शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
3
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
5
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
6
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
7
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
8
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
9
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
10
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
11
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
12
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
13
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
14
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
15
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
16
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
17
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
20
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी

संस्कारातून विवेकाचे दर्शन

By admin | Published: August 27, 2016 5:52 AM

सिंधू आणि स्पेनची मारिना कॅरोलिना यांच्यातील बॅडमिंटनचा अटीतटीचा अंतिम सामना दूरचित्रवाणीच्या पडद्यासमोर सगळे भारतीय श्वास रोखून व नजर खिळवून पाहात होते.

रिओ आॅलिम्पिकमध्ये आपली सिंधू आणि स्पेनची मारिना कॅरोलिना यांच्यातील बॅडमिंटनचा अटीतटीचा अंतिम सामना दूरचित्रवाणीच्या पडद्यासमोर सगळे भारतीय श्वास रोखून व नजर खिळवून पाहात होते. ती नाट्यमय चुरस आशानिराशेच्या हिंदोळ्यावर झुलत होती. दोघींच्या खेळात विजेची चपळता व कुशलता होती. आत्मविश्वास, जिद्द आणि एकाग्रता होती. आॅलिम्पिकच्या रौप्यपदकाची सिंधू मानकरी ठरली. मनातील खळबळ सावरत तिने मोठ्या उमदेपणाने मारिनाला जवळ घेतले व तिचे मन:पूर्वक अभिनंदन केले. त्याचक्षणी सव्वाकोटी भारतीयांची व जगातील क्रीडाप्रेमी प्रेक्षकांची मने या सोनपरीने जिंकून घेतली.आॅलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. याचा गर्वाने, अहंकाराने तर नव्हेच पण अभिमानाने वारंवार उच्चार करण्याचे तिने संयमाने आणि उच्च संस्कार मिळाले असल्याने टाळले. ‘सुवर्णपदक मिळवण्याचे माझे लक्ष्य होते. त्यासाठी मी खूप प्रयत्न केले. पण मारिना खूप छान खेळली. तिच्या खेळावर मी खूश आहे’ अशी संयत प्रतिक्रिया तिने दिली. तिचे गुरू गोपीचंद, आई, माजी व्हॉलिबॉलपटू पी. विजया आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे माजी मानकरी पी.व्ही. रामण्णा म्हणजे तिचे वडील यांनीही मारिनाचे सोनेरी यश खिलाडू उमदेपणाने स्वीकारले. सिंधूचे सुवर्णपदक हुकले म्हणून यापैकी कोणीही आदळआपट, धुसफूस केली नाही. आपल्या अपयशाला प्रतिस्पर्धीच जबाबदार आहे, तिला दाद देणारे, तिचे मनोधैर्य वाढवणारे कितीतरी प्रेक्षक तिथे होते असा कांगावा एकानेही केला नाही. देशातील याआधीच्या खेळाडूंनी कधी नेत्रदीपक कामगिरी केलीच नाही, त्यांनी पदक न मिळवण्याचा वारसा आम्हाला विरासत (वारसा) म्हणून दिला असे म्हणत आपल्या अपयशाचे खापर त्यांनी आधीच्या खेळाडूंवर फोडले नाही. घरची साधारण आर्थिक स्थिती, समाजाकडून निर्माण केले जाणारे अडथळे, देशाची खेळनीती यांच्यावर सुवर्णपदक हुकल्याची जबाबदारी न ढकलता १२ वर्षे निष्ठेने तप करणाऱ्या सिंधूने आणि तिच्या पाठीशी पहाडाप्रमाणे उभे ठाकलेल्या गुरूंनी, आई-वडिलांनी प्रश्नकर्त्यांना अत्यंत सकारात्मक उत्तर दिले - ‘यानंतर स्वत:त अधिक सुधारणा करून भावी काळात यशासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.’एकाग्रता, परिश्रम तसेच विवेक विचार मानवी स्वभावाचा अमूल्य पैलू असतो हे त्यांनी दाखवून दिले. या विवेकाचेच दर्शन सिंधूच्या कृतीतून साऱ्या जगाने बघितले.-डॉ. सौ. प्रज्ञा आपटे