरा, आपल्या सर्व भक्तांना तुझ्या कृपादृष्टीने सुखी कर। आपण सगळ्यांसाठी मागतो हे आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. ही संस्कृती चराचरात जीवन पाहते. आपण पशुपक्ष्यांची पूजा तर करतोच, दगडांचीही करतो. कारण सृष्टीत जे काही आहे ते पूजनीय आहे असा भाव आपण बाळगतो. आपल्यासाठी पृथ्वी, आकाश, हवा, पाणी आणि अग्नी ही सर्व पंचतत्त्वे पूजनीय आहेत. 

माझे विदेशातले एक मित्र गणेशोत्सवाच्या काळात मुंबईला आले होते. गणेशोत्सवातील उत्साह पाहून त्यांना आश्चर्य वाटले. शरीर तर माणसाचे; परंतु डोके हत्तीचे ही अशी प्रतिमा कशी असू शकते? हे त्यांना काही केल्या समजत नव्हते. असे शक्य आहे काय? त्यांनी मला विचारले. गणपतीच्या धडावर हत्तीचे डोके कसे लागले, त्यासंबंधीची पौराणिक गोष्ट मी त्यांना सांगितली. आमच्या संस्कृतीत प्रत्येक जीवमात्राला समान दर्जा दिला जातो याचे प्रतीक म्हणजे ही आकृती, हेही मी स्पष्ट केले. म्हणून तर आपण गणपतीचे वाहन असलेल्या उंदराचीही पूजा करतो. 

होळीपासून दसरा दिवाळीपर्यंतच्या विविध प्रसंगांचे वर्णन मी या मित्राशी बोलताना केले. रावण किती प्रकांड पंडित आणि शक्तिशाली होता. इतका शक्तिशाली आणि बलवान की देवतासुद्धा त्याच्या समोर नतमस्तक असत; परंतु केवळ अहंकारामुळे रावणाचा सर्वनाश झाला. भारतीय संस्कृतीतील रावण दहनाच्या प्रसंगातून 'आपण आपल्या वास्तव जीवनातील वाईट गोष्टी काढून टाकल्या पाहिजेत' हेच तर सांगितले आहे. पोळ्यापासून संक्रांत, गुढीपाडव्यापर्यंत उत्सवांशी जोडलेल्या अनेक कहाण्या चर्चेच्या ओघात मी या मित्राला सांगितल्या, तर शेवटी त्यांनी हात जोडले. भारतीय सणात निसर्गाविषयीचा आदरभाव, मानव कल्याण आणि माणुसकीचे संदेश खोलवर दडलेले आहेत हे मान्य केले. 

आम्ही लहान होतो तेव्हा मोहरमच्या ताजियासमोर वाघ होऊन नाचत असे. नाताळला घरात आनंद असायचा. आजही आम्ही उत्साहाने नाताळ साजरा करतो. हीच आपली संस्कृती आणि शक्ती आहे. विदेशीसुद्धा जेव्हा भारताची संस्कृती श्रेष्ठ आहे असे मानतात, तेव्हा अभिमान वाटतो, परंतु आधुनिकतेच्या आहारी गेलेल्या भारतीयांना आपल्याकडच्या काही धारणा मागासलेल्या वाटतात तेव्हा मात्र अतिशय दुःख होते. हे लोक आपल्या मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख योग्य प्रकारे करून देत नाहीत. जो समाज आपल्या संस्कृतीपासून दूर जातो तो आयुष्याचा पाया डळमळीत करतो हे त्यांना उमगले पाहिजे... उत्सव लोकांना एकत्र आणतात, जोडतात. प्रत्येकाला आर्थिक संधीही उपलब्ध करून देतात. या सणांना जीवनाचा उत्सव करून त्यांचा आनंद घ्या. विजेच्या वेगाने नवी ऊर्जा सळसळत असल्याचा अनुभव तुम्हाला येईल. सणांच्या मागचा खरा हेतू तोच तर असतो!

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2024