आयुष्यात असे काही प्रसंग येतात की, जेव्हा आपल्या करिअरच्या ऐन भरात आपल्याला योग्य बाबींची निवड करावी लागते. आपण तेव्हा अध्यापन करीत असू किंवा एखाद्या आय.आय.टी. कंपनीत किंवा उत्पादक कंपनीत काम करीत असू. कारण आता ही सर्व क्षेत्रे डिजिटल झाली आहेत! डिजिटलायझेशन हा आधुनिक जिनी (बाटलीत बंद असलेला राक्षस आहे, जो बाहेर आला आहे) आहे. त्यामुळे त्याच्या म्हणण्यानुसार सर्वांना काम करावे लागणार आहे. त्याची सर्व कौशल्ये आपल्याला शिकावीच लागणार आहेत. आपल्या जीवनात घडणारे बदल आपल्या पटकन लक्षात येत नाहीत, पण हे बदल घडतात तेव्हा आपल्यापाशी असलेली कौशल्ये ही निकामी झालेली असतात आणि नव्या कौशल्यांचा स्वीकार करणे आपल्यासाठी गरजेचे असते. ही नवीन कौशल्ये सॉफ्टवेअर विकासाची, रोबोटचा वापर करून होणाऱ्या आॅटोमेशनची आणि माहिती तंत्रज्ञानाच्या सुरक्षिततेसंबंधीची असतात. हा बदल आत्मसात करण्यासाठी वेळ हा लागतोच; पण या बदलासाठी आपण तयार आहोत का?
आपण जी कौशल्ये पूर्वी आत्मसात केली असतात त्यांचा आपल्याला नव्याने शोध घ्यावा लागतो. आपण सॉफ्टवेअर इंजिनीअर असलो तर आपल्याला डॅशबोर्डचा सामना करावा लागतो. आपण यापूर्वी संपादन केलेले कौशल्य आपल्या उपयोगी पडत असले तरी नव्या अनुभवाचा विस्तार हा जितका आव्हानात्मक तितकाच चिंताजनक असतो.यासंदर्भात मॅककिन्से ग्लोबल इन्स्टिट्यूटचा मे २०१८ मधील शोधनिबंध सांगतो की, गेल्या पंधरा वर्षांत कामगारांत आणि कर्मचाऱ्यांत जे कौशल्य पाहावयास मिळत होते त्याला आॅटोमेशनने अधिक गती मिळणार आहे. या निबंधात पुढे नमूद केले आहे की, २०३० सालापर्यंत तांत्रिक कौशल्य ५५ टक्क्यांनी वाढणार आहे. त्यासाठी २०१६ साली १० टक्के काम करावे लागत होते, आता ते १७ टक्के इतके वाढणार आहे. ज्ञानाच्या उच्च प्रकारच्या आकलन कौशल्याची मागणीदेखील वाढणार आहे. त्यामुळे प्रोग्रामिंगविषयक कौशल्याच्या मागणीतही वाढ होणार आहे. याशिवाय नेतृत्वविषयक आणि व्यवस्थापनविषयक कौशल्याची मागणी २४ टक्के इतकी वाढणार आहे. ही गोष्ट सर्वच क्षेत्रांना आणि व्यवसायांना लागू आहे.
आपल्या कामावर तांत्रिक प्रगतीचा परिणाम काय होईल, याची काळजी प्रत्येक व्यक्तीला वाटू लागली आहे. ज्या लोकांना वाटते की, आपण भविष्यात अनावश्यक ठरणार आहोत आणि आपल्याजवळ त्यावेळी आवश्यक असलेल्या कौशल्याचा अभाव असणार आहे, त्यांना कौशल्य संपादन करण्यासाठी मदत करावी लागेल. त्यासाठी कौशल्यवाढीचे कार्यक्रम लागू करणे आवश्यक करावे लागतील. संपूर्ण देशातील कोडिंग संस्थांमध्ये वेब डेव्हलपमेंट कोर्सेस सुरू करून ते आवश्यक केले पाहिजेत. त्यामुळे भविष्यात नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेताना त्रास होणार नाही. सध्या संगणक व मोबाइलवर नवनवे खेळ सादर होत असल्याने खेळांचा व्यवसाय जोरात आहे. हा खेळ खेळताना खेळणारी व्यक्ती हीच हिरो असते. या क्षेत्रात भविष्यात खूप संधी उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी प्रोग्रामिंग करण्याचे कौशल्य मिळवावे लागेल. २०१८ मध्ये व्हिडीओ गेम्सने १३१ बिलियन डॉलर्सची कमाई केली. त्यात पर्सनल कॉम्प्युटर आणि कान्सोल गेमिंगपेक्षा मोबाइल गेमिंगचे उत्पन्न जास्त होते. २०२५ सालापर्यंत व्हिडीओ गेमिंगची बाजारपेठ ३०० बिलियन डॉलर्सची होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. त्यासाठी लागणाºया कौशल्यातून खेळांचे प्रोग्रामिंग करणे शक्य होणार आहे.आपल्या देशातील बेरोजगारीच्या दराने आॅक्टोबर महिन्यात ७.५ टक्के ही सर्वोच्च पातळी गाठली होती. गेल्या तीन वर्षांतील हा उच्चांक आहे. साºया जगात बेरोजगारीचा सरासरी दर २ ते २.५ टक्के इतका आहे. पण आपल्या देशाने ही सरासरी केव्हाच ओलांडली आहे. ही बेरोजगारी विद्यमान कौशल्ये निकामी झाल्यामुळे किंवा योग्य रोजगाराच्या संधी न मिळाल्याने झाली असली तरी आपल्या संथ आर्थिक प्रगतीसाठी ती घातक आहे. आपल्या उद्योगांना आधुनिक कौशल्ये आत्मसात केलेले तरुण मिळत नाहीत. तेव्हा शैक्षणिक संस्थांनी या नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून तरुणांना पारंगत करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.
क्लाऊड हे नव्याने उदयास आलेले तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांनी वाचन, लेखन आणि गणित कौशल्ये अंगीकारली पाहिजेत. आपल्या जीवनात क्लाऊड कॉम्प्युटिंग कौशल्याला आपण महत्त्वाचे स्थान द्यायला हवे. आजच्या कर्मचाºयांना डिजिटल तंत्रज्ञान कसे आत्मसात करता येईल याचा विचार व्हायला हवा. त्यासाठी सरकारनेही पुढाकार घेत करिअर जॉब बोर्डाची स्थापना करून त्याच्यामार्फत क्लाऊड तंत्रज्ञानाशी संबंधित रोजगार उपलब्ध करून द्यायला हवा. करिअरच्या मध्येच कोणताही बदल स्वीकारणे हे तसे कठीण असते. ज्यांनी असे बदल केले आहेत त्यांना ते करताना होणाºया त्रासाची कल्पना आहे. नवीन उद्योगात पहिल्यांदा स्थान मिळणे हे अत्यंत कठीण असते. पण त्यासाठी चंदेरी किनार आहे. आतापर्यंत आपण जी कौशल्ये आत्मसात केली आहेत केवळ त्यांच्यावर अवलंबून राहणे योग्य होणार नाही. एकदा नवीन कौशल्ये आत्मसात केली, की मग त्यात यश संपादन करण्याची इच्छा प्रत्येकाला पुढे पुढे नेईल, यात शंका नाही.- डॉ. एस. एस. मंठामाजी चेअरमन, एआयसीटीई,सदस्य, कौशल्य विकास प्राधिकरण