शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
2
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
3
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी नॉट रिचेबल नव्हतो, सतेज पाटीलच..."; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर राजेश लाटकरांनी थेटच सांगितलं
5
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार
6
धक्कादायक! मावशी गंगा स्नानाची रील बनवत राहिली अन् 4 वर्षांची चिमुकली बुडत रहिली! 2 तासांनंतर सापडला मृतदेह 
7
...तर रोहित कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होईल, केवळ एकदिवसीय सामने खेळेल; दिग्गज क्रिकेटरची मोठी भविष्यवाणी
8
कॅनडामध्ये हिंदू मंदिरावरावरील हल्ल्याचा मोदींकडून निषेध; 'ट्रुडोंनी कायद्याचे राज्य राखावे अशी अपेक्षा' 
9
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियाला नशिबाने साथ दिली...", पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार रिझवानचं विधान
10
सात राज्यांत कांटे की टक्कर, एकात ट्रम्प आघाडीवर; अमेरिकेच्या मतदानावर जगाच्या नजरा खिळल्या
11
video: लाईव्ह सामन्यादरम्यान कोसळली वीज; एका खेळाडूचा मृत्यू, तर अनेकजण गंभीर जखमी
12
त्याला १२ भाऊ आणि ४ बहिणी आहेत; पाकिस्तानी खेळाडूचा परिचय करुन देताना अक्रम भलतंच बोलला
13
दापोलीत सहा कदम, पर्वतीत तीन अश्विनी कदम! नावं, आडनावं 'सेम टू सेम', कुणाचा होणार 'गेम'
14
उपमुख्यमंत्री बनवून भाजपानं अन्याय केला का?; देवेंद्र फडणवीसांनी आभारच मानले, कारण...
15
राज ठाकरेंचा पहिला घणाघात; पक्ष फोडीवरून एकनाथ शिंदे-अजित पवारांवर बरसले
16
सदा सरवणकरांचा प्रचार करणार की अमित ठाकरेंचा? नारायण राणे म्हणाले...
17
"...तर मीही मुख्यमंत्री व्हायला तयार"; CM महायुतीचाच होणार म्हणत, रामदास आठवले बोलून गेले 'मन की बात'!
18
...तर उद्धव ठाकरे ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले असते; देवेंद्र फडणवीसांनी मांडलं समीकरण
19
सतेज पाटील भडकण्यापूर्वी कोल्हापुरात मोठे नाट्य घडले, शाहू महाराजांनीच मधुरिमाराजेंना सहीचे आदेश दिले
20
Sanjay Roy : "मी निर्दोष आहे, मला फसवण्यात आलं"; आरोपी संजय रॉयने सरकारवर केला गंभीर आरोप

विदेशी भूमीवर देशाच्या प्रतिष्ठेला ‘डाग’ नको!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2023 6:53 AM

गुरपतवंतसिंह पन्नूच्या नावाने भारतीयांचे रक्त उसळणे स्वाभाविकच;पण त्यासाठी अमेरिकेबरोबरच्या संबंधांना नख लावणे उचित नव्हे!

शशी थरूर, खासदार, ख्यातनाम लेखक

भारत सरकारसाठी काम करणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध अमेरिकेच्या न्याय विभागाने आरोपपत्र दाखल केले आहे. अमेरिकेच्या भूमीवर एका अमेरिकी नागरिकाची हत्या करण्याचा कट रचण्यासाठी या व्यक्तीला काही पैसे दिले गेले होते असा हा कथित आरोप आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाकडूनच ही बातमी बाहेर आल्यानंतर नवी दिल्लीत काहीशी खळबळ माजणे तसे स्वाभाविकच होते.  भारत सरकारच्या एका अधिकाऱ्याने ५२ वर्षांच्या निखिल गुप्ता या भारतीय नागरिकाला शीख दहशतवादी गुरपतवंतसिंह पन्नू या न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या आणि अमेरिका तसेच कॅनडाचे दुहेरी नागरिकत्व असलेल्या व्यक्तीची हत्या करण्याचा कथित आदेश दिला होता. पन्नू या कुख्यात खलिस्तानी दहशतवाद्यावर भारतात हिंसा, अशांतता पसरविण्याचा शिवाय पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी काम करण्याचाही आरोप आहे. अमेरिकी सरकारच्या दृष्टीने पन्नू हा  न्यूयॉर्कस्थित शीख समूहाचा (‘सिख फॉर जस्टिस’) कायदाविषयक सल्लागार असून, त्याने जे सांगितले आणि केले त्यामुळे कोणत्याही अमेरिकी कायद्याचे उल्लंघन होत नाही. त्याचे अमेरिकन नागरिक असणे हेही त्याला तिथल्या सरकारचे संरक्षण मिळवून देणारेच आहे.

भारत सरकारच्या दिल्लीतील एका अधिकाऱ्याने पन्नूला संपवण्यासाठी भाडोत्री मारेकरी ठरवण्याची सुपारी निखिल गुप्ताला दिली होती, असा आरोप अमेरिकेच्या न्याय विभागाच्या खटल्यात केला आहे. न्यायालयात दाखल केलेल्या कागदपत्रात त्याचे नाव नाही, केवळ त्याचा ‘परिचय’ दिलेला आहे. हा माणूस आंतरराष्ट्रीय स्तरावरील शस्त्रास्त्र आणि अमली पदार्थांच्या व्यापारात गुंतलेला असल्याचे सांगितले जाते. त्याच्याबाबतीत गुजरातमध्ये प्रलंबित असलेल्या एका प्रकरणाची “काळजी’ घेतली जाईल असे आश्वासन भारतीय अधिकाऱ्याने त्याला दिले होते. त्यावर गुप्ताने एका भाडोत्री मारेकऱ्याला १५ हजार अमेरिकन डॉलर इतकी रक्कम इसार म्हणून दिली होती. हत्येच्या बदल्यात त्याला जवळपास १ लाख अमेरिकन डॉलर्स मिळणार होते.

