शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
3
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
4
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!
5
चर्चा तर होणारच! भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले अन् देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो समोर आले!
6
नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत ट्विस्ट: अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने चर्चांना उधाण
7
कुडाळात महायुती, उद्धवसेनेचे कार्यकर्ते भिडले, तणावाचे वातावरण; पोलिस बंदोबस्त वाढविला
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'फडणवीसांनीच आरोप केले, त्यांनीच फाईल दाखविली'; सुप्रिया सुळे म्हणाल्या, आर. आर. पाटलांच्या कुटुंबाची माफी मागितली...
9
चीनच्या सैन्याची माघार, आता दिवाळीत तोंड गोड करणार; लष्कराने सीमेवरती स्थिती सांगितली
10
KL राहुलनं नाकारली LSG नं दिलेली ऑफर? हे कारण देत सोडलीये संघाची साथ
11
निवडणुकीपूर्वीच राज ठाकरेंना धक्का; मनसे उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद, कारण...
12
दौरे ठरले! मल्लिकार्जून खर्गे अन् राहुल गांधी महाराष्ट्रात येणार; नागपूर, मुंबईत सभा होणार
13
भाजपचा विरोध, पण दादांनी..."; नवाब मलिकांनी सांगितलं काय घडलं राजकारण
14
भुजबळांच्या 'त्या' विधानावर राज ठाकरेंचा खोचक सल्ला, म्हणाले- "त्यांनी एक पक्ष काढावा आमचा...!"
15
'मैंने प्यार किया'ची सुमन वयाची पन्नाशी उलटली तरी आताही दिसते तितकीच ग्लॅमरस, पाहा फोटो
16
"महाराष्ट्राच्या प्रगतीचा भाजपा आणि महायुतीचा दावा फसवा आणि खोटा’’, नाना पटोले यांची टीका  
17
भाजपाचा प्रचारसभांचा धडाका! PM मोदी ८, अमित शाह २० सभा घेणार; योगी आदित्यनाथांच्या किती?
18
“मनसे सत्तेत येईल, आमच्या पाठिंब्यावर भाजपाचा मुख्यमंत्री होईल”; राज ठाकरेंचे स्पष्ट संकेत
19
रितेश देशमुखचा अमित व धीरज यांना पाठिंबा, विधानसभा निवडणुकीसाठी दिल्या खास शुभेच्छा!
20
मागच्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणात झालेल्या चिखलाला जबाबदार कोण? राज ठाकरेंनी दोन शब्दात दिलं उत्तर

आजचा अग्रलेख: शिवसेनेतील बंडाळी, पेल्यातील वादळ ठरणार की सत्तापालट होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 10:18 AM

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आल्याचे चित्र आहे. बंडखोर आमदारांची समजूत काढण्यात ठाकरे यांना यश आले तर हे बंड ‘पेल्यातील वादळ’ ठरेल, नाहीतर राज्यातील सरकारच बदलून टाकेल.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने महाराष्ट्राची वाटचाल राजकीय अस्थिरतेकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे, गणेश नाईक यांच्यानंतर शिवसेनेतील हे आणखी एक मोठे बंड आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत पक्षातील निम्याहून अधिक आमदार असल्याचा दावा केला जात असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आल्याचे चित्र आहे. बंडखोर आमदारांची समजूत काढण्यात ठाकरे यांना यश आले तर हे बंड ‘पेल्यातील वादळ’ ठरेल, नाहीतर राज्यातील सरकारच बदलून टाकेल.

राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीतही भाजपने बाजी मारल्याने महाविकास आघाडीतील सारे काही आलबेल नाही हे स्पष्ट झाले. यानंतर सकाळी-सकाळीच एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाल्याचे वृत्त धडकले अन‌् या राजकीय अस्थिरतेचे वादळ महाराष्ट्रावर घोंघावू लागले आहे. आघाडीतील धुसफूस वेळीच शमवता आली असती तर ही वेळ आली नसती. विजयाचे श्रेय घेण्यासाठी अनेक जण पुढे येतात. मात्र, पराभवाला काेणी धनी नसताे, असे म्हटले जाते. महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीचे असेच झाले आहे. पंधरा दिवसांत सलग दाेन पराभव पचवावे लागले. त्याची जबाबदारी काेणी घ्यायला तयार नाही आणि काेणी समजूनही सांगायला तयार नाही. परिणामी महाआघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये धुसफूस सुरू आहे.

