शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

महात्मा गांधींच्या विचारांचे आचरण व्हायला हवे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 5:39 AM

महात्मा गांधी हे संत प्रवृत्तीचे, महापुरुष होते. त्यांच्यासाठी सत्य हाच ईश्वर होता. गांधी-विनोबा यांचा एक दिवस नसतो तर त्यांच्या विचारांवर ३६५ दिवस जगायचे असते.

- टीआरके सौमय्या(व्यवस्थापकीय विश्वस्त, बॉम्बे सर्वोदय मंडळ)महात्मा गांधी हे संत प्रवृत्तीचे, महापुरुष होते. त्यांच्यासाठी सत्य हाच ईश्वर होता. गांधी-विनोबा यांचा एक दिवस नसतो तर त्यांच्या विचारांवर ३६५ दिवस जगायचे असते. मी १० वर्षांचा असताना गांधीविचारांनी माझ्या मनावर गारुड केले. त्यामुळे मी गांधीजींच्या विचाराप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करु लागलो. सत्य, अहिंसा, प्रेम, करुणा या विचारांचा प्रचार, प्रसार करण्याचा व त्याप्रमाणे वाटचाल करण्याचा प्रयत्न करतो. मात्र काही वेळा मला खोटे बोलावे लागते, त्याची खंत आहे. माझे खोटे बोलणे माझ्या स्वार्थासाठी नव्हे तर इतरांसाठीच असते. मात्र माझ्यातील हा दुर्गुणदेखील कमी करण्याचा प्रयत्न मी करत आहे. गांधी जयंती एक दिवस, एक सप्ताह साजरी करण्याऐवजी त्यांचे विचार दररोज आचरणात आणण्याची गरज आहे.माझे वय ८२ वर्षे आहे. मात्र तरुणाई, नवीन पिढी गांधी विचार पुढे नेण्यासाठी पुरेशा प्रमाणात पुढे येण्यास इच्छुक नाही, हे चित्र मनाला अतिशय वेदना देणारे आहे. नव्या पिढीत गांधी विचार रुजवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत़ मात्र हव्या त्या प्रमाणात तरुणाई याकडे वळण्यास इच्छुक नसल्याचे चित्र आहे. सर्वोदय मंडळाच्या माध्यमातून गांधी विचार प्रसार, प्रचार करण्याचे काम करण्यासाठी कोणी इच्छुक स्वत:हून पुढे येत नाही. नि:स्वार्थ भावनेने हे काम करण्याची गरज आहे. कॉर्पोरेट संस्कृतीप्रमाणे दर महिन्याला गलेलठ्ठ पगार घेऊन हे काम यशस्वी होणार नाही. मात्र सामाजिक कार्याच्या हेतूने नि:स्वार्थ भावनेने गांधी विचार पुढे नेण्यासाठी कोणी तयार होत नाही, हे दुर्दैव आहे. एकीकडे मंडळाच्या खर्चात महागाईमुळे सातत्याने वाढ होत असून दुसरीकडे या कार्यासाठी मिळणाऱ्या निधीमध्ये पूर्वीच्या तुलनेत मोठी घट होताना दिसत आहे. ही परिस्थिती चिंताजनक अशीच आहे. देणगीदारांमध्ये मोठी घट झाली आहे.तुरुंगातील शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांमध्ये मतपरिवर्तन व्हावे यासाठी आम्ही कैद्यांपर्यत गांधी विचार पोहोचवून त्यांच्या परीक्षा घेतो. एकाही कैद्याचे खºया अर्थाने मतपरिवर्तन झाले तर ते आमच्यासाठी मोठे यश असते. जास्तीत जास्त जणांपर्यंत गांधी विचार पोहोचवण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. वेबसाईटच्या माध्यमातून तरुणाईला याबाबत माहिती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. वेबसाईटला २०१९ मध्ये सुमारे १५ लाख जणांनी भेट देऊन गांधी विचार जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये भारतासह अमेरिका, कॅनडा, आॅस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इटली, पाकिस्तान व जगातील १९५ पेक्षा अधिक देशांतील नागरिकांचा समावेश आहे.धर्माऐवजी माणूस म्हणून जगण्यास प्राधान्य देण्याची गरज आहे. सर्वोदय मंडळात गांधी जाणून घेण्यासाठी देश विदेशातून नागरिक येतात. गांधी विचारांवर आचरण करणारी माणसे कमी कमी होत चालली असली तरी आमचा लोकांच्या विचारशक्तीवर पूर्ण विश्वास असून महात्मा गांधीची हत्या करणाºया नथुराम गोडसे प्रवृत्तींना समाज जवळ करणार नाही असा आम्हाला विश्वास आहे. सध्या गावागावांत द्वेषाचे वातावरण पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. गांधी विचार किती महत्त्वाचे आहेत याची प्रचीती लोकांना येईल, गांधी विचारांचे महत्त्व लोकांना पुन्हा नक्कीच कळेल. कारण महात्मा गांधींची हत्या झाली असली तरी गांधी विचार कधीच मरणार नाहीत.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीIndiaभारत