शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
2
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
3
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
4
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
5
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
7
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
8
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
9
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
10
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
11
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
12
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
13
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
14
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
15
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
16
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
17
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
18
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
19
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
20
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."

स्वयम् शिक्षणाचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:26 AM

स्वयम् शिक्षण प्रयोग संस्थेच्या माध्यमातून महिला केवळ स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या नाहीत, तर त्यांनी बेरोजगार महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. गावातील जमीन महिलांच्या नावावर करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम स्तुत्य आहे.

-विजय बाविस्कर

महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणाच्या चर्चा आपण नेहमीच ऐकत असतो; परंतु त्याला कृतीची जोड देत समाजासमोर आदर्श ठेवणाऱ्या फार मोजक्याच संस्था सभोवताली आहेत. स्वयम् शिक्षण प्रयोग १९९३पासून महाराष्ट्रातील ग्रामीण विभागात महिला सक्षमीकरण व ग्रामविकासासाठी कार्य करते. ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने धडपडणारी अग्रणी संस्था म्हणून संस्थेची जागतिक स्तरावर ओळख आहे. महिलांना बचत गटाच्या माध्यमातून संघटित करून बचत, कर्ज व परतफेडीची सवय संस्थेने लावली. महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम व ओडिशा या राज्यांमध्ये १,४५,००० महिला शेतकरी व व्यावसायिकांचे जाळे तयार करून ५ लाख लोकांपर्यंत पोहोचली आहे.१९९३च्या लातूरच्या भूकंप पुनर्वसनासाठी सल्लागाराची भूमिका पार पाडताना प्रकल्पाचा अपेक्षित वेग गाठण्यासाठी आणि महिला सक्षमीकरण व सहभाग कसा महत्त्वाचा आहे, हे पटवून देत महिलांना संवाद सहायक बनवून घरांची रचना करताना कुटुंबाच्या सुविधांचाही विचार करून बांधण्यात आली. पुढे गुजरातचा भूकंप २००१, तमिळनाडूची त्सुनामी २००४, बिहारचा पूर २००७मध्ये सदर महिलांनी आपल्या आपत्तीतून शिकलेले अनुभव इतरांना मदत करीत सर्वांना विकासाकडे नेण्याचा प्रयत्न केला.पंचायत राज, सखी बचत गट ते सखी महासंघ, पाणी व स्वच्छता, स्वच्छ ऊर्जा, शेती व अन्नसुरक्षा, वित्तीय साक्षरता, व्यवसाय-जागृती ते विकास अशा विविध उपक्रमांमध्ये महिलांचे नेतृत्व व सहभाग वाढविण्यासाठी संस्था सदैव कार्यरत आहे.स्वयम् शिक्षण प्रयोगमार्फत महिला व्यावसायिकांना आर्थिक मदत, बाजारपेठ व कौशल्य प्राप्त करून देण्यासाठी सखी समुदाय कोश, सखी युनिक रुरल एंटरप्राईज, सखी सोशल एंटरप्राईज नेटवर्क या संस्थांची निर्मिती करण्यात आली.२०१४ पासून संस्थेमार्फत शाश्वत शेती हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. कुटुंबातून महिलांना त्यांच्या निर्णयानुसार शेती करण्यासाठी किमान १ एकर शेतीमध्ये घरी लागणाºया खाद्यपदार्थांची लागवड करून ते नैसर्गिक पद्धतीने पिकवून घरीच वापरले जातात. जेणेकरून महिलांचे सक्षमीकरण, अन्नसुरक्षा तसेच पर्यावरणाचे रक्षण या तिन्ही बाबी साध्य होतात. आजपर्यंत ४१,००० महिला शेतकºयांसोबत संस्था कार्य करीत आहे. पुढील काळात १ लाख महिला शेतकरी आणि १ लाख व्यावसायिकांसोबत काम करण्याचे उद्दिष्ट २०२३ पर्यंत ठेवण्यात आले आहे.जागतिक तसेच देश पातळीवर विविध पुरस्कारांनी संस्थेला सन्मानित करण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने यूएनडीपी एक्वेटर प्राईझ (२०१७) आणि यूएनएफसीसीसीचा मोमेंटम फॉर चेंज पर्यावरण पर्याय पुरस्कार (२०१६) यांचा विशेष उल्लेख करता येईल.शासन, आंतरराष्ट्रीय देणगीदार संस्था व मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या सीएसआर निधीतून संस्थेला आर्थिक पाठबळ मिळते.संस्थेने केलेल्या कामामुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. या संस्थेच्या कामामुळे शेतकरी कुटुंबातील महिलांना अर्थार्जनाची संधी निर्माण झाली आहे. संस्थेचे यश तळागाळातील महिलांची क्षमता आणि त्यांचा सहभाग यामुळेच शक्य झाले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र