शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका"; अजित पवार ग्रामस्थांशी काय बोलले?
2
Maharashtra Election 2024: गुलाबराव विरुद्ध गुलाबराव; मंत्री बनवणाऱ्या 'या' मतदारसंघात चुरशीची लढत
3
“बंडखोरी केलेले लोक आमचेच, समजूत काढण्यात यश येईल”; देवेंद्र फडणवीसांना विश्वास
4
चेन्नईनं १८ कोटी का मोजले? Ravindra Jadeja नं मुंबईच्या मैदानात दिलं उत्तर
5
अबू आझमींच्या अडचणी वाढणार?; सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार; प्रकरण काय?
6
"इंपोर्टेड माल", अरविंद सावंत यांनी आक्षेपार्ह शब्द वापल्याचा शायना एनसींचा आरोप, सावंत म्हणाले...
7
अग्निकल्लोळ! देवघरातील दिव्यामुळे लागली भीषण आग; दिवाळीच्या दिवशी ३ जणांचा मृत्यू
8
५०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत BSNL चा प्लॅन; दीर्घ वैधतेसह मिळणार एक्स्ट्रा डेटा
9
शरद पवार गटाचे उमेदवार समजीत घाटगे अंतरवालीत; मनोज जरांगेंची घेतली भेट, २ तास चर्चा
10
IPL 2025 : स्टार्क, KL राहुल ते मॅक्सवेल! टॉप-१० खेळाडू ज्यांना संघांनी दाखवला बाहेरचा रस्ता
11
"हिरवे कंदिल लावले असते, तर..."; मनसेचा शिवसेना ठाकरे गटाला थेट सवाल
12
शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या प्रचारात; भाजपच्या बंडखोर महिला नेत्याचा मोठा दावा
13
दररोज 6 कोटी रुपयांची फसवणूक, 'डिजिटल अरेस्ट' घोटाळ्यात हराजो लोकांचे नुकसान
14
महायुतीत बंडखोरांचा ३६ चा आकडा, त्यापैकी १९ भाजपाचे; बंड शमले नाहीतर युती-आघाडीला ५० जागांवर फटका
15
Aishwarya Rai Birthday: इन्स्टावर १४.४ मिलियन फॉलोवर्स, पण 'त्या' एका व्यक्तीलाच फॉलो करते मिस वर्ल्ड, कोण आहे ती?
16
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
17
'इमर्जन्सी' ही प्रोपोगंडा फिल्म आहे का? श्रेयसने विचारलेला कंगनाला प्रश्न! अभिनेत्री म्हणाली-
18
"तू तो गया"! सिली पॉइंटवर Sarfaraz Khan चं रचिन विरुद्ध 'स्लेजिंग'; व्हिडिओ व्हायरल
19
८ नोव्हेंबरपासून 'या' कंपनीचा IPO खुला होणार; प्राईज बँड ₹२४, परदेशात आहेत कंपनीचे ग्राहक
20
“मनोज जरांगेंच्या रुपात देशाला आधुनिक गांधी, आंबेडकर, मौलाना आझाद मिळाले”; कुणी केले कौतुक?

धरणीमातेचा आदर राखण्यासाठी...!

By विजय दर्डा | Published: June 14, 2022 9:10 AM

भारतीय परंपरा, संस्कृतीच्या अनुसार जमीन म्हणजे केवळ भा धरणी नाही. ती 'धरणीमाता' आहे.

विजय दर्डा (अध्यक्ष, लोकमत संपादकीय मंडळ)

भारतीय परंपरा, संस्कृतीच्या अनुसार जमीन म्हणजे केवळ भा धरणी नाही. ती 'धरणीमाता' आहे. या मातेचा आदर, सन्मान केला पाहिजे, अशी आपल्या पूर्वजांची शिकवण राहिलेली आहे. रासायनिक खतांच्या अनियंत्रित वापरातून आपण गेल्या काही दशकांत आपल्या धरणीमातेवर नकळतपणे खूप अत्याचार केले. शास्त्रज्ञ सांगतात की, सुपीक मातीचा केवळ १० सेंटीमीटर थर तयार होण्यासाठी दहा-पाच नव्हे, तर तब्बल दोन हजार वर्षे लागतात. एवढ्या मौल्यवान मातीची आपण किती कदर केली पाहिजे?

आपण फार निष्काळजीपणाने वागतो आहोत. दरवर्षी जगातली तब्बल २४ अब्ज टन माती नष्ट होत आहे. मातीची ही हानी आपण वेळेत थांबवली नाही, तर मला भीती वाटते की तो दिवस दूर नाही, जेव्हा आपल्या नातवंडांना सहारा वाळवंट पाहण्यासाठी दूर आफ्रिकेत जावे लागणार नाही. ती सोय आपण आपल्याच गावात करून देऊ. आपण तेव्हा त्या जगात नसू, पण आपल्या पुढच्या पिढ्यांना आपण वाळवंटात ढकलून देणार आहोत का?

जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवणं इतकं अवघड आहे का? नाही. मातीचा नाश होऊ नये, म्हणून जमीन नेहमी आच्छादित असली पाहिजे. हे आच्छादन म्हणजे सिमेंट काँक्रीट किंवा पेव्हर ब्लॉक्सचं नव्हे; तर गवत, पाला पाचोळा, पिकं, झाडं आदींचं नैसर्गिक आच्छादन. या नैसर्गिक आच्छादनामुळे मातीच्या थरात अब्जावधी जिवाणू वाढू लागतात. हेच जिवाणू जमीन जिवंत ठेवण्याचं काम करतात. जमिनीत हवा खेळती ठेवतात. संशोधकांच्या मते एक हेक्टर सुपीक जमिनीत 15 टन जीवाणू असतात. हेच जीवाणू जमिनीचं आरोग्य चांगलं ठेवतात. याच जिवाणूंमुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. अन्नधान्य, फळं, फुलं जोमानं पिकतात. रासायनिक खतांची गरज कमी लागते. जमिनीच्या सर्वात वरच्या सहा इंच थरात केवळ एक टक्के सेंद्रिय कर्ब (ऑरगॅनिक मॅटर) असला तरी ती जमीन उपजाऊ होते. दुर्दैवाने आज आपल्या देशात अनेक ठिकाणी पुरेसा ऑरगॅनिक मॅटर नाही. त्यामुळं प्रति हेक्टरी उत्पादकता घसरली आहे. यात वेळीच सुधारणा केली नाही तर गंभीर स्थिती ओढवेल.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रेंक्लिन रुझवेल्ट असं म्हणाले होते की, “The nation that destroys its soil destroys itself." रुझवेल्ट यांचं हे वाक्य 140 कोटी लोकसंख्येच्या भारतासाठी तर तंतोतंत खरं आहे. कारण आपण जर आपल्या मातीची काळजी घेतली नाही तर या देशातील जमीन 140 कोटी लोकांसाठी रोटी, कपडा और मकान या मूलभूत गरजा कधीच पूर्ण करू शकणार नाही. केवळ अन्नसुरक्षाच धोक्यात येणार नाही. तर आत्ता जसे डिझेल-पेट्रोलसाठी आपण पूर्णतः परावलंबी आहोत, तसे रोजच्या भाकरी- भाजीसाठी हा देश परक्या राष्ट्रांच्या दयेसाठी मोहताज होईल. हे टाळण्यासाठी माती जपली पाहिजे.

मला इतकंच सांगायचं आहे की ज्या धरणीला 'माता' म्हणावं असं आपल्या संस्कृतीनं शिकवलं तिचं आरोग्य टिकवणं, सुधारणं ही आपलीच जबाबदारी आहे. महात्मा गांधी म्हणाले होते Earth provides enough to satisfy every man's needs, but not every man's greed.

माणसाने हाव न धरता धरणी मातेची काळजी करावी. अन्यथा येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत.

टॅग्स :Earthपृथ्वी