शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

Uttarakhand Glacier Burst: उत्तराखंडची दुर्घटना नेमकं काय सांगते?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2021 8:05 AM

Uttarakhand Glacier Burst: उत्तराखंडमध्ये घडणाऱ्या दुर्घटनांची कारणे नैसर्गिक असतात; पण मानवनिर्मित हस्तक्षेपांमुळे नुकसान मात्र प्रचंड प्रमाणात वाढते.

- अभिजित घोरपडे, संपादक, भवताल पर्यावरण अभ्यासकभारताची भौगोलिक विविधता प्रचंड आहे. त्यामुळे कोसी नदीच्या महापुराची कल्पना आपल्या नद्या पाहून करता येत नाही आणि उत्तराखंडच्या दुर्घटनेचा अंदाज आपल्याकडील माळीण येथील भूस्खलनाच्या दुर्घटनेवरून लावता येत नाही. म्हणूनच उत्तराखंड येथे रविवारी घडलेली आपत्ती समजून घेण्यासाठी तेथील भूगोल, हवामान, परिस्थिती आपल्याला समजून घ्यावी लागेल. 

उत्तराखंडची ओळख देवभूमी. गंगा, यमुना यांचा उगम, केदारनाथ-बद्रीनाथ यासारखी तीर्थक्षेत्रं, ७८१६ मीटर उंचीचे नंदादेवी शिखर ही तिथली ओळख. हे हिमालयाच्या दक्षिण उतारावरील राज्य. ८६ टक्के पर्वतीय क्षेत्र. अतितीव्र चढ-उतारामुळे जागोजागचे हवामान व परिस्थितीतही प्रचंड तफावत. नद्यांच्या प्रवाहांचा प्रचंड वेग आणि ऊर्जासुद्धा.. असा हा उत्तराखंड. तिथे काही आपत्ती नियमितपणे घडतात. ढगफुटी अर्थात कमी वेळात प्रचंड पाऊस, भल्यामोठ्या दरडी कोसळणे, दरडींमुळे नद्यांची पात्रं अडणे, त्यामुळे पाण्याचा प्रवाह अडून नैसर्गिक धरण तयार होणे - ते फुटणे, हिमस्खलन (अव्हालॉन्च) अशा घटना अधूनमधून घडत असतात. शिवाय हिमालय हे भूशास्त्रीयदृष्ट्या कमकुवत क्षेत्र असल्याने भूकंपाच्या दुर्घटनेचीही भर पडते. तिथल्या नद्या, त्यांचे पाणी ही मोठी नैसर्गिक साधनसंपत्ती. त्यांच्यावर धरणे बांधून वीजनिर्मिती करण्यात येत आहे. त्यामुळे गंगेच्या खोऱ्यातील अनेक उपनद्यांवर जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आले आहेत, येऊ घातले आहेत. या पार्श्वभूमीवर रविवारच्या घटनेकडे पाहावे लागेल.
चमोली जिल्ह्यातील धौलीगंगा नदीला पूर आला. त्यात ऋषीगंगा विद्युत प्रकल्प वाहून गेला. त्याच्या नेमक्या कारणाचा शोध अभ्यासक आणि प्रशासनाकडून घेतला जाईलच. विविध शक्यतांनुसार, या घटनेमागे हिमस्खलन, ढगफुटी किंवा हिमनदीमुळे निर्माण झालेला तलाव फुटून (ग्लेशियल लेक आऊटबस्ट) घडला असावा. येथे हिमनदीमुळे निर्मित तलाव फुटण्याची संकल्पना समजून घ्यावी लागेल. उंच प्रदेशावर हिमवृष्टी झाल्यावर हिम साचते. उतार असेल तर ते हळूहळू खाली सरकू लागते. 
हीच हिमनदी. ती विशिष्ट उंचीपर्यंत खाली उतरली की वितळू लागते. त्याच वेळी तिच्यासोबतचे दगड, शिळा तिथे जमा होतात, त्याचा बांध बनतो. त्यामागे वितळलेले पाणी साचून तलाव बनतो. काहींचा आकार इतका असतो की कोटी घनमीटर इतके पाणी साठू शकते. हा तलाव अस्थिर असतो, कधीही फुटू शकतो... या शक्यतांपैकी नेमके काय घडले हे पुढील काही दिवसांमध्ये समजेलच. धरणाच्या बांधकामामुळे ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. मात्र, अजून तरी त्याचा थेट संबंध दिसलेला नाही.या घटनेतून निश्चितच धडे घेता येतील. उत्तराखंडमधील दुर्घटनांची कारणे नैसर्गिक आहेत. मात्र, मानवनिर्मित हस्तक्षेपामुळे नुकसानीचे प्रमाण प्रचंड वाढते. ऋषीगंगा विद्युत प्रकल्प नसता तर तो प्रकल्प कोसळल्यामुळे झालेला मृत्यूचा आकडा फार पुढे गेला नसता, मग धौलीगंगा नदीला आलेला पूर ही आताइतकी मोठी आपत्ती ठरली नसती. २०१३ च्या केदारनाथ आपत्तीलाही हे लागू होते. पर्यटनासोबत अनिर्बंध विकास, पात्रातील अतिक्रमणे, जंगलतोड यामुळे मृतांचा आकडा ५५०० च्या पुढे गेला. यामध्ये हवामान बदलाचाही मुद्दा येतो. तापमानवाढीमुळे हिमालयातील हिमनद्या आक्रसत आहेत. त्यामुळे ढगफुटीच्या घटना वाढू शकतात. हिमाऐवजी थेट पाऊस पडण्याने पुराची तीव्रता वाढू शकते. हे सर्व पाहता हिमालयासारख्या संवेदनशील प्रदेशात विकास करताना किती काळजी घ्यावी लागणार आहे, याचाच धडा या आपत्तीने दिला आहे.

टॅग्स :uttarakhand glacier burstउत्तराखंड हिमकडा