शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
4
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
5
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
6
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
7
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
8
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
9
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
10
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
11
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
12
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
13
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
14
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
15
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
16
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
17
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
18
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
19
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
20
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला

कष्टाविना फळ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2017 11:35 PM

रामदासस्वामी म्हटले की, आपल्याला त्यांचे मनाचे श्लोक, दासबोध, आरत्या हे लेखन चटकन आठवते.

रामदासस्वामी म्हटले की, आपल्याला त्यांचे मनाचे श्लोक, दासबोध, आरत्या हे लेखन चटकन आठवते. पण अगदी खेड्यापाड्यातील लोकांना आवडेल असे लोकसाहित्य त्यांनी सहजपणे व विपुल लिहिल्याचे दिसते. डफगाणी, देवीच्या भक्तांना प्रिय अशी लयबद्ध कवनेही त्यांनी लिहिली आहेत. त्यांच्या एका डफ गाण्यात अवघडराव, अभिमानराव, धीरराव असे अवघे रावच राव आहेत तर दुसऱ्या डफगाण्यात क, ख, जपासून सुरू होणाऱ्या गावांची नावे आहेत. एका ओवीत सात-आठ गावे सांगता सांगता ६० ओव्यातून चारपाचशे गावांची नावे त्यांनी दिली आहेत.रामदासस्वामी हे समाजजीवनाशी जोडले गेलेले इहवादी संत होते. प्रपंचाचे व्यर्थपण अधोरेखित न करता ‘आधी प्रपंच करावा नेटका। मग पाहावे परमार्थ विवेका’ हे परखड विचार त्यांनी समाजापर्यंत पोहोचवले. समर्थांनी मारोती उपासना आणि रामभक्तीतून स्वराज्य स्थापनेची प्रेरणा लोकात जागवली. लोकमान्य टिळकांनी कदाचित यातूनच प्रेरणा घेऊन सार्वजनिक गणेशोत्सवातून एका कालसापेक्ष चैतन्य समाजाला दिले असावे असे वाटते.बारा वर्षे तप केल्यावर त्यांनी हिमालय ते कन्याकुमारी आणि सोरटी सोमनाथ ते कामरूप असे भारतभ्रमण केले. देशभर होणारी लुटालूट, नापिकी, घरेदारे जाळणे, गुरे पळवणे, गावांचा विध्वंस, बायकांचे अपहरण सारे त्यांनी पाहिले. नि:सत्त्व जनता, प्रतिकारशून्य मृतवत् समुदाय पाहिला. अस्मानी-सुल्तानी आणि परचक्र निरूपण ही दोन प्रकरणे त्याकाळची सामाजिक परिस्थिती चितारणारी आहेत.अकरा महिन्यांच्या काशी मुक्कामात मुक्त झालेल्या आपल्या देशाचे जे स्वप्न त्यांनी पाहिले ते आनंदभुवन किंवा श्रीवनभुवनी या काव्यात त्यांनी शब्दबद्ध करून ठेवले. ‘समर्थ साधक’ या नावाने रामदासांविषयी महत्त्वाची माहिती देताना समर्थांचा प्रभावी हजरजबाबीपणा लेखकाने व्यक्त केला आहे. ते सांगतात की, समर्थ सज्जनगडावरून चाफळास निघाले असता मार्गात पाली येथील खंडोबा यात्रेत त्यांनी शाहिरांचे सवालजवाब ऐकले.जिंकल्यामुळे गर्वाने फुगलेल्या शाहिराला त्यांनी प्रश्न टाकला - ‘किती पृथ्वीचे वजन? किती आंगोळ्या गगन। सांग सिंधूचे जीवन किती टाक? किती आकाशीचा वारा। किती पर्जन्याच्या धारा। तृण भूमीवरी सखया। संख्या सांग।। अशी मर्यादांची जाणीव देत निरुत्तर करणारा, नशिबाला दोष देणाऱ्यांना ‘कष्टाविण फळ नाही’, अचूक यत्न करायला हवेत हे सांगणारा मार्गदर्शक मोलाचा असतो. संत रामदास हे असेच मार्गदर्शन करणारे संत होते. त्यांनी प्रत्यक्ष शिवाजीमहाराजांनाही उपदेश करण्यात मागे-पुढे पाहिलेनाही.-डॉ. सौ. प्रज्ञा आपटे