गुप्ता आणि भारत सरकार यांच्या दुर्दैवाने मारेकरी वास्तवात अमेरिकन ड्रग एन्फोर्समेंट ॲडमिनिस्ट्रेशनचा (एडीईए) एक अंडरकव्हर हस्तक निघाला. काही आठवडे गुप्तावर नजर ठेवल्यानंतर त्याने न्यायालयात खटला भरण्याच्या दृष्टीने पुरेसे पुरावे एकत्र केले. एडीईएने अधिकृतपणे एक पत्रक काढून असा दावा केला की, त्याच्या तपासकर्त्यांनी अमेरिकेच्या भूमीवर एका अमेरिकन नागरिकाची हत्या करण्याचा प्रयत्न उधळून लावताना एक भयानक कट उघड केला आहे.

एकुणातच या निखिल गुप्ता याने बराच घोळ केला. संबंधित सर्वांना दोषी ठरवता यावे म्हणून पुरेसे पुरावे मागे सोडले. ‘पंतप्रधान मोदी यांच्या वॉशिंग्टन दौऱ्याच्या काळात काही करू नये’ अशा सूचना त्याला देण्यात आल्याचा तपशीलही उघड झाला. त्याला हाताळणाऱ्या दिल्लीस्थित व्यक्तींनी कॅनडात निज्जर नामक दहशतवाद्याची हत्या झाली त्याचे व्हिडीओ गुप्ताला उपलब्ध करून दिले होते. निज्जर याचे रक्ताने भरलेले शरीर त्याच्या गाडीत पडलेले त्या व्हिडीओत दिसते. गुप्ता याने हे व्हिडीओ त्या मारेकऱ्याला दाखवले. भारत सरकारच्या अधिकाऱ्याने गुप्ता याला पन्नू याचे पत्ते, फोन नंबर आणि त्याची दैनिक दिनचर्या असा तपशील पुरवला होता, जो गुप्ता याने भाडोत्री मारेकऱ्याला दिला; असा आरोपही अमेरिकन न्याय विभागाने केला आहे.

निज्जरच्या प्रकरणात जे काही झाले, त्याबाबतीत कोणते ‘पुरावे’ हाती लागले नव्हते. कॅनडाने भारतीय हस्तकांवर केवळ ‘वहीम’ व्यक्त केला, पण ‘विश्वसनीय पुरावे’ उपलब्ध नव्हते. अमेरिकन न्याय विभाग थेट न्यायालयात गेला आहे. कॅनडा सरकारने आतापर्यंत असे काही केलेले नाही. या बातमीवर प्रतिक्रिया देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची म्हणाले, ‘परदेशामध्ये अशा हत्या घडवून आणणे हे सरकारी धोरणाशी सुसंगत नाही. मात्र, अमेरिकेने केलेल्या आरोपांकडे भारत गांभीर्याने पाहत आहे. संघटित गुन्हेगारी, शस्त्रास्त्रांची तस्करी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवाद्यांमधील साठगाठ ही सारीच कायदेशीर यंत्रणा आणि संघटनांसाठी काळजीची कारणे आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आम्ही एक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापना केली आहे!’

ज्या देशाने दीर्घकाळापर्यंत आपल्या आंतरराष्ट्रीय बाबतीतल्या आचरणात संयम, दूरदर्शिता आणि परिपक्वता दाखवली, त्या भारतासाठी हे प्रकरण गंभीर आहे. ‘परदेशी नागरिकांना लक्ष्य करणारा एक बेजबाबदार देश म्हणून आता भारताचे चित्र जगात रंगवले जात आहे’, याकडे बागची यांनीही लक्ष वेधले. अमेरिकेच्या न्याय विभागाचा जो आरोप आहे तशी काही कारवाई भारताने खरोखरच केली असेल तर त्यातून अमेरिकन सार्वभौमत्वाच्या पावित्र्याविषयी स्पष्ट अनादर, कायद्याच्या राज्याची अवहेलना तसेच आंतरराष्ट्रीय समझोते आणि प्रथांचे उल्लंघन झाले आहे, असेच म्हणावे लागेल.  ज्याच्याबद्दल खुद्द पंजाबमध्येही कोणाला फारसे आकर्षण नाही अशा व्यक्तीपासून सुटका मिळवण्यासाठी या अशा मार्गांचे अवलंबन भारताने करू नये. भारताचे अमेरिकेशी असलेले नाते अधिक महत्त्वाचे आहे. खलिस्तानवादी म्हणून पन्नू याचा राग भले आपल्याला येईल, परंतु त्याच्या नि:पातासाठी वॉशिंग्टनबरोबर असलेल्या आपल्या विशेष संबंधांना नख लावणे उचित ठरणार नाही. परदेशाच्या भूमीवरील सर्व स्थानिक कायदे आणि संकेतांचा आपल्याला आदर आहे, हे आपल्या कृतीमधून सिद्ध करावे लागेल. तशीच गरज पडली, तर देशाने आपल्या कूटनीतीविषयक धोरणांचे पुनर्मूल्यांकनही केले पाहिजे.

टॅग्स :IndiaभारतAmericaअमेरिका