शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

आमचं ठरलंय... अहो पणऽऽ कुणा-कुणाबरोबर ?

By सचिन जवळकोटे | Published: June 30, 2019 9:13 AM

लगाव बत्ती

 

सचिन जवळकोटे

‘निष्ठा म्हंजी काय रं भौऽऽ ?? असा भावनिक प्रश्न म्हणे आजकाल बरेच कार्यकर्ते एकमेकांना विचारू लागलेत; परंतु याचं परफेक्ट उत्तर कुणालाच न सापडलेलं. अधिक माहितीसाठी आम्ही पामरांनी दुधनीच्या ‘सिद्धूअण्णां’शी संवाद साधला. मात्र, ते ‘मातोश्री ते वर्षा’ बंगल्याच्या रस्त्यावरच हेलपाटे मारण्यात गर्क राहिलेले. बार्शीचे ‘दिलीपराव’ही भगव्या झेंड्याचा बागुलबुवा करत ‘राजाभौं’ना वाकुल्या दाखवत राहिलेले. ‘निष्ठा जपण्याचा मक्ता काय फक्त आपण एकट्यानंच घेतलाय की काय ?’ असं ‘संजयमामां’ना विचारत माढ्याचे ‘बबनदादा’ही ‘खोबरं तिकडं चांगभलंऽऽ’चा नारा देण्याच्या मूडमध्ये रमलेले. सांगोल्याचे ‘दीपकआबा’ही ‘कर्जबाजारी माजी आमदार’ हा शिक्का पुसून ‘लाटेतला लोकप्रिय आमदार’ बनण्यासाठी उत्सुक बनलेले. या सा-यांनी म्हणे खासगीत आपल्या कार्यकर्त्यांना ‘आमचं ठरलंयऽऽ’ असं सांगण्यास सुरुवात केलीय; परंतु ‘नेमकं कुणाबरोबर ठरलंय?’ याचा शोध घेता-घेता प्रामाणिक कार्यकर्त्यांना मात्र नाकीनऊ आलंय.

 ‘सिद्धूअण्णां’च्या गळ्यात भगवं उपरणं 

  ‘हातातलं घड्याळ’ सोडून ‘कमळा’ची पूजा करायला अनेक जण उत्सुक खरे; मात्र मध्येच ‘मातोश्री’कारांच्या ‘ठाकरी’ भाषेमुळं ब-याच जणांची धोरणं एका रात्रीत बदलू लागलीत... कारण ‘युती’ टिकली तरच सत्तेतल्या पार्टीत जाण्यात या मंडळींना अधिक स्वारस्य. त्या दृष्टीनं अनेकांनी ‘देवेंद्रपंतां’कडे आपली ‘फिल्डिंग’ लावलेली. मात्र, लोकसभा निकालानंतर ‘कमळा’चा ‘टीआरपी’ भलताच वाढल्यानं ‘पंतां’नी साºयांनाच ‘वेटिंग’वर  ठेवलेले. त्यांचा मोबाईल सतत ‘एन्गेज’ लागू लागलेला.हे पाहून दुधनीचे ‘सिद्धूअण्णा’ थेट ‘मातोश्री’वर जाऊन धडकले. बराच वेळ गुफ्तगू झालं. ‘अण्णां’साठी ‘बाणा’चा नेम अक्कलकोटमध्ये लावण्यास ‘उद्धो’ही तयार झाले; भगवं उपरणं आपल्या गळ्यात कसं दिसतं, याचा डेमोही ‘अण्णां’नी आमदार निवासातल्या आरशासमोर घेतला. मात्र, याच काळात ‘सीएम’ पदावरून ‘युती’त पुन्हा शेरेबाजी सुरू झाली. ‘उद्धों’च्या तिखट जिभेनं ‘पंतांची मंडळी’ पुन्हा एकदा घायाळ झाली. सावध झाली. निवडणुकीच्या तोंडावर ऐनवेळी ‘मातोश्री’कारांनी कलटी मारली तर सर्वच्या सर्व जागांवर आपली हुकुमी माणसं उभारली पाहिजेत, असा फतवा वरून निघाला. मग काय...‘देवेंद्रपंतां’चा मोबाईल क्षणार्धात सगळ्यांसाठी खणखणू लागला. इतके दिवस ‘वेटिंग’ राहिलेल्या ‘सिद्धूअण्णां’नाही तत्काळ घेऊन येण्याचा मेसेज सोलापूरच्या ‘विजूमालकां’ना गेला. मार्केट यार्डातल्या चेअरमनपदाच्या गुबगुबीत खुर्चीत मस्तपैकी रेललेले-रुळलेले ‘मालक’ही लगेच ‘अण्णां’ना घेऊन मुंबईत गेले. ‘पंतां’ची भेट घालून दिली. चर्चा झाली. निर्णय फायनल झाला. त्यांचं ठरलं... मात्र इकडं ‘मातोश्री’वरची मंडळी अजूनही याच भ्रमात की ‘अण्णांशी आमचं ठरलंयऽऽ’ लगाव बत्ती...

राजाभौंची चाळ गप्पच !

