शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
3
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
4
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
5
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
7
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
8
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
9
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
10
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
11
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
12
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
13
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
14
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
15
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
16
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
17
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
18
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
19
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
20
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही अन् वेताळ पुन्हा झाडावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:23 AM

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तो झाडावर चढला. फांदीवर लटकणारे प्रेत खांद्यावर घेऊन नेहमीप्रमाणे स्मशानाच्या दिशेने मौनात चालू लागला. प्रेतात बसलेला वेताळ पुन्हा जागा झाला.

- नंदकिशोर पाटीलविक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तो झाडावर चढला. फांदीवर लटकणारे प्रेत खांद्यावर घेऊन नेहमीप्रमाणे स्मशानाच्या दिशेने मौनात चालू लागला. प्रेतात बसलेला वेताळ पुन्हा जागा झाला. विक्रमादित्यास प्रश्न विचारू लागला.‘राजा! तुझ्यासारख्या राजांना कोणी बोललं तर त्यास किती महत्व द्यायचं, याचं तारतम्य नसतं. सुखाने विश्रांती घ्यायची सोडून तू नको ते कष्ट कशाला उपसत बसला आहेस ? वारसाहक्कानं थोरल्या बंधूस गादी मिळाल्यामुळे तू चिडून राजवाडा सोडलास आणि नवं राज्य स्थापन करण्याचे स्वप्न उराशी बाळगून नवनिर्माणाचा ध्यास घेतलास. पण तुला सांगू? नुसती स्वप्नं पाहून नवनिर्माण होत नसतं. त्यासाठी लवकर उठायला हवं. पण, तुझ्यासाठी तर दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस! खबरे हाताशी बाळगले म्हणून बखर लिहिली जाईलच असे नाही. राजा, प्रजेला नमस्कार लागतो, तसा चमत्कारही लागतो. तूझे तर दर्शनच दुर्लभ! तुझे राजगृह कसले, गुहाच ती. कायम बंद. दरबारी दाराशीच ताटकळून निघून जातात. नुसते फतवे काढून नवनिर्माण कसं होणार? कोणतंही सैन्य भावनेवर नव्हे, तर पोटावर चालतं. किती दिवस तू नुसतंच खळ्ळखट्याकऽऽऽ करत राहाणार?तो बघ, न बोलता सगळं करून निघतो. कोणाला थांगपत्ता लागू देत नाही. राज्यकारभार करावा तर त्यानेच. तुझी टाळीही म्हणे त्याने बेमालुमपणे टाळली. तू फक्त बोलतोस आणि पुन्हा आपल्या गुहेत शिरतोस. आणखी किती लढाया हरणार आहेस? किमान तहात जिंकला असतास तरी, सैन्यांची आशा जिंवत राहिली असती.पण तू तेही केलं नाहीस. आपले सरदारच बिभीषण निघाले म्हणून आता कसला शोक करतोस? आजकाल दाम हाच राम!वेताळाच्या या भडिमाराने संतप्त झालेला राजा उद्गारला-‘यापुढे फक्त गालावर टाळी!’...अशा तºहेने राजाचे मौन भंगल्यामुळे वेताळ शवासहित गायब झाला आणि झाडावर जाऊन बसला!