शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

जिवंत राहातील त्या मगरी, मरतील ते बिचारे मासे!

By admin | Published: November 18, 2016 12:45 AM

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने डाव्या विचाराची जी चांगली आणि गंभीर माणसे देशाला दिली त्यात आताच्या डाव्या कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी हे एक आहेत.

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने डाव्या विचाराची जी चांगली आणि गंभीर माणसे देशाला दिली त्यात आताच्या डाव्या कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी हे एक आहेत. कमालीचे संयमी, ठाम पण वर्मावर घाव घालणारे वक्तव्य करणाऱ्यांत त्यांचा हात दुसरा कोणी क्वचितच धरू शकेल. मोदी सरकारने चलनबदलाचा निर्णय देशावर लादून त्यात आज जो गोंधळ उभा केला आहे त्यावर त्यांनी संसदेत केलेले भाषण जेवढे अभ्यासपूर्ण आहे, तेवढीच या सरकारने देशातील ६३ बड्या धनवंतांची ४८ हजार कोटी रुपयांची कर्जे माफ करण्याच्या घेतलेल्या निर्णयावरील त्यांची टीका मर्मभेदी आहे. चलनबदलाचा निर्णय आल्यापासून देशातील सामान्य माणसांनी त्यांच्याजवळचा सुमारे ६० हजार कोटींचा पांढरा पैसा राष्ट्रीयीकृत बँकांत जमा केला. या बँकांची धनवंतांकडील कर्जाची थकबाकी ८० टक्क्यांहून अधिक मोठी आहे. त्याही स्थितीत या बँकांनी मागील वर्षी १.४८ लक्ष कोटींची मोठी कर्जे माफ केली आहेत. या बँकांच्या रिकाम्या तिजोऱ्या सामान्य माणसांच्या पैशांनी आता बऱ्यापैकी भरल्यानंतर त्यांनी या उद्योगपतींना पुन्हा ४२ हजार कोटी रुपये दानासारखे दिले आहेत. देशभरातील शेतकऱ्यांवरील एकूण कर्जे ७२ हजार कोटींची तर तेवढ्याच कर्जाची थकबाकी एकट्या अदानी या उद्योगपतीकडे राहिली आहे. मात्र उद्योगपतींची कर्जे माफ करताना औदार्य दाखवणारे मोदींचे सरकार शेतकऱ्यांबाबत ते दाखवायला तयार नाही. दरम्यान सामान्य माणसांच्या बँकांसमोरील रांगा तशाच आहेत आणि त्यातील ३३ माणसे आतापर्यंत मृत्यू पावली आहेत. या स्थितीत सरकारने विजय मल्ल्याकडील १२०१ कोटी, अजय कुमार बिष्णोईच्या जीईटी पॉवरकडील ४०० कोटी, सूर्या फार्मास्युटिकल्सकडील ५२६ कोटी, केईएस आॅईलकडील ५९५ कोटी आणि सुनील कक्कडच्या साई इन्फो सिस्टीमकडील ३७६ कोटी रुपयांचे कर्ज माफ करून टाकले आहे. कर्ज बुडविणारे हे उद्योगपती देशातील सर्वश्रेष्ठ १०० थकबाकीदारांपैकी आहेत. यापैकी ६३ जणांची सारी कर्जे बँकांनी माफ केली असून ३१ जणांना अंशत: माफी दिली आहे. उरलेल्या अनेकांना बुडित कर्जाच्या (एनपीए) यादीत टाकले आहे. आपल्या नागरिकांची अशी वर्गवारी करणाऱ्या सरकारला कर्ज बुडविणाऱ्यांचा राग नाही आणि आपल्याकडील पैसे बँकेत भरायला दीर्घकाळ रांगा लावणाऱ्या सामान्य माणसाविषयी त्याला प्रेमही नाही. गरीबांचे काळ आणि धनवंतांचे दाते होण्याच्या सरकारच्या या कृतीवर भाष्य करताना सीताराम येचुरी म्हणाले, मगर मारण्यासाठी तलाव रिकामे केले जातात तेव्हा मगर मरत नाही कारण त्यांना पाण्यातल्यासारखेच जमिनीवरही जिवंत राहता येते. मात्र तलाव कोरडे करण्याच्या त्या प्रयत्नात गरीब मासे मात्र मरत असतात. मोदी सरकारच्या चलनबदलाच्या निर्णयाचा व आताच्या बड्यांकडील कर्जमाफीच्या निर्णयाचा नेमका परिणाम असा आहे. हा निर्णय गरीबांना बुडवणारा आणि त्यांचे पैसे हिरावून घेऊन ते कर्जबुडव्या श्रीमंतांची घरे भरणारा आहे. मागील वर्षी ज्या धनवंतांनी बँकांची कर्जे