शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
2
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
3
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
4
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
5
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
6
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
7
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
8
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
9
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
10
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
11
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
12
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
13
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
14
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
15
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
16
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
17
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
18
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
19
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
20
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 

टिम कुक, 'अॅपल' आणि मुंबईचा वडापाव !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 8:00 AM

Tim Cook: 'अॅपल'चे मुंबईतले पहिले दुकान उघडायला खुद्द टिम कुक भारतात येतात आणि माधुरी दीक्षितबरोबर वडापाव खातात, ही गोष्ट वरवर दिसते तेवढी साधी नव्हे!

- -प्रसाद शिरगावकर (मुक्तस्रोत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षक आणि वक्ते)  माधुरी दीक्षित आणि टिम कुक यांचा वडापाव खातानाचा फोटो काल-परवाच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. टिम कुक म्हणजे अॅपल कंपनीचे सीईओ. आयफोन, आयपॅड, मॅकबुक इत्यादी जगप्रसिद्ध प्रॉडक्ट्स तयार करणाऱ्या आणि मार्केट कॅपनुसार जगातली प्रथम क्रमांकाची कंपनी असलेल्या अॅपलचे सीईओ लाखो लोकांच्या हृदयाची धडकन असलेल्या माधुरीबरोबर निवांतपणे हसत-खेळत वडापाव खातानाचं दृश्य अत्यंत रोचक होतं! कुक अॅपलच्या पहिल्या ब्रॅण्डेड स्टोअरच्या उद्घाटनासाठी सध्या भारतात आले आहेत. खरंतर अॅपलची उत्पादनं गेली २५ वर्षे भारतात मिळतात. मात्र, आजवर ती वितरक आणि विक्रेत्यांमार्फत विकली जायची, आता अॅपलने स्वतःची बँडेड स्टोअर्स भारतात उघडायचं ठरवलंय, त्यातलं एक मुंबईत सुरू झालं आणि दुसरं दिल्लीमध्ये असणार आहे. भारतीय बाजारपेठ ही अॅपलसाठी महत्त्वाची आहे, असं टिम कुक यांनी २०१६ सालच्या त्यांच्या पहिल्या भारत भेटीतच सांगितलं होतं. त्यानंतर आता सात वर्षांनी ते पुन्हा भारतात आले आहेत आणि अनेक लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही भेटले...

अॅपल कंपनी गेली २५ वर्षे भारतात असली, तरी त्यांचा भारतीय बाजारपेठेतला 'मार्केट शेअर' हा नगण्य आहे. स्मार्टफोन्सच्या बाजारपेठेत आयफोनचा मार्केट शेअर जेमतेम पाच टक्के आहे. २०२२ मध्ये भारतात सुमारे ६५ लाख आयफोनची विक्री झाली. ह्याच कालावधीत अमेरिका आणि चीन या देशांमध्ये प्रत्येकी पाच कोटी आयफोनची विक्री झाली होती. त्यामुळेच अॅपल आणि स्वतः टिम कुक यांना भारतीय बाजारपेठेमध्ये वाढीची प्रचंड मोठी संधी दिसते. भारत ही जगातली पाचव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आणि दीड अब्ज लोकसंख्येसह जगातला सर्वात मोठ्या लोकसंख्येचा देश. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या गेली अनेक वर्षे भारतीय बाजारपेठेच्या लोण्याच्या गोळ्यावर नजर ठेवून, त्या लोण्याचा जास्तीत जास्त हिस्सा आपल्याला मिळावा, या प्रयत्नात आहेत. अॅपलही ह्या प्रयत्नांमध्ये मागे नाही. भारतामध्ये स्वतःची बॅण्डेड दुकाने उघडणे आणि मार्केटिंगवर जास्त भर देणे याचे प्रयत्न त्यांनी आता सुरू केले आहेत. सध्या सुमारे सहा अब्ज डॉलर्स मूल्याचीभारतातली विक्री येत्या काही वर्षांत २० अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचं अॅपलचं उद्दिष्ट आहे. टीम कुक यांनी स्वतः अॅपल स्टोअरच्या उद्घाटनासाठी येणं हे अॅपल भारताकडे किती गांभीर्याने बघत आहे, याचं निदर्शक आहे.

भारत ही अॅपलसाठी फक्त बाजारपेठ न राहता उत्पादनाचंही एक महत्त्वाचं केंद्र बनावं, अशी टिम कुक यांची दृष्टी आहे. आजवर अॅपलची उत्पादनं प्रामुख्याने चीनमध्ये तयार होत होती. कोरोना काळात चिनी सरकारची धोरणं आणि महासाथीचा उद्रेक हाताळण्यात आलेलं अपयश याचा फटका अॅपलसह सर्वच गमतीशीर गोष्ट म्हणायला हवी! इलेक्ट्रॉनिक उत्पादनांना बसला. भविष्यात पुन्हा अशी वेळ येऊ नये म्हणून अनेक जागतिक उत्पादक चीनला पर्याय शोधू लागले आहेत. अशा उत्पादकांसाठी भारत हे एक अत्यंत आकर्षक आणि महत्त्वाचं केंद्र बनण्याची शक्यता आहे. अॅपलनेही बेंगळुरू येथे आपलं उत्पादन केंद्र सुरू केलं आहे. त्या केंद्रात गेल्यावर्षी 'आयफोन- १४ ची असेंब्ली केली गेली. भारतातली ही उत्पादनक्षमता वाढवून येत्या काही वर्षांमध्ये अॅपलच्या जगभर जाणाऱ्या आयफोन्सच्या सुमारे २५ टक्के आयफोन्सची निर्मिती भारतामध्ये व्हावी, अशी अॅपलची योजना आहे. गुणवत्तेची अत्यंत काटेकोर मानकं असलेल्या अॅपलसारख्या कंपनीने भारतात उत्पादन सुरू केलं, तर त्याचा परिणाम इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादकांवरती होऊन तेही भारतामध्ये आपली उत्पादनक्षमता वाढवू शकतील. हे घडेल तेव्हा भारत हे इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनासाठीच जगातलं एक महत्त्वाचं केंद्र बनण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल पडेल. अर्थातच, ह्याचा भारतातली रोजगार निर्मिती आणि भारताची निर्यात या दोन्हींवर अत्यंत सकारात्मक परिणाम होईल. भविष्यात घड्डू शकणाऱ्या या मोठ्या बदलाचा प्रारंभ मुंबईत एक साधासा वडापाव खाऊन होतो आहे ही मात्र अत्यंत गमतीशीर गोष्ट म्हणायला हवी. 

 

टॅग्स :Mumbaiमुंबईbusinessव्यवसाय