शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
2
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
3
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
4
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
5
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
6
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
7
नाशिकमध्ये येऊन गेले सर्वपक्षीय दिग्गज नेते; राष्ट्रीय नेतृत्वापासून सर्वोच्च नेत्यांच्या प्रचारसभा
8
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
9
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
10
NTPC Green Energy IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
11
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा
12
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
13
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
14
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
15
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?
16
IPL 2025 Mega Auction : या ३ भारतीय अष्टपैलू खेळाडूंवर लागू शकते मोठी बोली
17
जो बायडेन यांना तिसरं महायुद्ध हवंय का? 'या' निर्णयावर ट्रम्प यांच्या मुलाने उपस्थित केला प्रश्न...
18
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
19
गुजरातेत रॅगिंगने घेतला एकाचा बळी; साडेतीन तास उभे राहण्याची केली सक्ती
20
Pakistan Latest News पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'

दृश्यम्‌ ! उच्चभ्रू वसाहतीतले नेते जेव्हा हल्लेखोर ठरतात..

By सचिन जवळकोटे | Published: August 22, 2021 8:39 AM

लगाव बत्ती...

सचिन जवळकोटे

एकेकाळी रांगड्या अन् आडदांड सैनिकांना सोबत घेऊन ‘धनुष्यबाण’वाल्यांची संघटना बांधली गेली. आता हेच ‘मातोश्री’कार आपल्या पक्षाची प्रतिमा ‘सभ्य अन् सुसंस्कृत’ बनविण्यावर भर देताहेत. मात्र, याच ‘सीएम्’चे जिल्हाप्रमुख दुसऱ्या युवाप्रमुखावर हल्ला केल्याप्रकरणी पोलीस ठाण्याची पायरी चढताहेत. जामिनासाठी कागदं गोळा करताहेत. या प्रकरणानं भैय्या चौक पूल परिसरातली नवी उच्चभ्रू वसाहत मात्र हादरून गेलीय. गंमत म्हणजे या हल्ला प्रकरणात ‘वानकर-काळजे’ दोघेही ठामपणे आपली बाजू मांडताहेत. अगदी ‘दृश्यम’ चित्रपटातल्या हिरोप्रमाणं. आता पोलिसांनाच प्रश्न पडलाय, ‘नेमकी कुणाची स्टोरी खरी?’ लगाव बत्ती..फ्लॅट संस्कृतीही हल्ल्यामुळं भेदरली..n देगावच्या वानकर घराण्याला गुंडगिरीचे आरोप तसे नवे नाहीत. ‘एफआयआर’चे गठ्ठेही त्यांच्या घरातल्या कोनाड्याला अनोळखी नाहीत. मात्र, राजकारणात आल्यानंतर सार्वजनिक सभ्यतेचा ‘प्रकाश’ सोलापूरकरांना पाहावयास मिळालेला. त्यांच्या सुपुत्रानंही ‘धनुष्यबाणा’च्या जिल्हाप्रमुख पदापर्यंत झेप घेतलेली. मुंबईच्या नेत्यांसोबत ऊठबस वाढलेली. त्यांची तिसरी पिढीही आता इंजिनिअरिंगमध्ये उतरलेली. या मुलांसाठीच हे घराणं उच्चभ्रू वसाहतीत राहायला आलेलं.मात्र, भैय्या चौक पुलाजवळ आपल्याच पक्षाच्या युवाप्रमुखावर हल्ला झाल्यानंतर ‘वानकर पिता-पुत्र’ पुन्हा एकदा चर्चेत आलेले. गाडला गेलेला गाढ भूतकाळ पुनश्च खरवडून निघालेला. सोशल मीडियातल्या दोन-चार ग्रुपच्या पलीकडं ओळखला न जाणारा कोण कुठला ‘मनीष’ राज्यभरातल्या ‘मीडिया’त झळकला.  ‘वानकरां’मुळं उलट त्याचा टीआरपी वाढलेला.सर्वांत जास्त टरकली ती मरिआई चौक परिसरातील मंडळी. सर्वाधिक भेदरल्या इथल्या उच्चभ्रू वसाहती... कारण या ठिकाणी राहतो सोलापुरातला अत्यंत सुशिक्षित अन् सुसंस्कृत वर्ग. विशेष म्हणजे आपली पुढची पिढीही अधिकाधिक सुसंस्कारित व्हावी, यासाठी अशा फ्लॅट संस्कृतीत रमताहेत अनेक राजकीय नेते. केवळ भरपूर पैसा जवळ आलाय म्हणून नव्हे, तर आपला जुना इतिहास पुसून नव्या पिढीची चांगली ओळख निर्माण करण्यासाठी.. कारण यांना दिसलंय नव्या वसाहतींमध्येच भवितव्य. मग ते असतील ‘नरोटें’चे ‘चेतन’ किंवा ‘बरडें’चे ‘पुरुषोत्तम’.मात्र, या हल्ला प्रकरणानं सोलापूरच्या राजकीय वर्तुळात हाच विषय चघळला जातोय मोठ्या चवीनं. आपलं राजकीय वर्चस्व सिद्ध करण्याच्या नादात भररस्त्यावर-भरचौकात दहशत निर्माण करण्याचा अधिकार या नेत्यांना दिला कुणी? गुंडगिरीचीच जुनी परंपरा चालवायची असेल तर हायप्रोफाईल सोसायटीत राहायचंच कशाला? म्हणूनच लोकांच्या मनातील या साऱ्या प्रश्नांचा शोध घेण्याचा प्रयत्न आजच्या

