शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

'राष्ट्रवादी'चं विसावं वरीस धोक्याचं? 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 8:25 AM

शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज (10 जून) द्विदशकपूर्ती साजरी करत आहे.

- नंदकिशोर पाटील शरद पवारांचाराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज (10 जून) द्विदशकपूर्ती साजरी करत आहे. या 20व्या वर्धापन दिनानिमित्त आमच्या शुभेच्छा! साधारणपणे माणसाच्या आयुष्यात वयाच्या दहा ते वीस वर्षांपर्यंत कालखंड हा संक्रमणाचा काळ मानला जातो. कारण याच वयात मुलाची शारीरिक, मानसिक वाढ होऊन शहाणपण आलेलं असतं. आयुष्यात आपणांस कुठं जायचंय, काय मिळवाचंय, याचा निर्णय देखील याच टप्प्यावर घ्यावा लागतो. या वयाला ' पौगंडावस्था' असंही म्हणतात.राष्ट्रवादीची सध्याची अवस्था आणि आजवरच्या वाटचालीवर नजर टाकली तर दिसते ते एवढेच की, स्थापनादिनी (10 जून 1999) या पक्षाच्या घड्याळात दहा वाजून दहा मिनिटं झाली होती. आणि आजही तेवढीच आहेत ! सांगायचं तात्पर्य काय, तर हा पक्ष 20 वर्षांनंतरही आहे तिथेच आहे. धड ना वृद्धी, ना घट. या अवस्थेला मुडदूस अवस्था म्हणतात. हे असं का झालं? शरद पवार यांच्यासारखा चाणाक्ष, धूर्त, अत्यंत  महत्त्वाकांक्षी आणि हवेची दिशा अचूक ओळखणारा जाणता नेता, सोबत जिल्ह्या-जिल्ह्यातील मातब्बर सुभेदार, त्यांनी उभारलेलं संस्थात्मक जाळं , त्यावर पोसलेले कार्यकर्ते एवढं सगळं असताना राष्ट्रवादी का वाढली नाही? पवारांच्याच शब्दांत सांगायचं तर 'भाकरी न फिरवल्यामुळं'!राजकारण प्रवाही असतं. ते विशिष्ट व्यक्ती अथवा घराण्यात अडकून राहिले तर त्याचं डबकं होतं. पवारांच्या राष्ट्रवादीचं असंच डबकं झालंय का? पवार, मोहिते, भोसले, क्षीरसागर, पाटील, देशमुख, भुजबळ, सोळंके, टोपे, नाईक, निंबाळकर आणि तटकरे अशा बारा घरांचा हा पक्ष. (आडनावं वानगीदाखल. बरोबर असतील तर निव्वळ योगायोग !) पंचायत समिती,  जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा असो की साखर कारखाना, दूध संघ, बाजार समिती असो. सगळं काही या घराण्यात. सतरंजी उचलणारे थकून भागून शेवटी शिवसेना- भाजपाच्या आश्रयाला गेले. कार्यकर्त्यांनी सतरंजी झटकली तसे हे सुभेदार उघडं पडले. शरद पवार यांचं आजवर सगळं राजकारण ऊस आणि साखर कारखानदारीभोवती फिरत आलं आहे. पवारांनी नेहमीच धनिक बागायतदारांची बाजू घेतली. ऊस, द्राक्षे आणि डाळिंबासाठी पवारांनी जेवढे प्रयत्न केले तेवढा ओलावा त्यांनी कोरडवाहू शेतकऱ्यांबद्दल दाखवला नाही, ही वस्तुस्थिती त्यांचे समर्थकही मान्य करतील. 

जागतिक बाजारपेठेमुळे गेल्या दहा वर्षांत साखर कारखानदारी अडचणीत आली. पण त्या अगोदर 2004 ते 2009 या पाच वर्षांत सत्तेच्या बळावर सहकारी साखर कारखाने कुणी मोडीत काढले? तोट्यात चालणारे हेच कारखाने खासगी मालकीचे होताच नफ्यात कसे आले? साखर कारखान्यांचे जे झाले तेच दूध संघाचे. सरकारी आणि सहकारी दूध संकलन यंत्रणा मोडीत काढून ती स्वतःच्या मालकीची कुणी केली? या व्यवहारात नेते मातब्बर झाले, पण सहकार संपला आणि पवारांच्या राजकारणाला घरघर लागली.राजकीय पक्षाकडे किमान काही ध्येय, धोरण असावे लागते. कालानुरूप त्यात बदल होऊ शकतो, पण मुळात काहीतरी 'असावं' लागतं. या निकषांवर राष्ट्रवादीकडे काय आहे? सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाच्या मुद्द्यांवर काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेले ( वस्तुतः हकालपट्टी ) शरद पवार, तारिक अन्वर आणि पी. ए. संगमा या तीन महत्त्वाकांक्षी नेत्यांनी एकत्र येऊन 'राष्ट्रवादी काँग्रेस' हा पक्ष स्थापन केला. 1999ची विधानसभा लढविली आणि निकालानंतर सोनिया गांधी यांच्या काँग्रेस पक्षासोबत सरकार स्थापन केले! पवारांना दहा वर्षं राज्य आणि केंद्रात सत्ता मिळाली खरी, पण ती देखील काँग्रेसच्या आश्रयाला जाऊन. जिथे पर्याय म्हणून उभं राहायला हवं होतं तिथंच ते परावलंबी बनले!
शरद पवार यांच्या राजकारणाला धरसोडीचा शाप आहे. त्यांच्याविषयी कुणालाच खात्री बाळगता येत नाही. आज भलेही ते भाषणात शाहू, फुले, आंबेडकर या थोरांची नावं घेत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जातीयवादी ठरवत असतील, 1978च्या पुलोद सरकारमध्ये जनसंघाला त्यांनीच सत्तेत सहभागी करून घेतले होते. आजही काही जिल्हा परिषदेत ते भाजपासोबत आहेतच की! आज देशाला/ राज्याला सक्षम अशा पर्यायी राजकीय पक्षाची, नेत्याची गरज आहे. वयोमानानुसार पवारांच्यावर अनेक मर्यादा आहेत. पक्षाची आज दशकपूर्ती साजरी करताना काळाची पावलं वेळीच ओळखून एक तर हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा अथवा अपेक्षित/ वंचित घटकातील तरुणांच्या हाती पक्षाची धुरा सुपूर्द करून आपण मार्गदर्शक व्हावे, एवढाच फुकटचा ( न मागता दिलेला ) सल्ला! पुनःश्च एकदा शुभेच्छा!!( कार्यकारी संपादक, लोकमत )

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस