शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

हे तर अघोषित अमानवी युद्धच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 6:08 AM

डिसेंबर, १९९९ मध्ये इंडियन एअरलाइन्सचे आय-८१४ हे विमान काठमांडूहून नवी दिल्लीला जात असताना पळवून नेण्यात आले आणि तालिबानच्या ताब्यात असलेल्या कंदाहार येथे उतरविण्यात आले.

माणसे सतत दहशतीखाली वावरत असतात. मग ती दहशत अज्ञात घटकांची असो की, ठाऊक असलेल्या मानसिक वा शारीरिक घटकांची असो. दहशतवादी हल्ला मग तो माणसांवर असो की लष्करावर असो, तेथे मृत्यूची चाहूल असतेच असते. लष्कराचे जवान आपल्या आयुष्याची बाजी लावून देशाचे रक्षण आक्रमकांपासून करीत असतात, पण शस्त्र उचलण्याची संधीही न मिळता जवान मृत्युमुखी पडतात. तो दहशतवादी हल्लाच मानायचा का? युद्ध सुरू असताना काही नियम पाळायचे असतात, पण दहशतवादी हल्ल्यात कोणते नियम पाळण्यात येतात? पलीकडून होणारा दहशतवाद आहे, असे म्हणून स्वस्थ बसता येईल का? केंद्रीय राखीव दलाचे ४४ जवान एका झटक्यात जेव्हा मारले जातात, तेव्हा तो दहशतवादी हल्ला नसतो, तर ते युद्धाचे कृत्य असते! गुप्तचर संघटनेचे अपयश असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. हा तर देशांतर्गत घातपातच म्हणावा लागेल. त्यामागे पाकिस्तानात राहून इशारे देणाऱ्या जैश-ए-महंमद संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर याचाच हात असल्याचे समजले जाते.

डिसेंबर, १९९९ मध्ये इंडियन एअरलाइन्सचे आय-८१४ हे विमान काठमांडूहून नवी दिल्लीला जात असताना पळवून नेण्यात आले आणि तालिबानच्या ताब्यात असलेल्या कंदाहार येथे उतरविण्यात आले. या विमानातील प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आले होते आणि त्यांच्या सुटकेच्या बदल्यात मसूद अजहरसह तीन अतिरेक्यांच्या सुटकेची मागणी अपहरणकर्त्यांकडून करण्यात आली होती. त्या दहशतवाद्यांची मुक्तता करणे हे तत्कालीन सरकारचे अपयश समजायचे का? अशा तºहेच्या घटना जगभर कुठे ना कुठे घडतच असतात. लष्करी हालचालींचा गुप्तपणे सुरू असलेला त्या भाग असतात. तसाच प्रकार या घटनेत घडला नाही का? त्याच व्यक्तीकडून एका पिढीपासून दुसऱ्या पिढीतील लोकांपर्यंत ओलीस ठेवण्याचा प्रकार घडला नाही का?

जिहादी गटांना कोणतेही नियम नसतात. त्यांच्यावर जेव्हा हल्ला होतो, तेव्हा उंदराप्रमाणे बिळात लपण्याची त्यांची धडपड सुरू होते. मग अशा घटकांना कायद्याच्या मर्यादांच्या पलीकडे जाऊन संपवून टाकणे शक्य नाही का? अनेक नेत्यांनी स्वत:च्या स्वार्थी हेतूंसाठी त्यांना संपवून टाकण्याची इच्छा व्यक्त केली असताना, त्या व्यक्ती सत्तेवर आल्यावर, त्यांनी त्या उंदरांना बिनदिक्कतपणे बिळात लपू दिले आहे. उंदरांची बिळे दुर्लक्षित केली, तर ती अधिकाधिक वाढत जातात आणि त्यांचे जाळेच तयार होते, पण सत्तारूढ नेत्यांच्या हाती असलेल्या सत्तेच्या बळावर ही सर्व बिळे उद्ध्वस्त का करू नयेत? त्यासाठी राजकीय नेत्यांच्या पाठीचा कणा ताठ असायला हवा, पण त्याचा अभाव असणे हीच खरी समस्या आहे. त्याची फार मोठी किंमत जनतेला आणि सरकारलादेखील चुकवावी लागते.

वास्तविक, धार्मिक वेडाचाराला जगात कुठेही स्थान नाही. ही माणसे जर दहशतवादाचा आश्रय घेत असतील, तर सत्ताधाऱ्यांनी त्यांना तोंड देण्याची तयारी करायला हवी. बलात्काºयांवर कारवाई करण्यासाठी जशी विशेष न्यायालये आहेत, तशीच न्यायालये जिहादी तत्त्वांसाठीही असायला हवीत. त्यामुळे सूड घेणे सहज शक्य होईल. दहशतवादी मारले गेले, तरी दहशतवाद मरत नाही, हे जरी खरे असले, तरी या संकटाचा सामना करण्यासाठी निरनिराळे उपाय योजावे लागतील आणि बदला घेणे हा त्यापैकी एक असेल!

आपण सध्या डिजिटल युगात वास्तव्य करीत असल्याने, सीमेपलीकडून होणाºया हल्ल्यांना आणखी एक पैलू लाभला आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपण आपल्या मुलांना आणि तरुणांना अधिक कट्टरपंथी बनवत आहोत. त्यातही काश्मीर खोºयाचे झपाट्याने धृवीकरण होत आहे. एकट्या अनंतनाग येथे पाचशेपेक्षा अधिक मदरसे असून, ते तरुणांना कसल्याही प्रकारचे शिक्षण देण्यास मोकळे आहेत. पाच वर्षांपासून मुलांना जिहादमुळे कोणता गौरव प्राप्त होतो, ते शिकविले जाते. काश्मीरमध्ये वापरल्या जाणाºया स्मार्टफोनमधील मजकूर धक्कादायक असतो आणि त्याला तोंड देण्याची कोणतीही योजना आपल्यापाशी नाही.

मेजर गौरव आर्य यांनी काश्मीर खोºयातल्या होणाºया धृवीकरणावर पुढील उपाय सुचविला आहे. काश्मीरच्या राजधानीत तंत्रज्ञानाने परिपूर्ण इमारत उभारण्यात यावी. त्यात काश्मिरी युवकांसह काही नागरिकही असावेत. ते लेखक असतील, व्हिडीओग्राफर असतील, हॅकर्स असतील, तसेच सोशल मीडियाचे तज्ज्ञ असतील. ते इस्लामी संस्कृतीचे तज्ज्ञ असावे. गीतलेखक आणि संगीतकारही असावेत. त्यांच्यामार्फत पाकिस्तानच्या प्रचाराला जबरदस्त प्रत्युत्तर देण्यात यावे. भारताची गाथा सांगू शकतील, अशा हजारो तरुण-तरुणींना एका व्यासपीठावर आणण्याची गरज आहे.

पाकिस्तानने भारताविरुद्ध जे अघोषित अमानवी युद्ध छेडले आहे, ते कोणत्याही प्रकारे आपण जिंकायला हवे. काश्मिरातून येणाºया शहीद झालेल्या जवानांच्या शवपेट्या थांबविण्यासाठी सर्व तºहेचे प्रयत्न केले पाहिजेत. मुख्य म्हणजे नागरिकांनी लष्करास सल्ला देणे बंद केले पाहिजे. त्यांना त्यांचे काम त्यांच्या पद्धतीने करू द्या, त्यांच्यात तेवढे शहाणपण आणि तेवढी क्षमता नक्कीच आहे!!- डॉ. एस. एस. मंठामाजी चेअरमन, एआयसीटीई एडीजे, प्रोफेसर, एनआयएएस, बंगळुरू.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला