शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

अलिखित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2016 3:51 AM

मॅनर्सचा हा अभाव फक्त हातातल्या यंत्रापुरताच मर्यादित नाही. गाडी चालवताना सगळ्यात जास्त त्रास कशाचा होत असेल तर बाजूचा स्वच्छ, सुंदर फुटपाथ सोडून रमतगमत रस्त्यावरून

- शिल्पा नवलकर

मॅनर्सचा हा अभाव फक्त हातातल्या यंत्रापुरताच मर्यादित नाही. गाडी चालवताना सगळ्यात जास्त त्रास कशाचा होत असेल तर बाजूचा स्वच्छ, सुंदर फुटपाथ सोडून रमतगमत रस्त्यावरून चालणाऱ्या माणसांचा. रस्त्याच्या कडेला घोळका करून गप्पा मारणाऱ्यांचा. कानात हेडफोन घालून संगीत ऐकत रस्ता ओलांडणाऱ्यांचा... पुढच्या गाडीची काच खाली करून ‘पुरा भारत कचरे की पेटी है’ या अतूट विश्वासाने कागदाचा बोळा रस्त्यावर फेकणाऱ्या सुशिक्षित असंस्कृतांचा....अगदी पहिली दुसरीत असताना आपल्याला काही मॅनर्स शिकवले जातात. कधी शाळेच्या पुस्तकातून तर कधी वडीलधाऱ्यांकडून... चांगल्या सवयी, अदब, शिष्टाचाराचे धडे दिले जातात, पण ‘माफ करा’, ‘धन्यवाद’ या शब्दांचा सढळ वापर करावा. मोठ्यांशी आदराने वागावे. या पलीकडे काही शिकवण्याची गरज त्या वेळी ना हे शिकविणाऱ्या पुस्तकांना भासली ना शिकणाऱ्या आपल्याला... गरजेप्रमाणे ‘सॉरी’, ‘थँक यू’ म्हणत राहिलं, बोलण्यात विनम्रता ठेवली की, आपले मॅनर्स उत्तम, जागच्या जागी. हे असं आपण ठरवून टाकलं... आणि त्या पलीकडे विचारच करायचे थांबलो... पण मॅनर्स, अदब या शब्दांचा अर्थ, त्याची व्याख्या विस्तारण्याची वेळ आली आहे, हे आपल्यापैकी कित्येकांच्या लक्षातच आलं नाहीये का?नाटक ऐन रंगात आलेलं असतं. स्टेजवरचा कलाकार जीव तोडून काम करत असतो... आणि प्रेक्षकांमध्ये मोबाइल वाजतो. वाजतच राहतो. बाई संथ गतीने पर्समधून फोन काढतात. तो कानाला लावून हलक्या आवाजात म्हणतात, ‘अगं मी नाटकाला आलेय. संपल्यावर फोन करते. घरीच असशील नं?’ बार्इंच्या मते हलका असलेला त्यांचा आवाज पार स्टेजपर्यंत ऐकू जातो आणि एकाग्रता ढळलेला कलाकार मनातल्या मनात म्हणतो, ‘नंतर कशाला? इतकं महत्त्वाचं असेल तर आताच बोलून घ्या ना... आम्ही थांबतो तोवर...’ सगळे प्रेक्षक जरी फोनवर बोलले नाहीत, तरी सार्वजनिक ठिकाणी आपला मोबाइल ढणाढणा वाजणार नाही, याची काळजी घेणं आपल्याला अजूनही जड का जातं?हॉस्पिटल, प्रेतयात्रा अशा ठिकाणीही हमखास फोन वाजतात. सतत येणारे मेसेज आपला घंटानाद ऐकवत राहतात, पण फोनच्या मालकाला जराही अपराधी वाटत नाही. किंबहुना, अपराधी वाटावं असं काहीतरी आपल्याकडून घडतेय, याची किंचितही जाणीव त्याला नसते... गंभीर काहीतरी घडत असेल, तर फोनचा आवाज येऊ नये असं नाही, तर कुठल्या ठिकाणी संवाद घडत असेल किंवा शांतता असेल, तिथे आपल्या हातातल्या यंत्रातून सतत चित्रविचित्र आवाज येत राहणार नाहीत, हे बघण्याचे अलिखित मॅनर्स आपल्यात आता बिंबायला नकोत? अडीअडचणीसाठी सोबत फोन असावाच. महत्त्वाचा कॉल असेल, तर तो वाजावाही... पण २४ तास येत राहणारे ग्रुप मेसेजेस इतरांची चिडचीड होईपर्यंत किणकिणत राहतात, हे कोणालाच का टाळावंसं वाटू नये?माझा एक जवळचा नातेवाईक कुटुंबात कुठलाही समारंभ असला, तरी सोबत त्याचा आयपॅड घेऊन येतो. अगदी लग्नमुंजीपासून ते पार्टीपर्यंत कुठेही... आणि आजूबाजूला अनेक महिन्यांनी भेटलेला जिवलग गोतावळा असला, तरी मान खाली घालून वाचत राहतो किंवा चक्क खेळत बसतो... म्हणायला उच्चशिक्षित, उच्चपदस्थ... पण इतकं उद्धटपणाचं दृश्य कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी असूच शकत नाही, हे कळण्याइतकी मात्र त्याच्या बुद्धीची झेप नाही.... समोरचा माणूस आपल्याशी बोलत असताना हातातल्या फोनकडे लक्ष देणं, संवाद घडत असताना कानाला हेडफोन लावून ठेवणं, न विचारता पटकन कोणाचाही फोटो काढणं, मागच्याला खोळंबून ठेवत जागच्या जागी उभं राहून सेल्फी काढून झाल्याशिवाय पुढे न हलणं ही आता मॅनरलेस असण्याची नवी लक्षणं आहेत, हे कुठलं पुस्तक शिकवणार आपल्याला?आपण देवळात जाताना चप्पल नाही ना घालून जात?... हा विचार आपल्याला जितका असह्य वाटतो, तितकंच जिथे अचानक आपला फोन ‘शांताबाई शांताबाई..’ असं रेकायला लागणं असह्य का नाही वाटतं?... परीटघडीचे कपडे घालून भर रस्त्यावर मांडी घालून बसलेला पांढरपेशा माणूस मी तरी अजून बघितलेला नाहीये. तरी अशी वरवर सुसंस्कृत भासणारी ५-६ माणसं रोज माझ्या गाडीजवळून त्यांच्या फोनवर मेसेज टाईप करत-करत चालत जातात... त्यांना उतरून मी काही मॅनर्स शिकवले, तर त्यांना त्यांचं नेमकं काय चुकतंय, हे लक्षात तरी येईल का? तर नाहीच... कारण मोबाइल मॅनर्स हे आता ‘सॉरी’, ‘थँक यू’ इतकेच महत्त्वाचे झाले आहेत, हा विचार रुजणं तर दूरच, तो कित्येकांच्या मनाला अजून शिवलाही नाहीये...मॅनर्सची ही बदलेली अलिखित परिभाषा आपल्या आधीची पिढी आपल्याला शिकवू शकत नाही... ती आपली आपणच शिकायला हवी... मी माझ्याच कोशात राहून इतरांना त्रास होईल, अशा छोट्या-छोट्या चुका करून बसत नाहीये ना, हे चाचपून बघायला हवं... तरच जे मॅनर्स आपल्याला आधीच्या पिढीने शिकवले, त्याहून खूप जास्त आपल्याला पुढच्या पिढीला शिकवता येतील.

(एप्रिल महिन्याच्या मानकरी असलेल्या लेखिका प्रसिद्ध अभिनेत्री व लेखिका आहेत)