वास्तविक महाराष्ट्रात १९९५ पासून युती किंवा आघाडीच्या सरकारची परंपरा सुरू झाली आहे. त्यापूर्वीच १९९० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये युती झाली. ती तीन दशके चालली. २०१९ मध्येही युती करूनच विधानसभेच्या निवडणुका लढविण्यात आल्या. हिंदुत्व हा आमचा समान धागा आहे, अशी या पक्षांची कायम भूमिका हाेती. मात्र, विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. भाजप १०५ जागा जिंकून प्रथम क्रमांकावर उभा राहिला. शिवसेना केवळ ५५ जागा जिंकत दुसऱ्या क्रमांकावर राहिली. तरीही मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेने आग्रह धरला आणि युती तुटून महाआघाडी तयार झाली. तेव्हापासून भाजप प्रचंड अस्वस्थ आहे. काेणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीमध्ये फूट पाडून फुटीर गटासाेबत सत्तेवर येण्याचे प्रयत्न भाजपने केले. काेविड संसर्गाच्या काळातदेखील या राजकारणाचा वणवा पेटला हाेता. याचाच भाग म्हणून केंद्रात सत्तेवर असलेल्या संधीचा लाभ घेत विविध केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला नामाेहरम करण्यात आले. सध्यादेखील महाआघाडी सरकारमधील दाेन मंत्री तुरुंगात आहेत. यातून भीतीचे वातावरण तयार करण्याची एकही संधी भाजपने साेडली नाही. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला फाेडाफाेडी करण्याची संधी चालून आली आणि ती या पक्षाने वापरली. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी काेविडची परिस्थिती मात्र उत्तम हाताळली.

केंद्रातील भाजपला महाराष्ट्र हवा आहे. दक्षिणेत कर्नाटक वगळता भाजपचा विस्तार हाेत नाही. पूर्वेकडील राज्यात आसाम वगळता इतर राज्यांत स्थानिक पक्ष मजबूत आहेत. उत्तरेत विस्ताराची सीमांत रेषा भाजपने गाठली आहे. कमी-अधिक फटका उत्तरेत बसला तर महाराष्ट्राची मदत हवी. शिवाय महाराष्ट्राची आर्थिक ताकद मजबूत आहे. या सर्व संघर्षातून जात असताना तीन पक्षांचा संगम नीट झाला नाही. परिणामी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण उभारले. त्यांच्याबराेबर असलेल्या आमदारांच्या संख्येबाबत उलटसुलट दावे हाेत आहेत. आर्थिकदृष्ट्या देशातील एक नंबरचे राज्य आणि राजकीयदृष्ट्या दुसऱ्या क्रमांकावरच्या राज्यातील या गडबडीने सर्वच राजकीय पक्षांत खळबळ उडाली नसेल तरच नवल!

राष्ट्रपतीपदाची निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. त्यानंतर उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक हाेणार आहे. अग्निपथ याेजनेमुळे युवकांमध्ये असंताेष पसरलेला आहे. भाजपमध्ये एकमुखी नेतृत्व असले तरी सर्व काही सुरळीत आहे, असा त्याचा अर्थ नाही. विधानसभेतील शिवसेनेच्या गटनेतेपदावरून शिंदे यांना काढून टाकण्यात आले आहे. मात्र, महाविकास आघाडीला समर्थन टिकविणे कठीण जाणार आहे. एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती तोडा आणि भाजपशी युती करून सरकार बनवा,  अशी मागणी केली आहे.  यामागे भाजपच असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री यावर काय निर्णय घेतात यावर सरकारचे भवितव्य अवलंबून आहे.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्र