‘लगाव बत्ती’त..

गळ्यातल्या ‘चेन’वर थोडंच पोट भरतील ?

‘वानकर’ अन् ‘काळजे’ दोघेही आपापल्या नजरेतून ती घटना कशी घडली, हे ठासून सांगताहेत. दोघेही सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी. त्यामुळं नेमकं कुणावर विश्वास ठेवावा, हे पोलिसांनाही कळेना. अखेर त्यांनी फिर्यादीच्या तक्रारीनुसार ‘वानकरां’वर केस ठोकली. मात्र, ‘मनीष’च्या गळ्यातल्या सोन्याची मोठी चेन तोडल्याचं गंभीर कलम काही लावलं गेलं नाही. खरंतर त्याच्या जबाबातल्या अशा अनेक गोष्टी विसंगत वाटलेल्या. ‘वानकर मंडळी’ भलेही एकवेळ टोलनाक्यावर दादागिरी करतील. सावकारकीत गावाकडची भाषा करतील. जमिनीच्या व्यवहारात हुशारी दाखवतील; मात्र ते थोडंच याच्या ‘चेन’वर पोट भरतील की काय? सारंच आश्चर्यकारक. धक्कादायक. लगाव बत्ती..

नेमकं काय घडलं... त्या दिवशी, त्या ठिकाणी

‘मनीष’च्या नजरेतून ही घटना..

काही वर्षांपूर्वी हा ‘काळजे’ कोण, हेही सोलापूरकरांना माहीत नव्हतं. मात्र, ‘शिवशरणअण्णां’चं बोट धरून राजकारणात आलेला हा ‘मनीष’ नंतर ‘वानकरां’च्या साक्षीनं थेट युवा जिल्हाप्रमुख बनला. मुंबईच्या ‘एकनाथभाईं’च्या संपर्कात आला. तेव्हापासून म्हणे तो ‘गणेशदादां’च्या डोक्यात बसला. त्या दिवशी देगावमधल्या शेतातून परतताना भैय्या चौक पुलाजवळ ‘वानकर’ पित्यानं गाडी अडवली. एकानं गाडीची काच फोडली. दुसऱ्यानं खाली ढकलून लाथा-बुक्क्या घातल्या. मग मात्र जीव वाचवत हा ‘मनीष’ थेट पाठीमागच्या ‘मरिआई’ पोलीस चौकीत पळाला. आतमध्ये लपून बसला.नंतर पोलिसांनी ‘सिव्हिल’मध्ये ॲडमिट केल्यानंतर अधिक त्रास होऊ लागल्यानं खासगी रुग्णालयात त्याला दाखल केलं गेलं. त्याच्या मणक्यात म्हणे गॅप आलाय, तर किडनीला सूज. त्याच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी मुंबईहून ‘एकनाथभाई’ अन् ‘सरदेसाई’सारख्या नेत्यांनीही त्याला थेट मोबाइल कॉल केलेला. लगाव बत्ती..

वानकरां’च्या बोलण्यातून हाच प्रसंग..