  पुण्यातल्या पार्टी मिटिंगकडे पाठ फिरविणा-या ‘दिलीपरावां’चे नातू ‘आर्यन’ आजकाल सोशल मीडियावर रोज भगवा फडकवू पाहताहेत. केवळ ‘समोरच्याचं टेन्शन वाढावं’ या हेतूसाठी आपल्या आजोबाची विश्वासार्हताच पणाला लावण्याइतपत हा लाडका नातू नसावा नक्कीच भोळा. मात्र, आजोबांना भगव्याचंही सोवळं नाही, हा भाग वेगळा. सात तारखेला ‘शिवबंधन’ बांधण्यासाठी म्हणे आजोबा-नातवाचे हात सळसळू लागलेत. अगागाऽऽ ‘असं झालं तर पंतांचा आदेश मानून आख्खी रौत चाळ काय आगळगाव रोडवर प्रचारात मदतीला जाणार की काय?’ असा गहन प्रश्न पडू लागलाय बार्शीकरांना. आता रौतांच्या राजाभौंनाच माहीत, त्यांचं नेमकं काय ठरलंय.. तोपर्यंत लगाव बत्ती !

नोटा नाहीतर नाही किमान कमळाच्या पाकळ्या मोजू..

  सांगोल्याच्या ‘दीपकआबां’नी आजपावेतो राजकारणात लयऽऽ खस्ता खाल्ल्या. कर्ज काढून-काढून निवडणुका लढविल्या. जिल्हाध्यक्षपदाची खुर्ची मिळाल्यानंतर खिशातलेच पैसे घालून पार्टी आॅफिस सजवलं. मात्र, या फुकटच्या मिरवामिरवीचा कार्यकर्त्यांनाही आलाय कंटाळा. ‘नोटा नाहीतर नाही किमान कमळाच्या पाकळ्या मोजता आल्या तरी चालतंय,’ असं काही जणांना वाटू लागलंय. बघू या कडलासचे शिवाजीराव त्यांच्यासाठी काही करतात का ते.. अन्यथा घड्याळाचं आॅफिस होईल पुरतं ‘वंचित’... पण या नव्या समीकरणांवर ‘शहाजीबापू’ कशी करतील मात ? कारण त्यांचं कमळासोबत काय ठरलंय, हे कुणालाच नाही ठाऊक. तोपर्यंत लगाव बत्ती !

नाना तिकडं पंतांकडं.. मग इकडं पंत कुणाकडं ?

  लोकसभेला सुशीलकुमारांसाठी पंढरीच्या भारतनानांनी खूप प्रयत्न केले; पण ‘नानां’चा शब्द बºयाच ठिकाणी फेल गेला. तेव्हा त्यांनी आता आपला शब्द म्हणे थेट ‘देवेंद्रपंतां’कडे टाकला. कधी ‘राधाकृष्ण नगरकरां’च्या माध्यमातून, तर कधी ‘सुभाषबापूं’च्या माध्यमातून त्यांची तिकडं ‘पंतां’शी सलगी वाढतच चाललीय. यामुळं इकडं ‘वाड्यावरची पंत मंडळी’ अस्वस्थ बनत चाललीत. ‘आमचं अगोदरच ठरलेलं असताना आता पुन्हा नाना कशाला?’ अशी कुजबुज त्यांच्यात सुरू झालीय. मात्र, ‘मातोश्री’कारांकडं बघत ‘देवेंद्रपंत’ भेटलेल्या प्रत्येकासोबत ‘आमचं ठरलंयऽऽ’ म्हणू लागलेत. त्याला आता काय म्हणावं ? लगाव बत्ती...

दक्षिण’ची स्वारी ‘मध्य’ साधणार !

 बार्शीच्या ‘दिलीपरावां’ची ही कथा तर ‘दक्षिण’च्या ‘दिलीप मालकां’ची  वेगळीच तºहा. लोकसभा निवडणुकीपासून त्यांचा पक्षातल्या नेत्यांइतकाच बाकीच्या सहकाºयांशीही दुरावा वाढत गेलेला. पक्षातली दुफळी-लाथाळीही वाढत चाललेली. थोडक्यात सांगायचं म्हणजे ‘दिलीप मालकां’नाही ‘हाताची अ‍ॅलर्जी’ झालेली. मात्र, ‘सुभाषबापूं’मुळं त्यांना ‘कमळ’ ठरतंय दुर्लभ. त्यामुळं ‘धनुष्यबाणा’चा नेम ‘दक्षिण’ऐवजी ‘शहर मध्य’वर लावता येईल का, याची चाचपणी सुरू.. कारण ‘महेशअण्णा’ कधी अन् कोठे कमळाचा सुगंध घेतील, याची म्हणे नाही गॅरंटी. त्यामुळं शेवटच्या क्षणी ‘युती’ तुटली तर ‘दिलीप मालकां’चं ‘मध्य’ तिकीट फिक्सच... असं गणित म्हणे ‘दिलीपमालकां’च्या गोटात ठरलंय, परंतु ‘युती’त सध्यातरी ‘शंभर टक्के आमचं ठरलंय’ची चर्चा... तेव्हा अशा कैक नेत्यांचं निवडणुकीच्या तोंडावर नेमकं काय ठरलंय, हे जाणून घेण्यासाठी आहेच लगाव बत्ती... कारण ही सारी गुपितं बाहेर काढण्याचं ‘आमचंही ठरलंय !’

(लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरPoliticsराजकारणDilip Sopalदिलीप सोपलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस