शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

 आजच अग्रलेख : वेड आणि प्रेम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 7:13 AM

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वामध्ये चेन्नई सुपरकिंग्जने विक्रमी पाचव्यांदा जेतेपद पटकावताना मुंबई इंडियन्सच्या कामगिरीशी बरोबरी केली.

आयपीएल २०२३चा थरार अखेर सोमवारी पार पडला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वामध्ये चेन्नई सुपरकिंग्जने विक्रमी पाचव्यांदा जेतेपद पटकावताना मुंबई इंडियन्सच्या कामगिरीशी बरोबरी केली. यंदाची आयपीएल अत्यंत वेगळी ठरली ती एका व्यक्तीमुळे. ती व्यक्ती म्हणजे महेंद्रसिंग धोनी. यंदाच्या सत्राला सुरुवात होण्याआधीच धोनीचे हे अखेरचे सत्र ठरणार, अशा चर्चा सर्वत्र रंगल्या होत्या. आयपीएल म्हणजे चौकार-षटकारांचा पाऊस, आयपीएल म्हणजे ग्लॅमर, आयपीएल म्हणजे नवोदित खेळाडूंसाठी मिळालेली मोठी संधी.

पण यंदा आयपीएल म्हणजे महेंद्रसिंग धोनी, असे समीकरण झाले होते. दहा संघ एका चषकासाठी ७० साखळी सामन्यांमध्ये भिडले. यानंतर प्ले ऑफमधील चार सामन्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. दुसरा क्वालिफायर सामना आणि अंतिम सामना गाजवला तो पावसाने. आयपीएलच्या १६ सत्रांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अंतिम सामना राखीव दिवशी खेळला गेला. पाऊस कितीही पडला, तरी सामना खेळवायचाच हे बीसीसीआयचे धोरण पुन्हा दिसून आले. यामागे असलेले हजारो, कोट्यवधी रुपयांचे गणितही समोर आले. अगदी ५-५ षटकांचा सामना का होईना, पण सामना खेळवायचा, हे बीसीसीआयने अखेरपर्यंत निश्चित केले होते. त्यामुळेच दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पावसामुळे उशीर झाल्यानंतरही सामना उशिराने का होईना, पण खेळवला गेला आणि तोही पूर्ण षटके खेळवला.

अंतिम सामना रविवारी होणार होता, पण यावेळी पावसापुढे बीसीसीआयचे काही चालले नाही आणि नाईलाजाने सामना एक दिवस पुढे खेळविण्यात आला. यादरम्यान, धोनीचा भारतीय क्रिकेटवर किती मोठा प्रभाव आहे हे दिसून आले. सामना स्थगित केल्यानंतरही बाहेरुन आलेल्या चाहत्यांनी अहमदाबाद सोडले नाही आणि एक संपूर्ण रात्र अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर काढली. स्टेशन परिसरात सीएसकेची जर्सी परिधान केलेले शेकडो ‘धोनी’ दिसले. बाहेरुन आलेल्या जवळपास सर्व चाहत्यांनी सोमवारचे ट्रेन तिकीट रद्द करुन मंगळवारचे बुक केले, का? तर धोनीला खेळताना पाहायचे होते. धोनीची ही क्रेझ काही नवी नाही, पण या धोनीप्रेमींचे वेड चक्रावून टाकणारे होते.

दुसरीकडे, आयपीएलने सोशल मीडिया व्यापून टाकले होते. येथे प्रत्येक संघाच्या पाठिराख्यांमध्ये रंगलेली चढाओढ पाहण्यासारखी होती. प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीचे विश्लेषण एका फोटोद्वारे करताना नेटिझन्सची भन्नाट कल्पकता दिसून आली. अनेक मीम्स तयार करुन खेळाडू आणि संघांची टेरही खेचण्यात आली. यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वांत गाजावाजा झाला तो विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील भांडणाचा. या दोन्ही दिग्गज खेळाडूंनी एखाद्या शाळकरी मुलांप्रमाणे भर मैदानात जो काही वाद घातला, त्याने भारतीय क्रिकेटचे लक्ष वेधले गेले. सोशल मीडियावरही याचे पडसाद उमटले. खेळाडूंच्या वादाप्रमाणेच खेळाडूंच्या दुखापतींमुळेही यंदाची आयपीएल चर्चेत राहिली. लोकेश राहुल, जोफ्रा आर्चर, केन विलियम्सन, बेन स्टोक्स, मार्क वूड असे कितीतरी आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेले खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धा अर्धवट सोडून माघारी परतले.

पण, शो मस्ट गो ऑन म्हणत प्रत्येक संघाने आगेकूच करणे कायम ठेवले. यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, शुभमन गिल, तिलक वर्मा, आकाश मढवाल, जितेश शर्मा अशा युवा क्रिकेटपटूंनी मिळालेली संधी साधताना छाप पाडलीच, पण त्याचवेळी मोहम्मद शमी, मोहित शर्मा, विराट कोहली, पीयूष चावला, युझवेंद्र चहल या अनुभवी खेळाडूंनीही आपला स्तर दाखवून दिला. यंदाच्या आयपीएलची चर्चा किंवा क्रेझ काहीशी वेगळी आणि जास्त जाणवली. याचे कारण म्हणजे, कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच आधुनिक क्रिकेटचा हा उत्सव आपल्या पारंपरिक रुपात पार पडला.

होम आणि अवे या पद्धतीने झालेल्या सामन्यांमुळे प्रत्येक दहा संघांच्या शहरांमध्ये, राज्यांमध्ये आयपीएलचे वातावरण निर्माण झाले होते. या सर्व उत्साहामध्ये भाव खाऊन गेला तो महेंद्रसिंग धोनी. स्पर्धेदरम्यान सीएसकेच्या प्रत्येक सामन्यादरम्यान स्टेडियम पिवळ्या जर्सीने भरुन गेल्याचे दिसून आले. मग तो सामना चेन्नईत असो किंवा चेन्नईबाहेर, धोनीचे चाहते प्रत्येक स्टेडियमवर मोठ्या संख्येने दिसून आले. आयपीएलमध्ये खेळाडू मालामाल होतात, कोट्यवधींचा वर्षांव होतो, हे सर्व ठीक आहे. पण कोट्यवधी लोकांच्या प्रेमाचा वर्षाव स्वीकारणारा धोनी एकमेव ठरला. हेच यंदाच्या आयपीएलचे विशेष ठरले.

टॅग्स :IPLआयपीएल २०२३Chennai Super Kingsचेन्नई सुपर किंग्सMS Dhoniमहेंद्रसिंग धोनी