शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

तलाव स्वच्छतेसाठी हजारो लोक कापताहेत केस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2023 8:32 AM

‘मी, माझं, मला..’ ही कायमच जगाची प्रवृत्ती राहिली आहे.

‘मी, माझं, मला..’ ही कायमच जगाची प्रवृत्ती राहिली आहे. अलीकडच्या काळात तर त्यात फार मोठी वाढ झाली आहे. आपल्या स्वत:शिवाय आणि आपल्या कुटुंबाशिवाय कोणालाच कसलंच देणंघेणं नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. समाजाप्रति जणू आपलं काही देणंच नाही, अशीच प्रवृत्ती सगळीकडे फोफावते आहे. काही जण मात्र त्याला अपवाद असतात आणि समाजाचं ऋण ते कायम मान्य करीत असतात. आपलं आयुष्यच त्यांनी जणू समाजाप्रति समर्पित केलेलं असतं आणि त्यासाठीच त्यांची धडपड चाललेली असते. आता सेलीन एस्ट्राच या तरुणीचंच उदाहरण घ्या. व्हेनेझुएला येथील २८ वर्षीय ही तरुणी. सर्वसामान्य. पण पर्यावरण आणि समाज याविषयी अत्यंत जागरुक असलेली. 

व्हेनेझुएलामध्ये एक तलाव आहे. या तलावाचं नाव आहे माराकाईबो. हा तलाव गेल्या कित्येक वर्षांत खूप प्रदूषित आहे. त्याकडे लोकांचं तर जाऊ द्या, सरकारचंही लक्ष नाही. तेलाच्या तवंगानं हा तलाव अक्षरश: ‘तेलकट’ झाला आहे. त्यामुळे या तलावातली सजीवसृष्टी तर जवळपास नष्ट झाली आहेच, पण त्यातलं पाणीही कोणालाच कशालाच वापरता येत नाही. हा तलाव पाण्याचा आहे की तेलाचा, हेही लक्षात येऊ नये, इतकं तो क्रूड ऑइलनं माखला आहे. आकाशातून पाहिलं तरी हा तेलाचा तलाव लक्षात येतो.

आता व्हेनेझुएलामध्ये सेलीन एकटीच राहते का? लक्षावधी लोक राहतात आणि गेल्या अनेक वर्षांपासून या तलावाची अशीच अवस्था आहे, पण सेलिनला हे पाहावलं नाही, तिनं ठरवलं, हा तलाव आपण प्रदूषणमुक्त करायचाच. त्यासाठी तिनं कंबर कसली. तलाव कसा स्वच्छ करता येईल, तलावातल्या पाण्याचा तवंग कसा हटवता येईल यासाठी अभ्यास करायला सुरुवात केली, वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या भेटी घेतल्या, विज्ञानावरची आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅगझिन्स वाचून काढली. 

तिच्या लक्षात आलं, हा तलाव साफ करायचा, त्यावरील तेलाचा तवंग नष्ट करायचा तर त्यासाठी ‘केस’ हा जालीम उपाय आहे ! या केसांच्या साहाय्यानं तलावातील तेलाचा तवंग शोषून घेता येईल हे लक्षात आल्यानंतर तिनं लोकांना आवाहन करायला सुरुवात केली, बंधू, भगिनींनो, आपल्या देशाचा ठेवा असलेल्या या तलावाचं ‘शुद्धीकरण’ करण्यासाठी आपले केस दान करा! लोकांनीही सेलिनची ही कल्पना उचलून धरली आणि अक्षरश: हजारो लोकांनी रांगा लावून आपले केस दान करायला सुरुवात केली. अजूनही करताहेत. काही लोकांनी आपल्या कुत्र्यांचेही केस दान केले. स्वयंसेवकांनीही त्यासाठी पुढाकार घेतला. सेलीन ही ‘प्रोएक्टो सिरेना’ या एका पर्यावरणवादी संस्थेचीही अध्यक्ष आहे. तीची टीम आणि स्वयंसेवक आता या केसांच्या माध्यमातून पुढच्या महिन्यात तलावातील तेलाचा तवंग काढणार आहेत. 

सेलीन सांगते, हा एक अतिशय अभिनव असा उपक्रम आहे. आमच्या या उपक्रमाला नक्कीच यश येईल असा आमचा विश्वास आहे. कारण यामागे हजारो सर्वसामान्य लोकांचंही प्रामाणिक योगदान आहे. दोन पाऊंड केसांपासून तब्बल ११ ते १७ पाऊंड तेल शोषलं जाईल असं सेलीनचं म्हणणं आहे. या केसांचा अधिक कल्पक आणि वैज्ञानिक पद्धतीनं वापर करण्यासाठी तसेच हे केस वाया जाऊ नयेत यासाठी या केसाचं मोठ्ठं जाळंही विणलं जाणार आहे. त्यामुळे महत्प्रयासानं गोळा केलेले हे केस आणि त्यांचं जाळं परत परत वापरता येऊ शकेल. 

अनेक दशकांपासून या पद्धतीवर काम करणाऱ्या पर्यावरण शास्त्रज्ञांच्या पावलावर पाऊल टाकत सेलीनचं काम सुरू आहे. अलाबामास्थित केशभूषाकार फिलिप मॅक्रोरी यांनी १९८९ मध्ये मानवी केसांपासून बनवलेल्या तेल-सफाई उपकरणाचा एक नमुना तयार केला होता. त्याचा आधार सेलीननं केसांचं जाळं तयार करण्यासाठी घेतला. 

त्यातून तिला प्रेरणा मिळाली आणि तलाव तेलमुक्त करण्याचा विडा तिनं उचलला. फिलिप मॅक्रोरी यांनी केसांपासून तेलसफाई करणारं जे उपकरण तयार केलं होतं, त्याची नासानंही चाचणी घेतली होती आणि हे उपकरण प्रभावी असल्याचं मान्य केलं होतं. मॅक्रोरीने नंतर ‘मॅटर ऑफ ट्रस्ट’ या कॅलिफोर्नियास्थित संस्थेशी संलग्न होत यासाठी आणखी बरंच काम केलं. ही संस्था गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ मानवी केसांच्या मदतीनं विविध गोष्टी करीत आहे. त्यासाठी मानवी केसांच्याही ती कायम शोधात असते.

टॅग्स :World Trendingजगातील घडामोडी