परस्परांना न दिसता, न भेटता ‘टीम’ म्हणून काम करणं भाग असलेल्या मनुष्यबळाच्या विकासाचं भवितव्य काय असेल?वर्क फ्रॉम होम या तीन शब्दांनी जगभरातल्या प्रत्येक कार्यालयातल्या दोन विभागांतल्या लोकांना चांगलं दणकून कामाला लावलं आहे.
एक म्हणजे सर्व कंपन्यांतले आयटी विभाग कामाला लागले व दुसरीकडे मनुष्यबळ विकास अर्थात एचआरवाले एकाएकी कामाच्या ओझ्याने वाकले. या विभागांच्या एकदम लक्षात आलं की, आपले ७० टक्क्यांहून अधिक कर्मचारी आता कार्यालयात येणार नाहीत.मग त्यांच्यासाठी घरून काम करतानाच्या सोयी, हजेरी ते खर्च कमी करण्यापासून ते वेतनकपात व काहींना नारळ देण्यापर्यंतची कामं या ‘एचआर’वाल्यांनाही ‘वर्क फ्रॉम होम’ राहूनच करावी लागली.
एकीकडे ‘वर्क फ्रॉम होम’चे कंपन्यांना आणि कर्मचाऱ्यांना होणारे फायदे. दुसरीकडे तोटे. शिवाय अस्थिर वातावरणात कर्मचाऱ्यांना सतत प्रेरणा देत, काम करून घेण्याचं आव्हान, अशी दुहेरी लढाईच सुरू झाली.
यापुढच्या काळात बहुसंख्य कर्मचाºयांना, ज्यांना एचआरच्या परिभाषेत ‘नॉलेज वर्कर्स’ म्हणतात त्यांना तरी घरूनच काम करावं लागणार आहे. कर्मचारी व्यक्तिगत स्तरावर या बदलाचा सामना करतीलच; पण मोठ्या कंपन्यांना एचआर पॉलिसी बदलाव्या लागतील. नवे नियम-व्यवस्था, घरून काम करणं जास्त आनंददायी व्हावं म्हणूनही कर्मचाºयांसाठी काही आॅनलाईन योजनाही आखाव्या लागतील.
‘रिमोट वर्किंग’ कर्मचाºयांत संघभावना तयार करण्याचंही आव्हान पेलावं लागेल. प्रत्येक टीमचा बॉस हा काही उत्तम नेता असेलच आणि आपल्या कर्मचाºयांना तो ‘दूर रह कर भी साथ साथ’ ठेवण्यात यशस्वी होईलच असं नाही, त्यामुळे व्यवस्थापकीय स्तरापासून नव्यानं अनेक गोष्टींचं प्रशिक्षण करावं लागेल. यासंदर्भात ‘लोकमत’ने काही नामांकित बहुराष्टÑीय कंपन्यांच्या मनुष्यबळ विकास प्रमुखांशी व काही स्वतंत्र एचआर कन्सल्टंटशी संवाद साधला. त्यातून दिसणारं उद्याच्या मनुष्यबळ-विकासाचं हे ‘न्यू नॉर्मल’ चित्र!