शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

आजचा अग्रलेख: विजयाचा गुलाल, शिंदेंनी संधी साधली, निवडणुकीत फायदा होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 9:05 AM

Maratha Reservation: मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या मान्य करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही लढाई वेळीच जिंकली. त्याचप्रमाणे आरक्षणाच्या मागणीवर भावना तीव्र असलेल्या लक्षावधी मराठा तरुणांना दिलासा व विश्वास देण्यात खुद्द जरांगे यांनाही  मोठे यश लाभले.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकरिता जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीतून लक्षावधी मराठा बांधवांना घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेल्या मनोज जरांगे-पाटील यांच्या वादळाला मुंबईत दाखल होण्यापूर्वी नवी मुंबई या मुंबईच्या वेशीपाशी रोखायचे व हे आंदोलन अधिक तीव्र होण्यापूर्वीच त्यामधील वाफ काढून टाकायची हे राज्य सरकारपुढे फार मोठे आव्हान होते. मात्र, मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या मान्य करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही लढाई वेळीच जिंकली. त्याचप्रमाणे आरक्षणाच्या मागणीवर भावना तीव्र असलेल्या लक्षावधी मराठा तरुणांना दिलासा व विश्वास देण्यात खुद्द जरांगे यांनाही  मोठे यश लाभले. मराठा समाजातील तरुणांना शिक्षण व सरकारी नोकरीमध्ये आरक्षण मिळण्यासाठी त्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे यांनी केली होती. त्यानुसार महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात मराठा समाजाचे सर्वेक्षण सुरू झाले. असे असले तरी सर्वच मराठा बांधवांकडे जुनी कागदपत्रे उपलब्ध नसल्यामुळे अनेकांना आरक्षणाचा लाभ मिळण्यामध्ये अडचणी दिसत असल्याने जरांगे यांनी एखाद्या कुटुंबाकडे जर पुरावे असतील तर त्यांच्या सग्यासोयऱ्यांनासुद्धा प्रमाणपत्र देण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य करणारा अधिसूचनेचा मसुदा सरकारने जारी केला. त्यामुळे जरांगे यांनी अधिक ताणून न धरता आपले आंदोलन मागे घेतले.

कुणबी नोंद मिळालेल्या कुटुंबातील रक्ताच्या नात्यांमधील म्हणजे काका, पुतणे, भावकीतील नातेवाईक यांना या निर्णयाचा लाभ होईल. अर्थात त्यांना रक्ताच्या नातेसंबंधातील असल्याचा पुरावा दिल्यानंतरच हे जात प्रमाणपत्र मिळणार आहे. आरक्षणाचा हा लाभ पितृसत्ताक पद्धतीने दिला जाणार असल्याने कुटुंबातील आईच्याकडील नातेवाईक मावशी, मामा, भाचे वगैरे यांना मात्र हा लाभ मिळणार नाही. जरांगे यांच्या या मागणीसोबत आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची एक प्रमुख मागणी होती. या मागणीबाबतही सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, आंदोलकांवरील किरकोळ गुन्हे मागे घेण्याची तयारी दाखवली आहे. अर्थात ज्यांनी काही नेत्यांची, लोकप्रतिनिधींची घरे जाळली किंवा हिंसाचार केला अथवा पोलिसांवर हल्ला केला, अशांचे गुन्हे लागलीच मागे घेतले जाणार नाहीत. कारण, न्यायालयाने त्याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत.

जरांगे यांच्या या आंदोलनात मध्यस्थी केल्याचा मोठा राजकीय लाभ हा एकनाथ शिंदे यांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेना पक्षातून ४० पेक्षा जास्त आमदार घेऊन शिंदे बाहेर पडले. त्यांनी भाजपबरोबर सरकार स्थापन केले व मुख्यमंत्रिपद मिळवले. तरीही  सर्वसामान्य शिवसैनिक आणि शिवसेनेचा पारंपरिक मतदार शिंदे यांचा स्वीकार करणार का, याबाबत साशंकता होती. शिंदे यांच्यासमोर स्वतःची व्होट बँक निर्माण करण्याचे मोठे आव्हान होते. जरांगे यांच्या आंदोलनात ती संधी शिंदे यांनी अचूक हेरली व मराठा समाजाला दिलासा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांचा महायुतीमध्ये समावेश झाल्यानंतर शिंदे यांच्यासाठी आपला राजकीय पाया मजबूत करणे ही अधिकच मोठी गरज होती. ती संधी यानिमित्त शिंदे यांनी साधली.

राज्य मंत्रिमंडळातील एक मंत्री आणि ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी त्यांच्याच राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाबाबत मतभिन्नता व्यक्त केली. त्यांचे असे म्हणणे आहे की, सरकारने जारी केले ते  अधिसूचनेचे प्रारूप आहे. यावर हरकती व सूचना मागवून त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. शिवाय सग्यासोयऱ्यांना आरक्षण देण्याची ही नवी व्याख्या कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही. मराठा समाजाचा ओबीसींमध्ये समावेश करून आरक्षण देण्याच्या मागणीविरोधातही भुजबळ यांनी शड्डू ठोकले आहेत. केवळ शक्तिप्रदर्शनाच्या बळावर आरक्षणाची मागणी मंजूर करण्यासही भुजबळ यांचा विरोध आहे. कायदेतज्ज्ञांचे मत आहे की, आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून कुठल्याही समाजाला जर आरक्षण द्यायचे झाले, तर त्यासाठी एक तर सर्वोच्च न्यायालयाच्या ११ न्यायमूर्तींच्या खंडपीठाला या संपूर्ण प्रकरणात निर्णय द्यावा लागेल अथवा केंद्र सरकारला हस्तक्षेप करावा लागेल. ही प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची व किचकट आहे. मात्र, आता निवडणुका समोर दिसत असताना आरक्षणासारखा नाजूक विषय सोडविण्यात सरकारला तात्पुरते का होईना जे यश आले त्याकडे ‘प्याला अर्धा भरलेला आहे’ या दृष्टीने पाहून गुलाल उधळण्यातच साऱ्यांचे समाधान आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणEknath Shindeएकनाथ शिंदेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील