शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

‘ति’चं अस्तित्व!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2017 11:36 PM

आपल्याला अस्तित्व आहे असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा नक्की काय अभिप्रेत असतं? अस्तित्व म्हणजे असण्याचा धर्म, जिवंत असल्याची स्थिती हे जरी असलं

मी आहे एक सावली, स्वत:चं अस्तित्व असलेलीमी आहे एक अस्वस्थ धडपड,अंधारात प्रकाशवाट होणारी...आपल्याला अस्तित्व आहे असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा नक्की काय अभिप्रेत असतं? अस्तित्व म्हणजे असण्याचा धर्म, जिवंत असल्याची स्थिती हे जरी असलं, तरी त्यात कुठं तरी ‘स्वत्व’देखील अंतर्भूत असतं. या स्वत्वाची जाणीव होण्यासाठी सर्वप्रथम ‘स्व’ला ओळखण्याची सुरुवात व्हावी लागते. हेतूपूर्ण आणि समर्पित अशा जगण्यातूनच अस्तित्वाचा खरा अर्थ उलगडू लागतो आणि एकूणच जगण्याला परिपक्वता येऊ लागते. ही परिपक्वता निरोगी, आनंदी जीवनाच्या जवळ घेऊन जात असते. अस्तित्वाचा व्यापक अर्थ जेव्हा समजून घेऊ, तेव्हा त्याचा संबंध जगण्याशी आहे. ज्या गोष्टी आंतरिक आनंद, समाधान देतात आणि जीवन निरामय बनवतात, तेव्हा अस्तित्वाला वेगळा आयाम प्राप्त होतो.हे सारं विस्तारानं सांगण्याचं कारण म्हणजे, परवा पुण्यात आंतरराष्ट्रीय ‘लोकमत वुमन समीट’ झाली. तिला देश-विदेशातून मान्यवरांची विशेष उपस्थिती लक्षणीय होती. ज्येष्ठ दिग्दर्शक व निर्माते महेश भट, प्रख्यात अभिनेत्री विद्या बालन व दिव्या दत्ता, जागतिक कीर्तीची कुस्तीपटू गीता फोगाट, ख्यातनाम ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी, विनोदी कलाकार सुनील ग्रोवर, लोकमत समूहाचे चेअरमन विजय दर्डा आदिंसह अनेक मान्यवरांची मांदियाळी सभागृहात बौद्धिक, वैचारिक चैतन्य निर्माण करणारी होती. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘युनिसेफ’चा लाभलेला सहयोग या परिषदेची विशेष उपलब्धी ठरली. ‘अस्तित्व’ ही या समीटची केंद्रीय संकल्पना होती. पुरुषप्रधान समाजात स्त्रीला दुय्यम मानण्याचा व तिचं स्वतंत्र ‘अस्तित्व’ नाकारण्याचा अन्याय अनादिकाळापासून होत आला आहे. तिची कधी पिळवणूक होत आली, तर कधी तिच्या आत्मविश्वासाच्याच चिंधड्या उडवल्या गेल्या. ती अबला आहे, असंच ठसवण्याचा प्रयत्न होत गेला. मात्र, स्त्रीप्रश्नांविषयी आस्था असणाऱ्या अनेक विचारवंत, कृतिशील समाजसुधारकांनी आणि पुरोगामी लोकनेत्यांनी तिला मुक्त करण्यासाठी अविरत धडपड केली. प्रबोधनाची चळवळ राबवली. त्यांना होणारा विरोध तीव्र, प्रचंड आणि परिणामांनी भयकारी होता. गेल्या शे-दीडशे वर्षांत स्त्रियांनी लढलेली अस्तित्वाची लढाई, विविध क्षेत्रांत घेतलेली प्रगतीची झेप खरोखर थक्क करणारी आहे. आधुनिक काळात चित्र वेगानं बदलतं आहे. चूल-मूल यापलीकडे जाऊन कर्तृत्वाच्या अवकाशात झेपावण्याचा अधिकार आपल्यालाही आहे, याची तिला जाणीव झाली. तिनं उंबरठा ओलांडला आणि तिलाही तिच्या अफाट क्षमतांची जाणीव झाली. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्वत:चं अस्तित्व निर्माण करण्यापासून ते ‘ति’चं अवकाश विस्तारण्याचा प्रवास लोकमतच्या व्यासपीठावर उत्तरोत्तर रंगत गेला. जीवनाच्या संघर्षात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून टपाल कार्यालयात काम करणारी, रिक्षा चालवणारी, कचरा वेचणारी अशा महिला तिथं होत्या. व्यवसाय-उद्योगात यशस्वी पुरुषांच्या बरोबरीनं धुरा सांभाळणाऱ्या कर्तृत्वशालिनीही होत्या. त्याचबरोबर सैन्यदल, वायुदल, डॉक्टर अशा विविध क्षेत्रांत ‘मर्दुमकी’ गाजवणाऱ्या महिलाही आवर्जून उपस्थित होत्या. एका अर्थानं महिलांचं क्षितिज किती विस्तारलेलं आहे आणि तिनं स्वत:चं ‘अस्तित्व’ किती विविध प्रकारांनी फुलवलेलं आहे, हे दिसून आलं. स्वयंप्रज्ञेनं एकेका कलाक्षेत्राला समृद्ध करणारी, पूर्वपरंपरेला संपूर्ण नवता प्रदान करणारी, जुना वारसा प्रतिभेच्या स्पर्शानं उज्ज्वल करणारी आणि स्त्रीत्वाची अंतर्ज्याेत तेवत ठेवणारी ‘ती’ आजच्या काळात विकासप्रक्रियेची गतिमानता वाढवीत नेणारी स्वयंसिद्धा आहे, हेच जणू त्या सर्वांच्या व्यक्त होण्यातून जाणवत होतं. ‘ति’ची झेप, ‘ति’चं अवकाश ‘ति’चं आकाश, ‘ति’चा प्रकाश‘ति’चं अस्तित्व, तिचा विकासआत्मनिर्भरतेच्या बांधणीतील उत्स्फूर्त आणि मनोज्ञ सहभागातून स्वत:च्या ‘अस्तित्वा’चा शोध आज महिला समर्थपणे घेत आहेत. स्त्रीवरची दडपणं दूर होत जाण्याचा, तिच्या सामाजिक स्थानामध्ये बदल होत जाण्याचा आणि तिच्यासाठी नव्या जगाची दारं खुली होत जाण्याचा मार्ग आता विस्तृत झाला पाहिजे. तिच्या अस्तित्वासह तिचं अवकाश तिला मिळायलाच हवं, हेच नवनीत या मंथनातून निर्माण झालं.- विजय बाविस्कर