शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
5
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
6
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
7
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
8
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
9
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
10
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
11
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
12
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
13
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
15
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
17
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
18
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
19
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
20
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी

फुटकं मडकं भिकारी महाराजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 3:55 AM

- कॅप्टन आनंद जयराम बोडसस्थूल देहाचा, लोभस लाल रंगाच्या लांब कोटातला, आदरातिथ्य दाखवण्यासाठी थोडा झुकलेला, राजस स्मित करणारा मोठाल्या मिशांचा ‘महाराजा’ हे एअर इंडियाचे बोधचिन्ह बरेच प्रसिद्ध होते. त्या महाराजाच्या लाल कोटावर सोन्याच्या जरीची बेलबुट्टी व डोईवरील फेट्यात चमचमणारा तुरा व गळ्यात टपोऱ्या मोत्याची माळ असायची. हे असे त्या महाराजाचे ...

- कॅप्टन आनंद जयराम बोडसस्थूल देहाचा, लोभस लाल रंगाच्या लांब कोटातला, आदरातिथ्य दाखवण्यासाठी थोडा झुकलेला, राजस स्मित करणारा मोठाल्या मिशांचा ‘महाराजा’ हे एअर इंडियाचे बोधचिन्ह बरेच प्रसिद्ध होते. त्या महाराजाच्या लाल कोटावर सोन्याच्या जरीची बेलबुट्टी व डोईवरील फेट्यात चमचमणारा तुरा व गळ्यात टपोऱ्या मोत्याची माळ असायची. हे असे त्या महाराजाचे दुरून दिसणारे रूपडे फसवे आहे हे फारच थोड्या लोकांना माहीत होते. त्या महाराजाची म्हणजेच एअर इंडियाची एकाधिकार पद्धतीने देखभाल व्यवस्थापन करणाºया स्वार्थी चोरांनी सोन्याची जरीतार स्वत:च्या घशात घालून तेथे कवडीमोलाची प्लास्टिक जरीची वेलबुट्टी चिकटवली व चमचमणारा तुरा काढून तेथे कोंबडीचे पीस खोचले, ही वस्तुस्थिती आहे.एअर इंडिया या केंद्र सरकारच्या मालकीच्या हवाई वाहतूक कंपनीची व्यवस्था ज्याच्या हाती एकाधिकार पद्धतीने देण्यात आली त्या माणसाने व त्याच्या पाळीव होयबांनी एअर इंडियाच्या महाराजाला नागवला. लाल कोटाच्या आत तो महाराजा नागवा झालेला होता. त्याच्या लाल कोटाचे कापडसुद्धा विरले होते. फाटायला लागले होते. एअर इंडिया म्हणजे रत्ने, माणके भरलेला सुवर्णकलश आहे, असा समज एअर इंडियाच्या जाहिरातून व वृत्तपत्रातील बातम्यांतून पसरवण्यात आला होता. १९७० आधीच्या काळात मोठ्या वृत्तपत्रांचे विमानतळावरील विशेष वार्ताहर एअर इंडियाने दिलेल्या प्रेसरूममध्ये झोपा काढायचे. सहा महिन्यांतून एकदा एखाद्या पंचतारांकित हॉटेलमधील जेवण किंवा वर्ष-दोन वर्षांतून एकदा चकटफू मिळणारी परदेशवारी एवढ्या मोबदल्यात इंडियन एअरलाइन्स व एअर इंडियाकडून आठ-दहा दिवसांनी येणाºया ‘फॉर रिलिज’ असे छापलेल्या पाकिटातील मजकुराची शहानिशा न करता वृत्तपत्रातील ‘आमच्या विशेष प्रतिनिधीकडून’ अशी बातमी प्रसिद्ध करायचे काम केले जायचे.एअर इंडिया व इंडियन एअरलाइन्स या दोन कंपन्यांचा जन्मच १९५२ च्या सुमारास स्वार्थी राजकारणी व केंद्र सरकारातील एकमेव उच्चपदस्थ व आचारविचारांनी फ्रेंच असलेल्या ऐशोआरामात वाढलेल्या एका विशिष्ट अभारतीय जमातीच्या माणसाच्या अभद्र संगनमताने झालेला होता. १९५२ अगोदर आपल्या देशात १६-१७ प्रांतीय एअरलाइन्स उत्तम हवाई सेवा पुरवत होत्या. त्यात एका महाराष्टÑीय कोकणस्थाचीसुद्धा एअरलाइन होती. तशीच त्या सोळा एअरलाइन्समध्ये एक ‘टाटा एअरलाइन्स’ ही जेआरडी टाटांची एअरलाइन्स होती. हुकूमशहा पद्धतीने वागणारे नेहरू व जेआरडी यांच्या संगनमताने उल्लेखित १६-१७ एअरलाइन्स राष्टÑीयीकरण करून म्हणजे इतरांच्या डोक्यात वरवंटा घालून एअर इंडिया व इंडियन एअरलाइन्स (कॉर्पाेरेशन) जन्माला घातली गेली.टाटा एअरलाइन्स वगळता उरलेल्या बाकी एअरलाइन्सचे मालक-चालक व्यवसाय राष्टÑीयीकरणाच्या वादळात वाºयावर उडाले. टाटा एअरलाइन्सचे जेआरडी, एअर इंडिया व इंडियन एअरलाइन्स या दोन्ही कंपन्यांच्या स्थापनेपासून त्यांचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक झाले. त्याहून मोठा विदारक भ्रष्ट विनोद म्हणजे त्या सरकारी मालकीच्या कंपन्यांचा ताबा पुढील २५ वर्षे एकहाती पद्धतीने जेआरडींच्या हाती राहिला. स्थापनेपासून जेआरडी या सर्वगुणसंपन्न यशस्वी उद्योगपतीकडे व्यवस्थापनाची सूत्रे असूनही त्या दोन्ही कंपन्या कायम तोट्यातच होत्या. तोटा केंद्र सरकार भरून काढत होते.जेआरडी हे स्वत: अतिश्रीेमंत घराण्यातील उद्योगपती असूनसुद्धा एअर इंडिया व इंडियन एअरलाइन्स या दोन कंपन्यांमार्फत मुख्य व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांना एक-दोन नव्हे तर तीन मर्सिडीज बेन्झ गाड्या सर्व खर्चासहित देण्यात आल्या होत्या. एअर इंडियाच्या अधिकाºयाचे रोजचे भोजन जेआरडींच्या ताजमहाल हॉटेलातून विकत आणले जायचे. जेआरडींचा एक पारसीआप्त एअर इंडियाचा ब्रिटनमधील व्यवस्थापकम्हणून सतत १२ ते १३ वर्षे लंडनमध्ये एअर इंडियाच्या खर्चाने राहत होता. वर्षातून आठ-दहा दिवस तो भारतात यायचा. तरीसुद्धा गेट वे आॅफ इंडियासमोरच्या बॉम्बे रॉयल यॅट क्लबच्या निवासी खोल्यांतील एक महागडी खोली दैनंदिन भाड्यावर एअर इंडियाने वर्षानुवर्षे त्याच्यासाठी आरक्षित केलेली होती.हे सर्व उधळपट्टीचे प्रकार एअर इंडिया तोट्यात असताना चालू होते. एअर इंडियातील भरपूर धनलाभाची उच्च पदे पारसी मंडळींसाठी व जेआरडी टाटांची होयबागिरी करणाºयांसाठी राखीव असायची. जेआरडींना तांत्रिक कारणांनी विरोध करणाºया आनंद कर्णिक, कॅप्टन जी.एन. सिंग, कॅप्टन खानसारख्या तज्ज्ञ मंडळींना बदनाम करून जेआरडींनी बाहेर काढले. जेआरडींच्या नगण्य बे्रड स्लाइसपासून अब्जावधी रुपयांच्या विमानांच्या खरेदीपर्यंत सर्व व्यवहार पारसी दलाल एजंट कंपनीच्या माध्यमातून चालत. हा सर्व भ्रष्ट व राष्टÑलुटीचा प्रकार ‘विक्रम व्होरा’ या पत्रकाराने ‘फॉर यू’ नावाच्या त्याच्या मालकीच्या नियतकालिकातून १९७२-७५ च्या सुमारास प्रसिद्ध केला होता. हिरे, माणकांनी भरल्यासारख्या वाटणाºया सुवर्णकलशसदृश एअर इंडियाचे व इंडियन एअरलाइन्सचे जेआरडींनी पद्धतशीरपणेमातीचे मडके केले होते. त्या मडक्याला भोके पाडण्याचे व त्या मडक्याचा तळच कापण्याचे काम नंतर केले गेले.आठ-दहा विमाने ताफ्यात असलेल्या एअर इंडियाला २३ मजली इमारत कशासाठी बांधाविशी वाटली हे जागतिक एअर लाइन्सला कळत नव्हते. त्या इमारतीत दोन मजले देशविदेशातील महागड्या, प्राचीन कलावस्तंूनी ‘आर्ट स्टुडिओ’ इंडियाच्या खर्चाने सजवला तेव्हा एअर इंडिया तोट्यात चालत होती.अशा पद्धतीने भिकारी झालेल्या महाराजाला व त्या मातीच्या मडक्याला एअर इंडिया व इंडियन एअरलाइन्सच्या कामगार संघटनांनी मस्त भोके पाडली. जागतिक पातळीवर १०० आसनांहून अधिक क्षमतेच्या प्रत्येक विमानाला एअरलाइन्समध्ये ८० ते १०० कर्मचारी (तांत्रिक, अतांत्रिक, व्यवस्थापकीय प्रकारचे) असतात. एअर इंडियात प्रत्येक विमानासाठी ३०० कर्मचारी नोकरीत आहेत. ज्या शहरांचा हवाई वाहतुकीशी जराही संबंध नाही, अशा महाबळेश्वर, कोडाइकनाल, माउंट अबू या शहरातील पंचतारांकित हॉटेलात व रिसॉर्टमध्ये एअर इंडियाच्या आर्थिक गुंतवणुकी कशासाठी असतात? एअर इंडियाला खोलच खोल आर्थिक खड्ड्यात ढकलायचे नीच व निर्घृण काम रुसी मोदी या हेकेखोर पारसी माणसाने १९९४-९८ दरम्यान केले. ते सर्व किळसवाणे प्रकार समजावून सांगायला वेगळा लेख लागेल.(प्रस्तुत लेखक हे सर्व उघड पद्धतीने १९९५ पासून वेळोवेळी लेखातून, पुस्तकातून, भाषणातून सांगत आला आहे. तात्पर्य एअर इंडिया हे भोके पडलेले व तळ नसलेले मातीचे मडके आहे. ते कधीही विकले जाणार नाही. यावर उपाय आहेत. ते उपाय धाडसी असतील. पण ते नंतर कधी तरी सांगू.)

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया