शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
5
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
7
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
8
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
9
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
10
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
11
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
12
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
13
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
14
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
16
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
17
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
18
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
20
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले

युगबदलाच्या सांध्यावरल्या सदाबहार कहाणीची ‘पंचविशी’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 6:25 AM

जागतिकीकरणाच्या प्रारंभकाळाचं रोचक चित्रण : ‘दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे’ला आज झाली पंचवीस वर्षं !

मुकेश माचकर - पत्रकार, चित्रपट आस्वादक

कोरोनाकहराने देशभरात लॉकडाऊन लादून चित्रपटगृहं बंद पाडली नसती, तर आजही मुंबईतल्या मराठा मंदिर चित्रपटगृहाच्या पडद्यावर रोज दुपारी राज आणि सिमरन एकमेकांना भेटले असते... ‘जरा सा झूम लूँ मैं’ म्हणून बेधुंद नाचले असते, बायबाय करून निघालेल्या सिमरनला राजने ‘पलट’ अशी मनोमन साद घातली असती आणि तिनेही त्याच्याकडे हमखास वळून पाहिलं असतं... आजही क्लायमॅक्सला बाऊजींच्या हातातून हात सोडवून घेऊ पाहणारी सिमरन आणि ट्रेनने तिच्यापासून कायमचा दूर निघालेला राज यांना पाहिल्यावर प्रेक्षकांच्या काळजाचे ठोके वाढले असते आणि बाऊजींनी सिमरनचा हात सोडून ‘जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी’ असं सांगितल्यानंतर अख्ख्या थिएटरने सुटकेचा आणि आनंदाचा सुस्कारा सोडला असता... शेवटी सुमारे १० मिनिटं जी जड चाकांनी स्टेशनातून निघतेच आहे अशा त्या सुपरस्लो ट्रेनच्या डब्यात अखेर सिमरन चढली असती आणि टाळ्याशिट्यांचा कडकडाट झालाच असता!

लॉकडाऊन आणला नसता तर ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे’ अर्थात डीडीएलजे (सिनेमाच्या नावाचं इंग्रजी आद्याक्षरांचं लघुरूप इतकं लोकप्रिय होण्याचीही ही पहिलीच वेळ होती- कयामत से कयामत तकचं क्यूएसक्यूटी असं लघुरूप करण्यात आलं होतं; पण ते फारसं प्रचलित झालं नाही) या सिनेमाने विश्वविक्रमी रौप्यमहोत्सवी वर्ष साजरं केलं असतं थिएटरमध्ये. आजही सलग २४ वर्षांहून अधिक काळ एका थिएटरमध्ये दुपारच्या मॅटिनी शोच्या स्वरूपात का होईना, सुरू होता, असा हा जगातला एकमेव सिनेमा आहे.

यशराज फिल्म्स हे मोठं बॅनर आहे, विश्वविक्रम करण्यासाठी एका थिएटरचं भाडं भरत राहणं त्यांना सहजशक्य आहे. ज्या सिनेमाने आजच्या हिशोबात सव्वापाचशे कोटी रुपयांचा गल्ला गोळा करून दिला असेल (तेव्हाच्या हिशोबात चार कोटी रुपयांत बनलेल्या या सिनेमाने ५८ कोटी म्हणजे जवळपास १५ पट व्यवसाय केला होता), तो सिनेमा अभिमानबिंदू म्हणून सुरू ठेवणं सहज शक्य आहे चोपडांना; पण या सिनेमाच्या खेळाला रोज ५० टक्क्यांच्या आसपास आणि सुटीच्या दिवशी ८०-९० टक्के प्रेक्षक २४ वर्षं रोज आणून बसवणं, हे चोपडांनाही शक्य नाही; ही त्या सिनेमाची जादू आहे, आणि ती अजूनही ओसरलेली नाही, हे आश्चर्य आहे.

आश्चर्य अशासाठी की आताच्या पिढीला ओव्हर दि टॉप नायक, नव्या पिढीचा असूनही घरच्यांची परवानगी मिळवण्याचा अट्टहास, हे फारसं पटण्यातलं नाही. क्लायमॅक्सची ती ट्रेन निघतेच आहे, निघतेच आहे, हे पाहून आजची मुलं हसतात. भळभळणारी भावुकता त्यांना हास्यास्पद वाटते. तरीही या सिनेमाचा चार्म या पिढीलाही थिएटरात खेचून नेतोच. असं काय आहे या सिनेमात?

डीडीएलजे ही सिनेमातल्या, देशातल्या आणि समाजातल्या युगबदलाच्या सांध्यावरची कहाणी आहे. ‘चला, आता आपण दोन युगांच्या सांध्यावरची कहाणी सांगू या,’ असं ठरवून काही आदित्य चोपडाने हा सिनेमा लिहिला नव्हता. त्या त्या काळाचा उद्गार ठरलेले सिनेमे असे बेतून लिहिता येत नाहीत. त्यांचे कर्ते त्यांना भावलेली, एक कलाकृती तयार करतात, ती लोकांना आवडते आणि तिची तिच्या काळाशी नेमकी काय संगती होती, ते काळाने कूस पालटल्यानंतर कळतं.

डीडीएलजेमध्ये तरुण आदित्यने लिहिलेली राज आणि सिमरन या एनआरआय तरुणांची टवटवीत प्रेमकहाणी होती. ती आधीच्या प्रेमकथांपेक्षा काही बाबतीत फारच वेगळी होती. तोपर्यंत अनिवासी भारतीयांचं चित्रण हे ‘ना धड इकडचे, ना धड तिकडचे, पैशांसाठी देश सोडलेले’ लालची लोक, असं एकांगी केलं जात होतं. मनोजकुमारी देशभक्तीपर सिनेमांनी ‘जग नागडधुय्या करत फिरत होतं, त्याला चड्डी घालायला भारताने शिकवलं’ अशी अतिरेकी अस्मितागोंजारू, आत्मगौरवपर मांडणी केली होती. कसलीही मूल्यं, संस्कार, बुद्धी, सखोलता नसलेल्या पाश्चिमात्यांनी जगात आघाडी का घेतली आहे आणि जगद्गुरु भारतातले बुद्धिमान लोक पाश्चिमात्य नरकाकडे आनंदाने का धाव घेतायत, हे काही या सिनेमांमधून कळायचं नाही. तसा प्रश्नही कुणाला पडायचा नाही म्हणा! डीडीएलजेने अनिवासी भारतीयांना पहिल्यांना सकारात्मक पद्धतीने चित्रित केलं (या सिनेमाने ओव्हरसीज मार्केट नावाचा प्रकार खºया अर्थाने खुला केला आणि नंतर भारतीय प्रेक्षकांचा विचारही न करता एनआरआयना गोंजारणारे सिनेमे बनवले गेले, हा योगायोग नव्हे).

नव्वदच्या दशकात एकीकडे मक्तेदारी आणि सरकारी नियंत्रणामुळे कुंठित असलेली अर्थव्यवस्था खासगीकरण आणि उदारीकरणातून मोकळा श्वास घेऊ लागली होती, टेलिव्हिजनवर सुरू झालेल्या खासगी चॅनलांच्या माध्यमातून करमणुकीचं विश्व खुलं होत होतं, भारतीय आयटी उद्योगाला धुमारे फुटत होते, या मोकळ्या वातावरणात वाढत असलेल्या तरुणाईला आपली ओळख, आपलं भारतीयत्व कशात आहे, असा प्रश्न पडत होता. त्याचं नकळत (फिल्मी) उत्तर डीडीएलजेने देऊन टाकलं. इथे परदेशात राहणारी, आधुनिक सिमरन आईवडिलांनी ठरवलेल्या मुलाशी लग्न करायला तयार होत होती. कॉलेजात नापास झालेला आणि आजकाल ‘मीटू’चा खटला ओढवून घेईल अशा (क्यूट वाटल्या तरी) मेल शॉव्हनिस्ट पद्धतींनी मुलीची छेड काढणारा अनिवासी नायक ‘लग्न करायचं ते तुझ्या आईवडिलांच्या संमतीनेच’ असा आश्चर्यकारक संस्कारशील आग्रह धरत होता. इथे मुलीला आवडलेल्या मुलाबरोबर पळून जायला सांगणारी आई होती, मुलाचं नापास होणं सेलिब्रेट करणारा बाप होता, स्वयंपाकघरात वावरणारा- प्रेयसीसाठी करवा चौथचं व्रत करणारा आणि तरीही मर्दानगीत कमी नसलेला नायक होता. हे सगळं ताजं होतं, नवं होतं. परदेशांत, राहूनही भारतीय संस्कार न विसरलेले लोक अशी अनिवासी भारतीयांची समतोल प्रतिमा तयार करणाऱ्या या सिनेमाने त्यांना आणि त्यांच्यासारखं बनण्याची आस असलेल्या तरुणाईला जत्रेतला जादुई आरसा दाखवला!

बदलत्या अर्थव्यवस्थेत नवा श्वास घेणाऱ्या भारताची नवी ओळख पडद्यावर अजरामर करणारा हा सिनेमा आहे ! जागतिकीकरणाने दिलेल्या मध्यमवर्गीयांच्या बदलत्या आकांक्षांचं आणि जगभ्रमणाची स्वप्नं वास्तवात उतरतानाच्या प्रारंभकाळाचं चित्रण करणारा सिनेमा!ङ्घकोरोनाकाळ उलटल्यावर मराठा मंदिरच्या पडद्यावर पुन्हा राज आणि सिमरन भेटायला लागतील, तेव्हा २५ वर्षांपूर्वीच्या प्रेक्षकांमधल्या ‘राज आणि सिमरन’च्या मुलांची तरुण पिढी पुन्हा एकदा ‘तुझे देखा तो ये जाना सनम’च्या सुरांवर लहरायला तयार होईल.ङ्घकारण, अजूनही हे आकांक्षाचित्र बदललेलं नाही. ते बदलत नाही, तोवर हा सिनेमा शिळा होणार नाही.

टॅग्स :cinemaसिनेमाbollywoodबॉलिवूडShahrukh Khanशाहरुख खानKajolकाजोल