बुडवली त्यांच्यापैकी बहुतेकांनी ती सहेतूक व गुन्हेगारी वृत्तीने बुडविली हे रिझर्व्ह बँकेने देशाला सांगितले आहे. या आरोपींची नावे सरकारने एका बंद लिफाफ्यातून सर्वोच्च न्यायालयाला सादरही केली आहेत. मात्र या बड्या माणसांविषयी सरकारला वाटत असलेला विशेष आदर असा की ही नावे जाहीर केल्याने त्या चांगल्या माणसांची देशात बदनामी होईल असे सरकारला वाटते. सबब गरीबांची घरे कर्जवसुलीसाठी लिलाव करणारी सरकारे बड्यांच्या बाबत असे मौन पाळतात हेच यातून स्पष्ट झाले आहे. सीताराम येचुरींनी मगरी आणि मासे यांची नावे देऊन धनवंतांची केली जाणारी सरकारी तरफदारी आणि गरिबांविषयीचा सरकारचा तिरस्कार यावर नेमके बोट ठेवले आहे. मोदींचे सरकार सत्तारुढ झाल्यापासून त्याने श्रीमंतांना व उद्योगपतींना नुसत्या जास्तीच्या सवलतीच दिल्या नाहीत तर त्यांच्यातील चोर वृत्तीच्या काहींना देशातून बाहेर जायला व परदेशांचा आश्रय घ्यायला साथही दिली आहे. विजय मल्ल्या आणि ललित मोदी ही त्यातली आता जगविख्यात झालेली उदाहरणे आहेत. दुसरीकडे चार हजार रुपये बँकेतून काढण्यासाठी जाणाऱ्या सामान्य स्त्रीपुरुषांच्या उजव्या हाताच्या बोटावर काळ््या शाईचा ठिपका उमटवून व त्यांनी पुन्हा बँकेत येऊ नये अशी व्यवस्था करून या सरकारने सामान्य जनतेविषयीचा आपला अविश्वासही प्रगट केला आहे. रांगेत उभे राहून मरणाऱ्यांविषयी भाजपाच्या पुढाऱ्यांना वाटणारी आस्थाही कमालीची संतापजनक आहे. माणसे काय, ती रेशनच्या रांगेतही मरतात असे त्या पक्षाच्या एका राष्ट्रीय उपाध्यक्षाने म्हटले आहे. ज्यांची कर्जे माफ केली त्यांची कर्जे माफ न दाखवता थकित म्हणून दाखविण्याची चतुराईही सरकारने केली आहे. ही थकिती ‘अ‍ॅडव्हान्स अंडर कलेक्शन अकाऊंट’ अशा फसव्या नावाने दिली जात असल्याची कमालीची हास्यास्पद माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत दिली आहे. हे बडे कर्जबुडवे हेतूपूर्वक कर्जे बुडवतात असे एकीकडे म्हणायचे आणि आमचा त्यांच्याकडील कर्जांची वसुली करण्याचा प्रयत्न जारी आहे असे दुसरीकडे सांगायचे, हा प्रकार आता लोकांच्या चांगल्या माहितीचा झाला आहे. या प्रकाराचा काही काळाने लोकांना विसर पडताच ती कर्जे माफ करण्याचाही प्रकार मोदी सरकारने याआधी केला आहे. हे सरकार गरीबांचे वाली नसून श्रीमंतांचे रखवालदार आहे अशी त्यावर राहुल गांधींनी केलेली टीका त्याचमुळे खरी वाटणारी आहे. आपल्याकडील पैसा वसूल करण्यासाठी धमक्या देणारे सरकार धनवंतांकडील बुडीत कर्जे कोणताही गाजावाजा न करता कसे माफ करते हे आता गरीबांनाही समजले पाहिजे. आश्चर्य याचे की आपल्या या दुटप्पी निर्णयावरही देशातील जनता प्रसन्न आहे व तीत एक खुशीची लहर उमटली आहे असे प्रत्यक्ष पंतप्रधानांनीच म्हटले आहे. चलनबदलाच्या निर्णयाने देशातील इमानदार लोकांचा प्रथमच सन्मान झाला असून बेईमान लोक दु:खी झाले आहेत असेही ते म्हणाले आहेत. यातली विसंगती एवढीच की घरच्या नोटा घेऊन बँकांच्या समोर रांगा लावणारी माणसे कुठे हंसताना दिसली नाहीत. उलट त्या रांगा लांबल्या की त्यांच्या नजरेत संताप व चेहऱ्यावर तिरस्कार उमटलेलाच साऱ्यांना दिसला आहे. दुसरीकडे जी माणसे दु:खी झाली असे मोदी म्हणतात त्यांनाही कोणी अश्रू गाळताना पाहिले नाही. धनवंत माणसे तशीही आपल्या दोन नंबरच्या व्यवहारांची आगाऊ काळजी घेत असतात आणि त्यांना सरकारी व्यवहार चांगले ठाऊकही असतात.

सुरेश द्वादशीवार, (संपादक, लोकमत, नागपूर)