या ‘मनीष’ला आम्हीच मोठं केलं. ज्या ‘अण्णां’चं नाव आज तो घेतोय, त्यांच्या विरोधात एकेकाळी हाच गेलेला. प्रमुख झाल्यानंतर केवळ ‘व्हॅट्सॲप पोस्ट’वरच याचं राजकारण रंगलेलं. केवळ तीन शाखा यानं काढलेल्या. सल्ला दिल्यानं बिथरला. गावात येऊन आमच्या पाडापाडीची एकेरी भाषा करू लागला. ‘हात’वाल्यांचा सत्कार करू लागला. ‘बरडे पुत्रा’च्या विरोधातील तरुणाला मुद्दाम पक्षाचं पद देऊ लागला. तरीही आम्ही अत्यंत संयमी होतो. शांत होतो.मात्र त्या रात्री आमच्या वसाहतीसमोर येऊन गोंधळ घालू लागला. एवढ्यात माझे वडील योगायोगानं तिथं आले. यांच्या श्वासातून येणारा ‘सुगंध’ जाणवला. त्याला समजावून परत पाठविण्याचा प्रयत्न केला, तेव्हा हाच अंगावर आला. कदाचित त्यावेळी किरकोळ ढकलाढकली झालीही असू शकेल. कारण, मी तिथं नव्हतोच. तरीही प्रकरण गांभीर्य बनविण्यासाठी त्यानं माझं नाव विनाकारण घेतलं. पक्का ‘स्टोरी रायटर’ आहे तो. असलं खोटं जास्त दिवस चालत नसतं.रिक्षाचा नंबर महागड्या गाडीला..आता गळ्यातून गायब झालेली ‘चेन’ भूतकाळातल्या घटनांनाही वाचा फोडू लागलीय. त्याच्या उत्पन्नाचा सोर्स काय.. आजपावेतो कमविलं किती? सावळेश्वरच्या पंपाची केस मोहोळ पोलीस ठाण्यात कशी गेली? ‘हायवे’च्या ‘कदमां’ना ‘किती’चा त्रास झाला? कुठल्या जागेत कितीची ‘तोडी’  झाली? गाडीचा नंबर खरा कुठला, खोटा कुठला? रिक्षावाल्याचा नंबर एवढ्या महागड्या गाडीला कसा चिकटविला गेला? अशा अनेक अचाट प्रश्नांचा शोध आता त्याचे विरोधकच घेऊ लागलेत. खरंतर, राजकारणात अशाच गोष्टी सर्वाधिक चालत असतात. मात्र, बंद दरवाजाआड केलेलं ‘डीलिंग’ कायमचं लपून राहतं. थेट फोन कॉलवरच केलेली मागणी ‘खंडणी’ म्हणून चर्चिली जाते, हाच फरक या युवा कार्यकर्त्याला कदाचित आजपावेतो समजला नसावा. किमान आपल्या जुन्या नेत्यांकडून तरी एवढं शिकून घ्यायचं होतं त्यानं. लगाव बत्ती..

घटना बिहारसारखी......शूटिंग बॉलीवूडसारखं !

 ‘मनीष’वर हल्ला झाल्यानंतर दोन मिनिटांचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालेला. आपला जीव वाचविण्यासाठी ‘मरिआई पोलीस चौकी’त जाऊन लपलेल्या ‘मनीष’चा घाबराघुबरा आवाज ऐकताना जिवाचा थरकाप उडतो. भरचौकात हल्ला झाल्यानंतर तो राजकीय कार्यकर्ता चौकीत शिरतो, तेव्हा तिथं एकही पोलीस जागेवर नसतो. अशावेळी चौकीचा दरवाजा आतून बंद करण्याचा केविलवाणा प्रयत्न त्याच्याकडून होतो, असा थरार फक्त बिहारातच घडू शकतो.. किंवा ‘सिंघम’च्या चित्रपटात.मात्र, हा व्हिडीओ पाहून  ‘मनीष’ त्या क्षणी किती घाबरला असावा, हेही कळून चुकतं. विशेष म्हणजे पोलीस आल्यानंतरही  ‘दार लावाऽऽ दार लावाऽऽ’ ही त्याची विनंतीही हल्लेखोरांबद्दलची प्रचंड भीती स्पष्ट करून जाते. मात्र, शेवटपर्यंत सोलापूरकरांना हे समजलं नाही की.. एवढ्या दहशतीखाली असतानाही हा ‘मनीष’ आपल्या मोबाइलमधून व्यवस्थितपणे ‘शूटिंग’ कसं काय काढू शकत होता?

लगाव बत्ती..

टॅग्स :SolapurसोलापूरPoliticsराजकारणShiv Senaशिवसेना