शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 06:06 IST

स्मार्ट मीटर बसविण्याकरिता आम्ही ग्राहकांकडून रक्कम घेणार नाही, असा दावा महावितरण करत आहे. मात्र, हे मीटर बसविण्याकरिता येणाऱ्या १२ हजार कोटी रुपये खर्चापैकी ३० टक्के रकमेचा बोजा ग्राहकांवर पडणार ही काळ्या दगडावरील रेष आहे.

मागील केंद्र सरकारमध्ये ऊर्जा खात्याचा कार्यभार सांभाळणारे राज कुमार सिंह यांच्या डोक्यात देशभरात स्मार्ट प्रीपेड वीज मीटर बसविण्याची सुपीक कल्पना जन्माला आली होती. नोकरशहा राहिलेल्या या सिंह यांना जनतेने लोकसभा निवडणुकीत धोबीपछाड दिल्याने त्यांचे मंत्रिपदाचे ‘मीटर’ फिरणे  बंद झाले आहे. देशातील जनता किती ‘स्मार्ट’ आहे, याचा साक्षात्कार आता कदाचित आत्मचिंतन करताना त्यांना होईल, अशी अपेक्षा! दिल्लीत बसायचे आणि अरुणाचल प्रदेशपासून कर्नाटकपर्यंत आणि पंजाबपासून ओडिशापर्यंत एकच धोरण अंमलात आणण्याचा सरधोपट निर्णय रेटायचा याचे विपरित परिणाम होऊ शकतात. मुंबईतील कुलाबा किंवा दादर आणि शेजारील पालघर जिल्ह्यातील जव्हार किंवा विक्रमगडमध्ये विजेचा पुरवठा, वापर, बिल वसुली यात जमीन-अस्मानाची तफावत आहे. मग, अरुणाचल प्रदेशला लागणारा न्याय कर्नाटकात लावून कसे चालेल? एखादा मोबाइल ग्राहक व्होडाफोन किंवा एअरटेलचे नेटवर्क वापरत असेल आणि अगोदर नेटवर्क वापरून मग पैसे भरणारा (पोस्टपेड) ग्राहक असेल तर अगोदर पैसे भरून नेटवर्क वापरणारा (प्रीपेड) ग्राहक होण्याचा निर्णय तो स्वत: घेऊ शकतो की ज्या कंपनीचे नेटवर्क तो वापरतो ती कंपनी त्याला प्रीपेड ग्राहक होण्याकरिता सक्ती करू शकते? या प्रश्नाचे उत्तर जसे कंपनी सक्ती करू शकत नाही हे आहे तसेच ते विजेच्या स्मार्ट मीटरबाबत आहे.

लोकसभा निवडणुकीत कांद्यापासून महागाईपर्यंत अनेक समस्यांनी महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांना दणका दिल्याने आता ताकदेखील फुंकून पिण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळेच स्मार्ट मीटरच्या सक्तीचा निर्णय तूर्त मागे घेतला गेला  आहे. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर हा निर्णय अंमलात आणावाच लागेल. वीज वितरण व्यवस्था सुधारण्याकरिता केंद्र सरकारच्या रिन्युव्हल एनर्जी कॉर्पोरेशन व पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. ज्या वीज वितरण कंपन्या या दोन कॉर्पोरेशनकडून निधी घेतात त्यांनी त्यांच्या वीज ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर बसविणे अनिवार्य करणे बंधनकारक आहे. महाराष्ट्रात महावितरण व मुंबईत बेस्ट उपक्रम यांनी केंद्रीय कॉर्पोरेशनकडून कर्ज घेतल्याने त्यांच्या दोन कोटी ४१ लाखांहून अधिक ग्राहकांना स्मार्ट मीटरची सक्ती केली आहे. साहजिकच देश पातळीवर घेतलेला निर्णय महाराष्ट्रात पूर्णपणे रद्द केला, असे होऊ शकत नाही. टाटा व अदानी कंपनीने असा निधी घेतलेला नसल्याने त्यांच्या ४० लाख ग्राहकांवर स्मार्ट प्रीपेड मीटरचे बंधन नाही. म्हणजे एकाच राज्यात वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळा न्याय लावला जाणार आहे. स्मार्ट मीटर बसविण्याकरिता आम्ही ग्राहकांकडून रक्कम घेणार नाही, असा दावा महावितरण करत आहे. मात्र, हे मीटर बसविण्याकरिता येणाऱ्या १२ हजार कोटी रुपये खर्चापैकी ३० टक्के रकमेचा बोजा ग्राहकांवर पडणार ही काळ्या दगडावरील रेष आहे. हे  मीटर बसविण्यामुळे विजेच्या दरात वाढ होणार! साहजिकच नियामक आयोगाच्या मंजुरीखेरीज दरवाढ लागू करता येणार नाही हेही उघड आहे.

कोट्यवधी ग्राहकांकरिता हे  मीटर्स  एकाचवेळी बसणे गरजेचे आहे. अन्यथा एकाच शहरातील काही ग्राहकांकरिता  प्रीपेड स्मार्ट मीटर बसवले  व काही ग्राहकांकरिता बसवले गेले नाहीत तर कदाचित एकाच शहरात एकाच विभागातील दोन ग्राहकांकडून काही काळ का होईना असमान दर वसुली केल्यासारखे होईल. हे  मीटर प्रीपेड असल्याने आपले किती पैसे शिल्लक आहेत हे ग्राहकाला कळू शकते, असा युक्तिवाद कंपन्या करत आहेत. अनेक शहरांमध्ये घर एकाच्या मालकीचे व राहतो दुसराच असे असते. प्रीपेड मीटरमधील शिल्लक रकमेचे संदेश हे मीटर ज्याच्या नावावर आहे त्याला जातील. त्याने तत्परतेने ते भाडेकरूला कळवले तर ठीक. अन्यथा बॅलन्स संपून अंधारात बसायची वेळ वीज ग्राहकांवर येऊन असंतोष वाढण्याची भीती आहे. ज्या शहरांत वीजपुरवठा अखंडित आहे तेथे मीटरमधील बॅलन्स संपत आला तर टॉप अप करता येईल. मात्र, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अनेक तास वीज नसते. वीज नसेल तर इंटरनेट चालणार नाही. अशावेळी टॉप अप करण्याकरिता काही कि. मी. अंतरावरील महावितरणच्या कार्यालयात जावे लागेल. जोपर्यंत तेथे जाऊन बॅलन्स भरत नाही तोपर्यंत वीजपुरवठा खंडित होईल. विधानसभेकरिता टाळलेला निर्णय ही स्मार्ट खेळी असली, तरी भविष्यात हा निर्णय बोकांडी बसेलच.

टॅग्स :electricityवीजMaharashtraमहाराष्ट्र