शहरं
Join us  
Trending Stories
1
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
2
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
3
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
4
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
5
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
6
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
7
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
8
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
9
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
10
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
11
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
12
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
13
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
14
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
15
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
16
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
17
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
18
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
19
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
20
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत

तापमानवाढ अनियंत्रित

By admin | Published: April 16, 2017 3:01 AM

युनोच्या आयपीसीसीचे पाचही अहवाल, तसेच गतवर्षीचा पॅरिस करार आणि गेल्या वर्षभरात आलेले नासा व इतर संस्थांचे अहवाल, तापमानवाढीमुळे ध्रुवांवरील बर्फ वेगाने वितळत

- अ‍ॅड. गिरीश राऊत 

युनोच्या आयपीसीसीचे पाचही अहवाल, तसेच गतवर्षीचा पॅरिस करार आणि गेल्या वर्षभरात आलेले नासा व इतर संस्थांचे अहवाल, तापमानवाढीमुळे ध्रुवांवरील बर्फ वेगाने वितळत असल्याचे व त्यामुळे सागर पातळीत वेगाने वाढ होत असल्याचे इशारे देत आहेत. मागील वर्षापासून दरवर्षी १/५ अंश सेल्सिअस या अभूतपूर्व गतीने पृथ्वीचे सरासरी तापमान वाढत आहे. येत्या ४ वर्षांत या गतीने १ अंश सेल्सिअसची भर उद्योगपूर्व काळाच्या म्हणजे, सन १७५०च्या तुलनेत पडत असून, मानवजात वाचविण्यासाठी तापमानातील वाढ २ अंशाच्या मर्यादेत ठेवण्याचे पॅरिस कराराचे उद्दिष्ट धुळीला मिळत आहे.तापमानवाढीचे विविध दुष्परिणाम व सागर पातळीतील वाढ, यामुळे २०३४ पासून पृथ्वीवरील मुंबई-चेन्नई पट्ट्यातील शहरे ओस पडू लागणार, हा प्रशांत महासागरातील हवाई विद्यापीठाचा अहवाल ३ वर्षांपूर्वी आला आहे. उत्तर गोलार्धात युरोपातही अभूतपूर्व बर्फवृष्टी झाली आहे. ग्रीस, रुमानिया इत्यादी देशांत तापमान ३० अंशापेक्षा खाली गेले. या वेळी विषुववृत्तावर श्रीलंकेत आतापर्यंतचा ऐतिहासिक दुष्काळ चालू आहे. दक्षिण गोलार्धात आॅस्ट्रेलियात काही ठिकाणी अधिक ४० अंशापेक्षा तापमान जास्त होत आहे. पश्चिम अंटार्क्टिकावरील सुमारे ५ हजार वर्ग किलोमीटर क्षेत्रफळाचा व सुमारे १ हजार फूट उंचीचा (जाडीचा) प्रचंड हिमखंड मूळ भागापासून निखळला आहे. तो प्रशांत महासागरात शिरत आहे. त्यामुळे त्याच्या आतील भागातील हिमनद्या वेगाने वितळणार आहेत.सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, दिनांक १८ जानेवारी रोजी जागतिक हवामान संघटनेने दिलेल्या अहवालानुसार, सन २०१६ हे तापमानाचा उच्चांक करणारे सलग १६ वे वर्ष ठरले आहे. डिसेंबर २०१६ हा वाढत्या तापमानाचा सलग २० वा महिना ठरला आहे. जानेवारी १९८५ पासून डिसेंबर २०१६ पर्यंतच्या सर्व ३७३ महिन्यांतील उच्चतम तापमान हे २०व्या शतकातील सरासरी तापमानापेक्षा जास्त होते. नोव्हेंबर २०१६ मधील उच्चतम तापमान २०व्या शतकाच्या सरासरी तापमानापेक्षा ०.९४ अंशाने जास्त होते. २०व्या शतकातील सरासरी तापमानात शेवटच्या ३ दशकांतील वाढलेल्या तापमानाचा मोठा वाटा होता आणि आता २१व्या शतकातील फक्त १६व्या वर्षातील नोव्हेंबर महिन्यातील उच्चतम तापमान यात जवळजवळ १ अंशाचे अंतर आहे. याचा अर्थ तापमानवाढीचा हा वेग सुन्न करणारा आहे.पॅरिस करार फक्त ४ वर्षांत अयशस्वी ठरणार आहे. कारण सन २०२० मध्ये मानवजात वाचविण्यासाठी नियंत्रित करावयाच्या २ अंश वाढीची मर्यादा ओलांडली जाणार आहे. प्रत्येक वर्षी १/५ अंशाची वाढ पृथ्वीच्या सरासरी तापमानात होत असल्याने, जीवसृष्टी नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.वातानुकूलन वाढतेयउन्हाळ्याची दाहकता वाढत असल्याने, वातानुकूलनाचा वापर वाढत आहे. त्यामुळे हे दुष्टचक्र अधिक तीव्र होत आहे. मुंबईत रोज १ हजार ४०० मेगावॅटपेक्षा जास्त वीज वातानुकूलनासाठी वापरली जाते. ही वीज कोळशापासून वीज निर्माण करणाऱ्या कारखान्यातून आली असे धरले, तर रोज सुमारे ३३ हजार टन कार्बन डायआॅक्साइड वातावरणात केवळ मुंबईच्या वातानुकूलनामुळे सोडला जातो. हा वायू उष्णता धरून ठेऊन पृथ्वीचे तापमान वाढविण्यास प्रामुख्याने कारण आहे.

(लेखक पर्यावरणतज्ज्ञ आहेत.)