शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे ‘ऑडिट’ करण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 5:19 AM

अलीकडे भारतीय माध्यमांवर शंकेचे मळभ दाटले आहे. अशावेळी माध्यमांनी स्वत:च पुढे येऊन चौकशीला सामोरे जायला हवे व आपली प्रतिमा जपायला हवी.

- ॲड. फिरदौस मिर्झा, ज्येष्ठ विधिज्ञ, नागपूर प्रसारमाध्यमे ही नागरिकांचे डोळे व कान, अर्थात लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. प्रामाणिक, तटस्थ, सरळमार्गी प्रसारमाध्यमे लोकशाहीतील संस्थांचे संरक्षण करू शकतात तर अप्रामाणिक, भ्रष्ट आणि विकलेली प्रसारमाध्यमे लोकशाहीसाठी शाप आहेत. अलीकडे भारतीय माध्यमांवर शंकेचे मळभ दाटले असून, आधीसारखी त्यांची विश्वासार्हता राहिलेली नाही. माध्यमांवर एकच बाजू लावून धरण्याचे, खरे वार्तांकन न करण्याचे आरोप होत असून, त्यांना लोकांनी ‘गोदी मीडिया’ यासारखी नावे दिली आहेत. पराकोटीची बाब म्हणजे ‘टीआरपी’ वाढविण्यासाठी ‘प्राइम टाइम’ दर्शकांची खोटी आकडेवारी दाखविणाऱ्या एका ‘इलेक्ट्रॉनिक मीडिया हाऊस’विरोधात पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केला. या माध्यमातून संबंधित ‘मीडिया हाऊस’ने केवळ खासगी आस्थापनाच नव्हे तर सरकारच्याही जाहिराती जास्त दराने मिळविल्या, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 

गुजरातमधील एका वर्तमानपत्राविरोधात ‘ईडी’ने केलेली कारवाईदेखील जनतेसाठी धक्कादायकच आहे. संबंधित वर्तमानपत्राने गुजरातीचा खप २३ हजार ५०० अंक तर इंग्रजीचा ६ हजार ३०० असल्याचे घोषित केले होते. प्रत्यक्षात त्यांचा खप अनुक्रमे ३०० ते ६०० व ० ते २९० इतकाच होता. अगोदरच लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर संशयाचे ढग दाटलेले असताना, सर्वसामान्य जनता त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नसताना अशा प्रकारच्या घोटाळ्यांमुळे प्रामाणिक वृत्तपत्रांच्या प्रतिमांना तडा जाण्याची भीती आहे. मुद्रित प्रसारमाध्यमांचे नियंत्रण १८६७ च्या प्रेस ॲन्ड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स ॲक्टद्वारे होते. या कायद्यानुसार वर्तमानपत्रांनी स्वत:हून पुरविलेल्या आकडेवारीच्या आधारावर ‘प्रेस रजिस्ट्रार’कडून वर्तमानपत्रांच्या खपाची नोंदणी होते. वर्तमानपत्रांनी पुरविलेल्या माहितीची खातरजमा करण्याची कुठलीही यंत्रणा नाही.
जगाच्या विविध भागात ‘एबीसी’ (ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन) कार्यरत आहेत. भारतात प्रकाशक, जाहिरातदार, जाहिरात एजन्सी सदस्य असलेली एक ‘नॉन प्रॉफिट’ संघटना म्हणून १९४८ मध्ये ‘एबीसी’ची स्थापना झाली. संस्थेचे सदस्य असलेल्या प्रकाशन संस्थांच्या खपाचे आकडे प्रमाणित करणारी ‘ऑडिट’ यंत्रणा ‘एबीसी’ने विकसित केली असून, दर सहा महिन्यांनी खपाचे आकडे ‘एबीसी’कडून घोषित होतात आणि ‘पॅनल’वरील सनदी लेखापालांच्या माध्यमातून त्यांचे ‘ऑडिट’ होते. एकूण मुद्रित माध्यमांच्या खपाच्या आकड्यांबाबत ही संस्था ‘वॉचडॉग’चे काम करते आणि त्यामुळे जाहिरातदारांना विविध प्रकाशनांच्या खपाची खातरजमा करता येते. प्रशासकीय व वाणिज्यविषयक उपक्रमांमध्ये पारदर्शकता येण्यासाठी सरकारकडून जाहिरातींचे प्रमाण अलीकडे वाढत आहे. सार्वजनिक तिजोरीतून त्यासाठी मोठा निधी खर्च होतो; मात्र कमी खपाच्या वर्तमानपत्रांनी आकडे फुगवून जाहिराती पळविल्या तर जाहिराती प्रकाशित करण्याचा उद्देशच फोल ठरतो. सरकारसोबतच सामान्य जनतेचीदेखील फसवणूक होते. जास्त खप दाखविण्यासाठी वर्तमानपत्रांकडून न्यूजप्रिंट खरेदी करून तोच पेपर नंतर काळ्या बाजारात विकण्याचे गैरप्रकार होत असल्याच्या अफवा नेहमीच ऐकायला मिळतात. इलेक्ट्रॉनिक तसेच मुद्रित प्रसारमाध्यमांविरोधात पोलीस व ‘ईडी’तर्फे गुन्हे दाखल झाल्याने जाहिराती मिळविण्यासाठी विविध वर्तमानपत्रांकडून ‘आरएनआय’ तसेच इतर यंत्रणांना पुरविण्यात येणाऱ्या खपाच्या आकड्यांची चौकशी अनिवार्य आहे. सरकारकडून जाहिरातींवर खर्च करण्यात येणारा पैसा हा करदात्यांचा आहे. त्यामुळे ‘मनी लाँडरिंग’ आणि ‘आयपीसी’च्या विविध कायद्यांतर्गत व दक्षता आयोग, ‘ईडी’, ‘सीबीआय’ आणि राज्य पोलीस यांच्या चौकशीच्या कार्यकक्षेत ही बाब येते. एका बाजूला भारतीय प्रसारमाध्यमांची प्रतिमा वेगाने खालावत आहे, तर भ्रष्टाचारविरोधातील लढ्याच्या जागतिक मानांकनातदेखील भारत माघारला आहे. अशावेळी वर्तमानपत्रांनी स्वत:च पुढे येऊन चौकशीला सामोरे जायला व आपल्या क्षेत्राची प्रतिमा जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे केल्याने मुद्रित माध्यमांना परत जनतेचा विश्वास संपादित करता येई. 

टॅग्स :TRP Scamटीआरपी घोटाळा